Powered By Blogger

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

कन्याशाळा मलकापूर येथे साहित्य संमेलन विद्यार्थिनीच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे साहित्य संमेलन विद्यार्थिनीच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न..
        विद्यार्थिनींमधील कथाकथनकार, कवी मनाचा शोध घेणारा अनोखा उपक्रम...
मलकापूर -
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेची कन्याशाळा मलकापूर येथे विद्यार्थिनींसाठी विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी आयोजित केलेले मराठी साहित्य संमेलन बुधवार दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले..यावेळी संमेलनाचे प्रमुख पाहुण्या नवोदित कवयित्री सौ.आशाताई गुरव,संमेलनाच्या उद्घाटक शिक्षण अभ्यासक सौ.वर्षा कुलकर्णी,संमेलनाध्यक्ष नवोदित कवी मा. प्रा. प्रशांत गुरव, संमेलन स्वागताध्यक्षा डॉ. स्वाती थोरात, प्रसिद्ध रानकवी मा.श्री.सावकार जाधव यांच्या शुभहस्ते व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,उपाध्यक्ष भास्करराव पाटील,खजिनदार तुळशीराम शिर्के,संस्था पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण,माजी पथक प्रमुख आर. ए. कुंभार सर, पथक पर्यवेक्षण सदस्य श्री.अंकुशराव मोहिते सर, श्री.यादव सर, सातारा न्यूजच्या सौ. विजया माने, दैनिक प्रभातचे नारायण सातपुते यांचे प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यावेळी क्रीडा शिक्षक श्री. मल्हारी शिरतोडे व त्यांच्या झांज पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात आली.
      संमेलन स्थळी ग्रंथदिंडी आणण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुणे व विद्यार्थिनीनी विद्यार्थिनीसाठी खास आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ करण्यात आला..        
     यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी श्री. योगेश खराडे सर व सौ.देवकी थोरात मॅडम यांच्या साथीने मराठी अभिमान गीत सादर करीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्याशाळा मलकापूरच्या मुख्याध्यापिका यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. देवकी थोरात व श्री. योगेश खराडे यांनी करून दिला.
      स्वागतध्यक्षा डॉ.सौ. स्वाती थोरात यांनी सातारा येथील साहित्य संमेलनाचा दाखला देत संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला व विद्यार्थिनींनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव द्यावा व स्वतःला ओळखून स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा. असे सांगितले तर ग्रंथाशी मैत्री करा व आपले ज्ञान वाढवून समृद्ध व्हा असे आवाहन यावेळी विद्यार्थिनींना केले.
      यावेळी "अमृतकलश" या विद्यार्थिनी व शिक्षकांच्या स्वरचित अशा हस्तलिखिताचे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.हस्तलिखित निर्मितीसाठी मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. संगीता पाटील व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
        प्रमुख पाहुण्या मा.सौ. आशा गुरव यांनी मराठी भाषा आपल्या अभिमानाची असे सांगताना मराठी गौरव गीत सादर केले. लोकसहित्य व बालसाहित्याचे प्रकार सांगत संत साहित्यलाही स्पर्श केला व स्व-रचित कवितांचे सादरीकरण करीत कार्यक्रमात जान आणली.तसेच मराठी भाषा टिकवायची असेल, समृद्ध करायची असेल तर मराठी साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्य जाणून घेतले पाहिजे. वाचनानेच मनुष्य समृद्ध होतो असे मार्गदर्शन केले.
