Powered By Blogger

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; 
गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन...
    ​मलकापूर (प्रतिनिधी):
         श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूर आयोजित 'आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा २०२६' अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात (भाऊ) हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर उपस्थित होते. ​
       ​अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षकी पेशाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "शिक्षकांना विद्यार्थ्यांची 'बॉडी लँग्वेज' आणि त्यांचे डोळे वाचता आले पाहिजेत. जोपर्यंत शिक्षकाचे मन स्थिर होत नाही, तोपर्यंत तो उत्तम शिक्षक बनू शकत नाही. आपल्या कामात निरंतर सुधारणा व्हावी यासाठी मूल्यमापन करणारी यंत्रणा (पथक पर्यवेक्षण) अत्यंत गरजेची आहे. शिक्षकांनी सतत नवनवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि वाढत्या स्पर्धेसाठी सर्वंकष तयारी केली पाहिजे." विद्यार्थ्यांचे डोळे आणि बॉडी लँग्वेज वाचता येणे हेच उत्तम शिक्षकाचे लक्षण आहे असे सांगत त्यांनी पुढील पथक पर्यवेक्षणासाठी सर्व शाळांना शुभेच्छा दिल्या.
      ​  कार्यक्रमाची सुरुवात मा.मुल्ला सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
​       ​संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खालील शाळांना 'आदर्श विद्यालय पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले:
आदर्श विद्यालय पुरस्कार विजेत्या शाळा
​शिशु गट: प्रथम क्रमांक – आदर्श शिशुविहार, मलकापूर
​पूर्वप्राथमिक गट (इ. १ ली ते ४ थी): प्रथम क्रमांक – स्टार इंग्लिश मिडियम, मलकापूर
​प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी): प्रथम क्रमांक – आदर्श प्राथमिक विद्यालय, आगाशिवनगर
​माध्यमिक गट (इ. ८ वी ते १० वी): प्रथम क्रमांक – ना. आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले
​उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी व १२ वी): प्रथम क्रमांक – आदर्श जुनिअर कॉलेज, मलकापूर
​    ​कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्था पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर यांनी विद्यालयांना दिले जाणारे हे पुरस्कार कोणत्या निकषांच्या आधारावर ठरवले जातात आणि त्यासाठी गुणदान कशा पद्धतीने केले जाते, याचे सविस्तर विश्लेषण उपस्थितांसमोर मांडले.
       ​यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. यादव सर यांनी सर्व विजेत्या शाळांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात 'आदर्श शिक्षक' व 'आदर्श लेखनिक' यांच्यासाठीही स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात यावेत, अशी महत्त्वपूर्ण सूचना मांडली.
       तसेच पथक पर्यवेक्षण सदस्य डॉ. सी. बी. कुंभार सर यांनी  विद्यालयांनी आपली शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता वाढवून संस्थेत एक नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
        ​या सोहळ्यास श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण गुरुजी, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, संचालक मा. पवन पाटील सर,माजी पथक पर्यवेक्षण प्रमुख आर. ए. कुंभार सर व पथक पर्यवेक्षण सर्व सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ​    कार्यक्रमाचे नेटके व सूत्रबद्ध सूत्रसंचालन सौ. सुरेखा खंडागळे मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी मानले. 
       संस्थेच्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

एआय हे ज्ञानाचे एक साधन असू शकते, पण संस्कार, मानवी मूल्ये आणि नैतिक शिकवण देणे हे केवळ शिक्षकच करू शकतात ------मा. शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ

एआय हे ज्ञानाचे एक साधन असू शकते, पण संस्कार, मानवी मूल्ये आणि नैतिक शिकवण देणे हे केवळ शिक्षकच करू शकतात -मा. शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ 
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्ञानगंगेचे पावन पूजन..

​मलकापूर (प्रतिनिधी):
       "गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागूं पाय,
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय..."
​संत कबीरांच्या या उक्तीचा प्रत्यय देणारा एक सोहळा नुकताच मलकापूरमधील आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये पार पडला. ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला, श्री मळाईदेवी शिक्षण संस्था आणि श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेले ४० वर्षे अविरतपणे चालत आलेल्या एका महान उपक्रमाची पुनरावृत्ती झाली. हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ते ज्ञानगंगेचे पावन पूजन आणि समाजाच्या शिल्पकारांचा यथोचित सन्मान होता.
​शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:३० वाजता, या मंगल सोहळ्याची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव, 'शेतीमित्र' मा. श्री. अशोकराव थोरात विराजमान होते. 
      यावेळी त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षण व शिक्षकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी बोलताना मा.श्री. अशोकराव थोरात यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करीत "शिक्षक हे ज्ञानाचा दीप आहेत. शिक्षक म्हणजे तेजस्वी ज्ञानदीप!अज्ञानाचा अंधार दूर करून ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट आणतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी समाजाला योग्य दिशा देऊ शकतात असे मत व्यक्त केले.त्यांनी पुढे सांगितले की, "आजच्या काळात जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने वाढत आहे, तेव्हाही शिक्षकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. एआय हे ज्ञानाचे एक साधन असू शकते, पण संस्कार, मानवी मूल्ये आणि नैतिक शिकवण देणे हे केवळ शिक्षकच करू शकतात.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात त्यांनी ४० वर्षांच्या या अखंड परंपरेचा आढावा घेतला.संस्थेच्या या ४० वर्षांच्या परंपरेची प्रशंसा केली आणि शिक्षकांच्या योगदानाला सलाम केला.
         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, मा. श्री. अजित थोरात (काका),संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण व सर्व संचालक मंडळ,मा.सौ शालिनीताई थोरात,रयत शिक्षण संस्था सातारा प्रा. एम. एस. यादव सर व पतसंस्थेच्या माजी व्हाईस चेअरमन मा. सौ. अरुणादेवी पाटील मॅडम व पतसंस्था पदाधिकारी, संस्थेचे पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण इ. मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
            ​अज्ञानाचा अंधार सरला, प्रकाशाचा दीप उजळला...​कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.संगीत विभाग प्रमुख मा. शरद तांबवेकर व त्यांच्या वाद्यवृंद विभागातील विद्यार्थ्यांच्या सुंदर शब्दांच्या फुलांनी केलेली गुरुवंदना उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. त्यांच्या गाण्यातून व्यक्त होणारी कृतज्ञता आणि आदर पाहून वातावरण भक्तिमय झाले.
     ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मळाईदेवी शिक्षण पतसंस्थेच्या मा.अरुणादेवी पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी यशस्वी जीवनाचे स्वप्न पाहू शकतात.
​ प्रमुख पाहुणे ​मा.श्री.अजित थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, "शिक्षक हे समाजाचा कणा आहेत. ते उद्याच्या भारताचे भविष्य घडवत आहेत. समाजाला सशक्त आणि सुसंस्कृत बनवण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.".
       प्रा.एम एस. यादव यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाच्या केंद्रीकरण झाले पाहिजे असे सांगत..आम्ही शिक्षकांनी ह्या बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर भावनिक बुद्ध्यांक वाढविणे गरजेचे आहे तर पुढच्या दहा वर्षात एआय प्रचलित होणार आहे एआय तंत्रज्ञान अतिशय चांगले आहे परंतु त्याला भावनिक बुद्ध्यांकाची जोड असली पाहिजे आणि यात पालक वर्गाने सुद्धा शिक्षकाची थोडीफार भूमिका बजावली पाहिजे असे मत व्यक्त केले.
          यावेळी शिक्षकांच्या वतीने सौ. सानिया कनवाडे, सौ. सोनाली थोरात, सौ. देवकी थोरात, सौ. सुरेखा खंडागळे,श्री वैभव शिर्के, श्री.विठ्ठल कारके या शिक्षकांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आभार मानले आणि शिक्षकी पेशाप्रति आपली निष्ठा व्यक्त केली.
    ​कार्यक्रमाच्या सर्वात महत्त्वाच्या भागात समाजातील आजी माजी ज्ञानसाधकांचा श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान त्यांना भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल. अशी कृतज्ञता पूर्ण भावना शिक्षक वर्गात होती.
      कार्यक्रमाला परिसरातील आजी माजी शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष चैतन्य आले होते.
     ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने सौ.सविता पाटील मॅडम व सौ.सुरेखा खंडागळे मॅडम यांनी केले, तर उपस्तिथांचे आभार प्राचार्य मा. मारुती फराळे यांनी मानले. 
      यावेळी उपस्थितांना अल्पोपहार आणि चहा-पान देण्यात आले. अशा प्रकारे, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेला हा सोहळा उपस्थितांच्या मनात एक नवी ऊर्जा आणि उत्साह भरून गेला. या उपक्रमातून श्री मळाईदेवी संस्था शिक्षकांविषयीचा आदर आणि त्यांच्या कार्याची दखल घेत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संकुलात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरु.. 'मलकापूर रोडरेस २०२६' उत्साहात; चिमुकल्यांपासून बालधावपटूंचा भरघोस सहभाग!

