Powered By Blogger

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; 
गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन...
    ​मलकापूर (प्रतिनिधी):
         श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूर आयोजित 'आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा २०२६' अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात (भाऊ) हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर उपस्थित होते. ​
       ​अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षकी पेशाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "शिक्षकांना विद्यार्थ्यांची 'बॉडी लँग्वेज' आणि त्यांचे डोळे वाचता आले पाहिजेत. जोपर्यंत शिक्षकाचे मन स्थिर होत नाही, तोपर्यंत तो उत्तम शिक्षक बनू शकत नाही. आपल्या कामात निरंतर सुधारणा व्हावी यासाठी मूल्यमापन करणारी यंत्रणा (पथक पर्यवेक्षण) अत्यंत गरजेची आहे. शिक्षकांनी सतत नवनवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि वाढत्या स्पर्धेसाठी सर्वंकष तयारी केली पाहिजे." विद्यार्थ्यांचे डोळे आणि बॉडी लँग्वेज वाचता येणे हेच उत्तम शिक्षकाचे लक्षण आहे असे सांगत त्यांनी पुढील पथक पर्यवेक्षणासाठी सर्व शाळांना शुभेच्छा दिल्या.
      ​  कार्यक्रमाची सुरुवात मा.मुल्ला सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
​       ​संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खालील शाळांना 'आदर्श विद्यालय पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले:
आदर्श विद्यालय पुरस्कार विजेत्या शाळा
​शिशु गट: प्रथम क्रमांक – आदर्श शिशुविहार, मलकापूर
​पूर्वप्राथमिक गट (इ. १ ली ते ४ थी): प्रथम क्रमांक – स्टार इंग्लिश मिडियम, मलकापूर
​प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी): प्रथम क्रमांक – आदर्श प्राथमिक विद्यालय, आगाशिवनगर
​माध्यमिक गट (इ. ८ वी ते १० वी): प्रथम क्रमांक – ना. आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले
​उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी व १२ वी): प्रथम क्रमांक – आदर्श जुनिअर कॉलेज, मलकापूर
​    ​कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्था पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर यांनी विद्यालयांना दिले जाणारे हे पुरस्कार कोणत्या निकषांच्या आधारावर ठरवले जातात आणि त्यासाठी गुणदान कशा पद्धतीने केले जाते, याचे सविस्तर विश्लेषण उपस्थितांसमोर मांडले.
       ​यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. यादव सर यांनी सर्व विजेत्या शाळांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात 'आदर्श शिक्षक' व 'आदर्श लेखनिक' यांच्यासाठीही स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात यावेत, अशी महत्त्वपूर्ण सूचना मांडली.
       तसेच पथक पर्यवेक्षण सदस्य डॉ. सी. बी. कुंभार सर यांनी  विद्यालयांनी आपली शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता वाढवून संस्थेत एक नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
        ​या सोहळ्यास श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण गुरुजी, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, संचालक मा. पवन पाटील सर,माजी पथक पर्यवेक्षण प्रमुख आर. ए. कुंभार सर व पथक पर्यवेक्षण सर्व सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ​    कार्यक्रमाचे नेटके व सूत्रबद्ध सूत्रसंचालन सौ. सुरेखा खंडागळे मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी मानले. 
       संस्थेच्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

एआय हे ज्ञानाचे एक साधन असू शकते, पण संस्कार, मानवी मूल्ये आणि नैतिक शिकवण देणे हे केवळ शिक्षकच करू शकतात ------मा. शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ

एआय हे ज्ञानाचे एक साधन असू शकते, पण संस्कार, मानवी मूल्ये आणि नैतिक शिकवण देणे हे केवळ शिक्षकच करू शकतात -मा. शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ 
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्ञानगंगेचे पावन पूजन..

