Powered By Blogger

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न...


श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
मलकापूर (प्रतिनिधी):
        ​मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर येथे आज १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभ अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.​सकाळी ७.४५ वाजता समारंभाची सुरुवात झाली. मलकापूरचे प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. अनुराज शंकर थोरात यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मा. श्री. कर्नल अर्जुन शिणगारे यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले, तर सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. दुर्योधन बरकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
​            ​कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या सुमधुर आवाजातील समूहगीतांनी झाली. यावेळी कु. समृद्धी जगदाळे (हार्मोनियम) आणि कु. विभावरी पाटील (तबला) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले.
        ​कै. विक्रम दुर्योधन बरकडे (बापू) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शाळेतील विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. दुर्योधन बरकडे यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले.
​        ​देशभक्तीवर आधारित भाषणांच्या सत्रात कु. स्वराली पाटील, कु. ईश्वरी कदम, कु. दुर्वा यादव आणि कु. असिया मत्तेखान व कु. राजनंदिनी निवडुंगे या विद्यार्थिनींनी आपले ओजस्वी विचार मांडले.
​         ​कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शिवकालीन दांडपट्टा आणि लाठी-काठीचे प्रात्यक्षिक. कु. वैष्णवी माने, कु. आदिती सावंत, कु. प्राची पवार, कु. श्रेया शिर्के, कु. कार्तिकी नलवडे आणि कु. स्वरांजली शिंदे यांच्या धाडसी आणि कलात्मक सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
         ​या समारंभासाठी मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. श्री. अशोकराव थोरात, अध्यक्ष मा. श्री. भास्करराव बाबुराव पाटील, नगरसेविका मा. डॉ. सौ. स्वाती थोरात, उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चव्हाण, तसेच संस्थेचे पदाधिकारी,मा. माणिक डोंगरे, मा. अतुल पाटील,मा.हरिदास माने,मा.शकील, मा.शरद कुंभार, मा. सुधाकर शिंदे,मा.संदीप जाधव, मा.संतोष जाधव,मा.धनंजय साठे, मा.जालिंदर माने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि माजी शिक्षक,माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
         मुख्याध्यापिका सौ. भिसे एस. व्ही,​पर्यवेक्षिका सौ. शिर्के.के. ए.सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. थोरात के. आर., क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती मुल्ला एच. एम्. यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक,, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांचे सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न;  गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...