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संकुलात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरु... 'मलकापूर रोडरेस २०२६' उत्साहात; चिमुकल्यांपासून बालधावपटूंचा भरघोस सहभाग!
​मलकापूर (प्रतिनिधी):
आदर्श क्रीडा संस्था, कराड व श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  मलकापूर परिसरात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने भावी धावपटू घडवण्यासाठी 'मलकापूर रोड रेस २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत ५ वर्ष वयोगट ते १४ वर्ष वयोगटांतील मुला-मुलींच्या धावण्याच्या शर्यती अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.
      ​स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा. श्री. दिलीप चिंचकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चव्हाण, संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका व नगरसेविका मलकापूर मा. डॉ. स्वाती थोरात मॅडम आणि मलकापूरचे मा. श्री. हणमंतराव पवार, मलकापूर विद्यालयाचे प्राचार्य मा. मारुती फराळे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे व उत्साही पालकवर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रास्ताविकपर भाषणात मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी संस्थेच्या क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती उपस्थित खेळाडू व पालकांना दिली.
       आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा. दिलीप चिंचकर यांनी चिमुकल्यांच्या क्रीडा कौशल्याला आणि जिद्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अशी आयोजन गेली अनेक वर्ष श्री मळाईदेवी शिक्षण संस्था सातत्याने संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ यांच्या अचूक मार्गदर्शनानुसार करीत आहे. त्यामुळे चांगले व दर्जेदार खेळाडू आज राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. त्यासाठी सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आपल्याला नेहमीच स्पर्धेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत राहील असे मत यावेळी  व्यक्त केले.
           डॉ.स्वाती थोरात मॅडम बोलताना म्हणाल्या,धावण्याची स्पर्धा ही केवळ पायांची शर्यत नसते, ती तुमच्या इच्छाशक्तीची, जिद्दीची आणि शिस्तीची परीक्षा असते.
​ट्रॅकवर जेव्हा तुम्ही धावायला सुरुवात करता, तेव्हा तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी दुसरा कुणी नसून, तुम्ही स्वतः असता. कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक वेगाने आणि ताकदीने धावणे, हेच खरे यश आहे.
​परंतु, ही शर्यत जिंकण्यासाठी केवळ सराव पुरेसा नसतो. जितका महत्त्वाचा तुमचा सराव आहे, तितकाच महत्त्वाचा तुमचा आहार (Nutrition) आहे!तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
       स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचे कौतुक करीत स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाला ​.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री.अजित थोरात (चेअरमन, श्री मळाईदेवी पतसंस्था, मलकापूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अलसाकिब युनूस पटेल (एम.पी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स शेरे) आणि मा. श्री. इरफान मोमीन (स्टार बॉडी बिल्डींग, मलकापूर), संस्थेचे उपाध्यक्ष मा.वसंतराव चव्हाण, मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात मॅडम यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना पारितोषिके देण्यात आली.
         स्पर्धेत विविध वयोगटांनुसार मुले व मुलींच्या गटात अव्वल ५ ठरलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:
​१. ५ वर्षे वयोगट
​मुले:
१. आद्विक सचिन पवार (आदर्श शिशु आगाशिवनगर)
२. अभिजित सचिन घोलप (आदर्श शिशु मलकापूर)
३. अथर्व हणमंत सावंत (आदर्श शिशु मलकापूर)
४. विहान सागर हावरे (स्टार मलकापूर)
५. शिवांश सचिन मुळे (स्टार मलकापूर)
​मुली:
१. शिवश्री सचिन पाटील (आदर्श शिशु मलकापूर)
२. रेवा सुभाष तुपे (आदर्श आगाशिवनगर)
३. ज्ञानेश्वरी रविंद्र पवार (आदर्श मलकापूर)
४. आद्विका रोहित मोहिते (आदर्श आगाशिवनगर)
५. स्वरा संतोष कारंडे (स्टार मलकापूर)
​२. ६ वर्षे वयोगट
​मुले:
१. प्रिन्स प्रसाद खराडे (आदर्श शिशु मलकापूर)
२. आर्यन शेखर जाधव (आदर्श शिशु मलकापूर)
३. रुद्रांश विक्रम थोरात((आदर्श शिशु मलकापूर)
४. रियांश सौरभ कोबळे (स्टार मलकापूर )
५. श्रेयश विजय खबाले (आदर्श आगाशिवनगर)
​मुली:
१. ईश्वरी रविंद्र देशमुख (आदर्श आगाशिवनगर)
२. इरा संतोष शिर्के (आदर्श मलकापूर)
३. श्रीयांशी विकास जाधव (स्टार मलकापूर)
४. श्रीशा प्रथमेश जाधव (स्टार मलकापूर)
५. श्रीशा विशाल पाटील
​३. ८ वर्षे वयोगट
​मुले:
१. विघ्नेश गणेश कवर (आ. प्रा. वि. मलकापूर)
२. वरद सागर करे (आ. प्रा. वि. मलकापूर)
३. मयंक सचिन पाचुंदकर (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर)
४. अनिरुद्ध हेमंत माने (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
५. अजान रफिक बडीगेर (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
​मुली:
१. कु. आरोही पंकज पाटील (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
२. कु. शिवांजाली रामदास शिंदे (आ. प्रा. वि. मलकापूर)
३. कु. कीर्ती अमोल यादव (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. कु. आरोही दिलीप सानप (आ. प्रा. वि. मलकापूर)
५. कु. सई प्रदिप गरुड (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
​४. १० वर्षे वयोगट
​मुले:
१. आदर्श शशिकांत येडगे (आ. प्रा. वि. मलकापूर)
२. वंश सागर पवार (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
३. श्रीतेश सागर कदम (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. अथर्व राम माळी (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर)
५. अभिमन्यू अजित देसाई (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
​मुली:
१. कु. अर्पिता कृष्णत निलगुंडे (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर)
२. कु. प्रज्ञा संताजी देवकर (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
३. कु. गार्गी संतोष देवकर (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. कु. मनस्वी सुरेश कराळे (आ. प्रा. वि. मलकापूर)
५. कु. समृद्धी श्रीकांत घारे (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
​५. १२ वर्षे वयोगट
​मुले:
१. सार्थक तानाजी माने (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
२. समर्थ कुमार पाटील (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
३. वेदांत हंबीरराव गरुड (आ. च. वि. पोतले)
४. समर्थ शिवाजी पाटील (आ. च. वि. पोतले)
५. श्रेयश सचिन चव्हाण (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
​मुली:
१. कु. आराध्या अनिल गरुड (आ. च. वि. पोतले)
२. कु. प्रीती चंद्रकांत काळे (कन्याशाळा मलकापूर)
३. कु. आदिती अशोक घोरे (आ. च. वि. पोतले)
४. कु. शिवन्या सचिन काळे (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
५. कु. आरोही रामदास देशमुख (कन्याशाळा मलकापूर)
​६. १४ वर्षे वयोगट
​मुले:
१. आर्यन संदिप माने (आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर)
२. यशराज संदिप कावळे (आ.च वि.मलकापूर)
३. तनवीर खाशिम वाडीकर (आ. च. वि. मलकापूर)
४. प्रथमेश अशोक आडवी (आ. च. वि. मलकापूर)
५. स्वराज गोरख पुकळे (आ. च. वि. मलकापूर)
​मुली:
१. कु. आसावरी निलेश पाटील (आ. च. वि. पोतले)
२. कु. स्वराली विनोद पाटील (आ. च. वि. पोतले)
३. कु. समिक्षा हणमंत पाटील (आ. च. वि. पोतले)
४. कु. श्रद्धा गणेश ओवे (कन्या शाळा मलकापूर )
५. कु. रेश्मा तानाजी झोरे
           ​ क्रीडाशिक्षिका श्रीमती हसिनाबेगम मुल्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार क्रीडाशिक्षक श्री.योगेश खराडे यांनी मानले.
          ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा संस्थेचे जे. बी. पाटील (उपाध्यक्ष), जे. एन. कराळे (सचिव) आणि आदर्श क्रीडा संस्था सर्व संचालक मंडळ व श्री. राजेंद्र पांढरपट्टे,श्री.मारुती चाळके सर्व क्रीडा शिक्षक, श्री. अमृत शिर्के, श्री. शुभम चव्हाण,विशेष परिश्रम घेतले.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न...


