Powered By Blogger

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

एक पेन फक्त कागदावर चालत नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो - नगरसेवक मा. भिमाशंकर माऊर

एक पेन फक्त कागदावर चालत नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो - नगरसेवक मा. भिमाशंकर माऊर 
  मलकापूर -
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे इयत्ता दहावीतील परीक्षार्थी विद्यार्थिनी व इयत्ता ५  वी ते ९ वी मधील सर्व विद्यार्थिनींना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांच्या लेखन कौशल्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने व  एस.एस.सी बोर्ड परीक्षेचे औचित्य साधून सर्व विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य पेनचे वाटप मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सामाजिक दातृत्व असलेले मलकापूरचे नगरसेवक मा. भिमाशंकर इराप्पा माऊर यांच्या शुभहस्ते व नगरसेवक मलकापूर मा.प्रमोद शिंदे, ग्राममहसूल अधिकारी मा.दीपक कानकेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ.करूणा शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना हे मत व्यक्त केले.
        यावेळी बोलताना ते म्हणाले,संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक शेतीमित्रअशोकराव  थोरात भाऊ यांच्या कुशल प्रशासनामुळे व मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरची यशस्वी शैक्षणिक घोडदौड सुरू असून आज या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सेमी व मराठी माध्यमाच्या मिळून 13 तुकड्यामध्ये 530 विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करीत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे  व त्याला आपल्या हातभार लाभावा या हेतूने सदर सर्व विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य पेन वाटप करण्याचे ठरवले. आपण प्रत्येकाने सामाजिक दातृत्वासाठी पुढे आले पाहिजे असे सांगत  दहावीतील परीक्षार्थी विद्यार्थिनींना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
            यावेळी नगरसेवक मलकापूर मा. प्रमोद शिंदे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
         यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद व सामाजिक दातृत्व दाखवणाऱ्या मान्यवरांच्या विषयी कृतज्ञता होती.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता कोळी यांनी तर सर्व उपस्थितांचे आभार पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के यांनी मानले.
        सदर उपक्रमाचे संस्थेचे संचालक मंडळ व पालक वर्गातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एक पेन फक्त कागदावर चालत नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो - नगरसेवक मा. भिमाशंकर माऊर

एक पेन फक्त कागदावर चालत नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो - नगरसेवक मा. भिमाशंकर माऊर    मलकापूर -         श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच...