शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व या संस्थेची गुणवत्तेत अग्रेसर असणारी फक्त मुलींसाठी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची सोय असणारी कराड तालुक्यातील मलकापूर येथील आपली प्रे. च. कन्याशाळा मलकापूर ता. कराड --- संस्थेतील व संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळा मलकापूर येथील शैक्षणिक उपक्रमांची माहिती देणारा आपला ब्लॉग. 🚩🚩
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संकुलात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरु.. 'मलकापूर रोडरेस २०२६' उत्साहात; चिमुकल्यांपासून बालधावपटूंचा भरघोस सहभाग!
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न...
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६
बिरोबा मंदिर नांदलापूर परिसरात कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींकडून बीजारोपण व वृक्षारोपण..
बिरोबा मंदिर परिसरात कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींकडून बीजारोपण व वृक्षारोपण.
वनभोजनाचा घेतला निखळ आनंद; नांदलापूर ग्रामपंचायतीचे लाभले सहकार्य
मलकापूर (प्रतिनिधी):
पर्यावरण रक्षणाचा आणि संवर्धनाचा संदेश देत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या वतीने नांदलापूर येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिर परिसरात ‘बीजारोपण व वृक्षारोपण’ कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनानुसार अखंडपणे राबवल्या जाणाऱ्या समाजपूरक व पर्यावरणपूरक उपक्रमांचाच हा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी अत्यंत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बिरोबा मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या फळ-फुलांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले, तसेच अनेक दुर्मिळ व उपयुक्त औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात हिरवाई फुलवण्यासाठी मुलींनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदलापूर ग्रामपंचायतीचे आणि नांदलापूर येथील पालक प्रतिनिधी मा.जालिंदर माने यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. वृक्षारोपण आणि बीजारोपणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनी आणि शिक्षक-शिक्षिका यांनी निसर्गाच्या कुशीत एकत्र येत वनभोजनाचा (सहभोजनाचा) आनंद लुटला. या वनभोजनामुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणप्रेमासोबतच आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा दिवस विद्यार्थिनींसाठी अत्यंत आनंददायी व शिकण्यासारखा ठरला.यावेळी विदयार्थिनींनी गाणी गाऊन आनंद द्विगुणित केला. व त्याला शिक्षिका सौ हसीनाबेगम मुल्ला यांनी कृतियुक्त पर्यावरण गीत गाऊन उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींना उपक्रमात सहभागी करून घेतले... यां उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूरचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश...
आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.
आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...
-
कन्याशाळा मलकापूर येथे साहित्य संमेलन विद्यार्थिनीच्या उस्फुर्त प्र...
-
मलकापूर नगरपरिषद जि. सातारा सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदान जनजागृतीसाठी मलकापूर येथे प्रभातफेरी संपन्न... मलकापूर - ...
-
एक पेन फक्त कागदावर चालत नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो - नगरसेवक मा. भिमाशंकर माऊर मलकापूर - श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच...