श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
मलकापूर (प्रतिनिधी):
        ​मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर येथे आज १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभ अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.​सकाळी ७.४५ वाजता समारंभाची सुरुवात झाली. मलकापूरचे प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. अनुराज शंकर थोरात यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मा. श्री. कर्नल अर्जुन शिणगारे यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले, तर सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. दुर्योधन बरकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
​            ​कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या सुमधुर आवाजातील समूहगीतांनी झाली. यावेळी कु. समृद्धी जगदाळे (हार्मोनियम) आणि कु. विभावरी पाटील (तबला) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले.
        ​कै. विक्रम दुर्योधन बरकडे (बापू) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शाळेतील विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. दुर्योधन बरकडे यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले.
​        ​देशभक्तीवर आधारित भाषणांच्या सत्रात कु. स्वराली पाटील, कु. ईश्वरी कदम, कु. दुर्वा यादव आणि कु. असिया मत्तेखान व कु. राजनंदिनी निवडुंगे या विद्यार्थिनींनी आपले ओजस्वी विचार मांडले.
​         ​कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शिवकालीन दांडपट्टा आणि लाठी-काठीचे प्रात्यक्षिक. कु. वैष्णवी माने, कु. आदिती सावंत, कु. प्राची पवार, कु. श्रेया शिर्के, कु. कार्तिकी नलवडे आणि कु. स्वरांजली शिंदे यांच्या धाडसी आणि कलात्मक सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
         ​या समारंभासाठी मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. श्री. अशोकराव थोरात, अध्यक्ष मा. श्री. भास्करराव बाबुराव पाटील, नगरसेविका मा. डॉ. सौ. स्वाती थोरात, उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चव्हाण, तसेच संस्थेचे पदाधिकारी,मा. माणिक डोंगरे, मा. अतुल पाटील,मा.हरिदास माने,मा.शकील, मा.शरद कुंभार, मा. सुधाकर शिंदे,मा.संदीप जाधव, मा.संतोष जाधव,मा.धनंजय साठे, मा.जालिंदर माने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि माजी शिक्षक,माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
         मुख्याध्यापिका सौ. भिसे एस. व्ही,​पर्यवेक्षिका सौ. शिर्के.के. ए.सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. थोरात के. आर., क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती मुल्ला एच. एम्. यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक,, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांचे सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