​मलकापूर (प्रतिनिधी):
       "गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागूं पाय,
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय..."
​संत कबीरांच्या या उक्तीचा प्रत्यय देणारा एक सोहळा नुकताच मलकापूरमधील आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये पार पडला. ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला, श्री मळाईदेवी शिक्षण संस्था आणि श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेले ४० वर्षे अविरतपणे चालत आलेल्या एका महान उपक्रमाची पुनरावृत्ती झाली. हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ते ज्ञानगंगेचे पावन पूजन आणि समाजाच्या शिल्पकारांचा यथोचित सन्मान होता.
​शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:३० वाजता, या मंगल सोहळ्याची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव, 'शेतीमित्र' मा. श्री. अशोकराव थोरात विराजमान होते. 
      यावेळी त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षण व शिक्षकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी बोलताना मा.श्री. अशोकराव थोरात यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करीत "शिक्षक हे ज्ञानाचा दीप आहेत. शिक्षक म्हणजे तेजस्वी ज्ञानदीप!अज्ञानाचा अंधार दूर करून ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट आणतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी समाजाला योग्य दिशा देऊ शकतात असे मत व्यक्त केले.त्यांनी पुढे सांगितले की, "आजच्या काळात जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने वाढत आहे, तेव्हाही शिक्षकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. एआय हे ज्ञानाचे एक साधन असू शकते, पण संस्कार, मानवी मूल्ये आणि नैतिक शिकवण देणे हे केवळ शिक्षकच करू शकतात.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात त्यांनी ४० वर्षांच्या या अखंड परंपरेचा आढावा घेतला.संस्थेच्या या ४० वर्षांच्या परंपरेची प्रशंसा केली आणि शिक्षकांच्या योगदानाला सलाम केला.
         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, मा. श्री. अजित थोरात (काका),संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण व सर्व संचालक मंडळ,मा.सौ शालिनीताई थोरात,रयत शिक्षण संस्था सातारा प्रा. एम. एस. यादव सर व पतसंस्थेच्या माजी व्हाईस चेअरमन मा. सौ. अरुणादेवी पाटील मॅडम व पतसंस्था पदाधिकारी, संस्थेचे पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण इ. मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
            ​अज्ञानाचा अंधार सरला, प्रकाशाचा दीप उजळला...​कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.संगीत विभाग प्रमुख मा. शरद तांबवेकर व त्यांच्या वाद्यवृंद विभागातील विद्यार्थ्यांच्या सुंदर शब्दांच्या फुलांनी केलेली गुरुवंदना उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. त्यांच्या गाण्यातून व्यक्त होणारी कृतज्ञता आणि आदर पाहून वातावरण भक्तिमय झाले.
     ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मळाईदेवी शिक्षण पतसंस्थेच्या मा.अरुणादेवी पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी यशस्वी जीवनाचे स्वप्न पाहू शकतात.
​ प्रमुख पाहुणे ​मा.श्री.अजित थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, "शिक्षक हे समाजाचा कणा आहेत. ते उद्याच्या भारताचे भविष्य घडवत आहेत. समाजाला सशक्त आणि सुसंस्कृत बनवण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.".
       प्रा.एम एस. यादव यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाच्या केंद्रीकरण झाले पाहिजे असे सांगत..आम्ही शिक्षकांनी ह्या बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर भावनिक बुद्ध्यांक वाढविणे गरजेचे आहे तर पुढच्या दहा वर्षात एआय प्रचलित होणार आहे एआय तंत्रज्ञान अतिशय चांगले आहे परंतु त्याला भावनिक बुद्ध्यांकाची जोड असली पाहिजे आणि यात पालक वर्गाने सुद्धा शिक्षकाची थोडीफार भूमिका बजावली पाहिजे असे मत व्यक्त केले.
          यावेळी शिक्षकांच्या वतीने सौ. सानिया कनवाडे, सौ. सोनाली थोरात, सौ. देवकी थोरात, सौ. सुरेखा खंडागळे,श्री वैभव शिर्के, श्री.विठ्ठल कारके या शिक्षकांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आभार मानले आणि शिक्षकी पेशाप्रति आपली निष्ठा व्यक्त केली.
    ​कार्यक्रमाच्या सर्वात महत्त्वाच्या भागात समाजातील आजी माजी ज्ञानसाधकांचा श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान त्यांना भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल. अशी कृतज्ञता पूर्ण भावना शिक्षक वर्गात होती.
      कार्यक्रमाला परिसरातील आजी माजी शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष चैतन्य आले होते.
     ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने सौ.सविता पाटील मॅडम व सौ.सुरेखा खंडागळे मॅडम यांनी केले, तर उपस्तिथांचे आभार प्राचार्य मा. मारुती फराळे यांनी मानले. 
      यावेळी उपस्थितांना अल्पोपहार आणि चहा-पान देण्यात आले. अशा प्रकारे, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेला हा सोहळा उपस्थितांच्या मनात एक नवी ऊर्जा आणि उत्साह भरून गेला. या उपक्रमातून श्री मळाईदेवी संस्था शिक्षकांविषयीचा आदर आणि त्यांच्या कार्याची दखल घेत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न;  गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...