      साहित्य संमेलनाच्या उद्घाटक मा. सौ.वर्षा कुलकर्णी मॅडम यांनी जगातील इतर कोणत्याही शाळेत जे मिळाले नाही असे तुमच्या शाळेने दिले ते म्हणजे आजचे मुलींसाठी असलेले मराठी साहित्य संमेलन, मुलींसाठी दिलेले व्यासपीठ आणि निसर्गाच्या सानिध्यात साहित्य संमेलनाचा आनंद घेण्यासाठी चे ठिकाण असे सांगत जीवनाकडे सकारात्मकतेने पहा व आनंदी जीवन जगा.वाचनानेच हा आनंद मिळू शकतो असे मार्गदर्शन केले.तसेच मुलींच्या समरस होऊन सुंदर हलकी पुलकी कविता सादर केली व विद्यार्थिनींना खळखळून हसविले.
     यावेळी रानकवी मा. सावकार जाधव यांनी ग्रामीण भागाचे जीवन व आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवावर अगदी समर्पक कविता सादर करून विद्यार्थिनी व उपस्थित सर्व मान्यवरांची वाहवा मिळविली.
     संमेलनाध्यक्ष नवोदित कवी प्रा.प्रशांत गुरव यांनी कविता सादर करून समानतेने वागण्याचा संदेश दिला तसेच मुलींना आपले ध्येय ठरवा, आपल्या ध्येयावरच फोकस करा आणि त्यानुसार कृती करा असा मोलाचा संदेश दिला.
      यावेळी विद्यार्थिनीच्या कविता वाचन, कथा कथन व नाट्यछटा यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कु.असिया मत्तेखान हिने" नटसम्राट" या गाजलेल्या नाटकातील सादर केलेला अप्पा बेलवलकर सर्वात भाव खाऊन गेला. तर बटाट्याची चाळ या पू. ल च्या नाटकात कु.समृद्धी जगदाळे,कु. श्रेया शिंदे, कु.गौरवी पाटील,कु. अश्मिका भोसले, कु.मधुरा देवकर यांनी केलेला अभिनय अप्रतिम होता. ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंग गीतात पृथ्वीशा सुपनेकर, कु.श्रेया शिर्के,कु. अनन्या मोहिते६वी व त्यांना तबला साथ देणारी कु. विभावरी जगदाळे ५ वी यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. शिक्षकांमधून मराठीच्या सौ. सविता कोळी यांनी कन्याशाळेवरील 
स्व-रचित कविता सादर केली तर कन्याशाळेचे लाडके शिपाई मामा श्री. प्रकाश कदम यांनी ही आपल्यामधील कवीला जागे करत सादर केलेल्या गीताला विद्यार्थिनींनी भरभरून दाद दिली.अर्पिता सूर्यवंशी हिने साहित्य संमेलन इतिहास यावेळी सांगितला.
  यावेळी कथाकथन व कवितावाचन, गीतगायनात कु. सिद्धी पिटले, कु. राजनंदिनी पाटील, कु.धनश्री संकपाळ, कु.सृष्टी कोळेकर,कु. धनश्री यादव, कु. हिंदवी तडाखे,कु.आदिती पवार, कु. हर्षा पवार, कु.हर्षदा पवार, कु.भूमी माने, कु.जकिया पटेल,कु. संचिता नलवडे, कु.कल्याणी मोरे,कु. दिक्षा सकट,कु.स्वरा शिर्के,कु. श्रुतिका तडाखे, कु. अनुष्का मोरे, कु.जिया शेख ,कु.जोहरा मत्तेखान,कु. जान्हवी कांबळे, कु. मधुरा पाटील, कु.सई पाटील, कु.श्रावणी मस्कर, कु. प्रतिज्ञा पवार, कु. श्रद्धा लोहार, अनुप्रिया पवार, कु. पूर्वा बागल, विद्यार्थिनीनी उस्फुर्त सहभाग घेतला.
      तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ते मराठीतील दिग्गज लेखक, कवी यांची विद्यार्थिनीच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली माहिती देणारी आकर्षक पोस्टर्स संमेलन स्थळी लावण्यात आली होती यासाठी शिक्षिका सौ. वनिता येडगे मॅडम यांनी परिश्रम घेतले त्यांना शिक्षिका सौ. हर्षदा सावंत,सौ.पूजा वाघ, सौ. सरिता रसाळ सौ.रुपाली कांबळे,सौ.कुसम पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाच्या सौ. सविता कोळी व सौ. कविता थोरात यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के यांनी मानले. 
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री. विराज ढगाले ग्रंथपाल श्री.प्रसन्न थोरात सर, श्री. शुभम चव्हाण,श्री प्रकाश कदम,कनिष्ठ लिपिक सौ. अर्चना जाधव,श्री.दिपक झिमरे,सौ.महाजन मावशी सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

कथाकथनकार, कवी मनाचा शोध घेणारा अनोखा उपक्रम...शेतीमित्र अशोकराव थोरात
    विद्यार्थिनींनी आपल्या विद्यार्थीदशेत ग्रंथाचे वाचन करावे. साहित्याचे पारायण करावे त्यासाठी विद्यालय असा उपक्रम राबवित आहे. त्यातून भविष्यातील कथाकथनकार व कवी तयार व्हावेत म्हणून हा आगळावेगळा उपक्रम. त्यासाठी शुभेच्छा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...