बिरोबा मंदिर नांदलापूर परिसरात कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींकडून बीजारोपण व वृक्षारोपण..


बिरोबा मंदिर परिसरात कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींकडून बीजारोपण व वृक्षारोपण.

वनभोजनाचा घेतला निखळ आनंद; नांदलापूर ग्रामपंचायतीचे लाभले सहकार्य

मलकापूर (प्रतिनिधी):

          पर्यावरण रक्षणाचा आणि संवर्धनाचा संदेश देत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या वतीने नांदलापूर येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिर परिसरात ‘बीजारोपण व वृक्षारोपण’ कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनानुसार अखंडपणे राबवल्या जाणाऱ्या समाजपूरक व पर्यावरणपूरक उपक्रमांचाच हा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                                                        ​             या उपक्रमात कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी अत्यंत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बिरोबा मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या फळ-फुलांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले, तसेच अनेक दुर्मिळ व उपयुक्त औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात हिरवाई फुलवण्यासाठी मुलींनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला..                                                              ​             हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदलापूर ग्रामपंचायतीचे आणि नांदलापूर येथील पालक प्रतिनिधी मा.जालिंदर माने यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.                                                        वृक्षारोपण आणि बीजारोपणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनी आणि शिक्षक-शिक्षिका यांनी निसर्गाच्या कुशीत एकत्र येत वनभोजनाचा (सहभोजनाचा) आनंद लुटला. या वनभोजनामुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणप्रेमासोबतच आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा दिवस विद्यार्थिनींसाठी अत्यंत आनंददायी व शिकण्यासारखा ठरला.यावेळी विदयार्थिनींनी गाणी गाऊन आनंद द्विगुणित केला. व त्याला शिक्षिका सौ हसीनाबेगम मुल्ला यांनी कृतियुक्त पर्यावरण गीत गाऊन उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींना उपक्रमात सहभागी करून घेतले...                                                                                  यां उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..               

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूरचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश...

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूरचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश...
    मलकापूर -
              महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2025- 2026 चा अंतिम निकाल काल जाहीर झाला यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत येत विद्यालयाची उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली. कु. सानवी खराडे -268गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 41वी शहरी सर्वसाधारण विभाग ) तर कु. आराध्या जाधव -262गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत -67वी (शहरी सर्वसाधारण विभाग ) येण्याचा बहुमान मिळविला व कन्याशाळा मलकापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यालयाच्या एकूण सात विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यामध्ये कु.शार्वी जाधव,कु.रेवती तडाखे,कु. अश्विनी कटकदौंड, कु. गार्गी जाधव,कु. सान्वी संकपाळ या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. 
              या सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थिनीचे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे  सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण, खजिनदार मा.तुळशीराम शिर्के,मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ.स्वाती थोरात,संचालक मा. प्रा.संजय थोरात,संचालक मा.पवन पाटील सर ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थिनी व पालक यांनी अभिनंदन केले.. व विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला दाद दिली.
         विद्यार्थिनींच्या या यशामुळे पालक वर्गातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न;  गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...