Powered By Blogger

गुरुवार, २३ जुलै, २०२६

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड 
    ​​मलकापूर (प्रतिनिधी):

       श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित, प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर  (ता. कराड) येथे एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी, एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्तीधारक व महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार समारंभ नुकताच प्रीतीसंगम मंगल कार्यालय, मलकापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे माजी नायब तहसीलदार मा. बी. एन. गायकवाड त्यांनी हे मत व्यक्त केले.
    ​ यावेळी अध्यक्षा म्हणून मा. सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर)आणि प्रमुख पाहुण्या मा. कु. प्राजक्ता पाटील (पीएच.डी. सूक्ष्मजीवशास्त्र) व शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
        यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  माजी नायब तहसीलदार बी.एम.गायकवाड यांनी  सर्व विद्यार्थिनींना शालेय जीवनात मिळालेल्या यशावर समाधानी न होता येणाऱ्या स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असा कानमंत्र दिला.
       प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी विविध उपक्रमांची उपस्थितांना करून देत ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या यशाचा आनंद द्विगुणित झाला त्या सर्व दातृत्व असणाऱ्या विविध मान्यवरांच्याबद्दल आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.
          प्रमुख पाहुण्या कु. प्राजक्ता पाटील यांनी विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशासाठी त्यांचे अभिनंदन करीत विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून येणाऱ्या काळात प्रयत्न केल्यास उद्याचा भविष्य नक्कीच आपण घडवणार आहोत असा आशावाद व्यक्त केला.
यांनी भूषवले. 
          शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,म्हणाले,भविष्यातील यशाच्या इमारतीचा मजबूत पाया घालणारे सुवर्णपर्व म्हणजे विद्यार्थी जीवन. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचे भान असणे, जगाच्या नकाशावर काय चालले आहे याचे ज्ञान असणे ही काळाची गरज नक्कीच आहे. परंतु, या बाह्य जगातील मोहाचे क्षणिक क्षितिज आणि शिक्षण क्षेत्रातील अनपेक्षित आव्हाने आपल्या ध्येयाचा मार्ग कधीही धूसर करू शकणार नाहीत, याची खरी खबरदारी विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल.​बाह्य जगातील प्रलोभने ही एखाद्या वादळासारखी असतात, जी विचारांची दिशा भरकटवू शकतात.तेव्हा "वादळातही ज्याचा दीपस्तंभ अढळ असतो, तोच जहाजाला किनाऱ्यावर पोहोचवतो. तसेच, बाह्य वातावरणाचा आपल्या मनःशांतीवर आणि ध्येयावर कसलाही परिणाम होऊ न देता, विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ अभ्यासाच्या तपश्चर्येवरच केंद्रित केले पाहिजे."असा कानमंत्र त्यांनी दिला 
          कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर) म्हणाल्या, ध्येयाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अंतर्मनात अभ्यासाची पेटती ज्योत आणि बुद्धीत सतर्कतेची धार असणे आवश्यक आहे. बाह्य जगाचे ज्ञान हे आपले मार्गदर्शक असावे, पण आपले मुख्य दैवत मात्र 'अभ्यास' आणि 'ध्येयपूर्ती' हेच असायला हवे! आज सर्व विद्यार्थ्यांना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे असे मत आपल्या मनोगतात  व्यक्त केले.
     तसेच कु. धनश्री संकपाळ, कु. स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी या इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थिनी व नीट परीक्षा उत्तीर्ण कु. श्रद्धा पाटोळे या विद्यार्थिनींनी भाषणातून शाळा माऊली विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चंद्रु चव्हाण व खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालिका मा. डॉ. सौ. स्वाती थोरात यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे, मा. भास्करराव मोहिते, मा. संजय तडाखे,माजी विद्यार्थिनी मेकॅनिकल इंजिनिअर कु. इरावती पाटील व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थीत होते.
      ​कार्यक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा  व त्यांच्या पालकांचा  गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देत त्यांचे कौतुक करत त्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात व सौ. देवकी थोरात यांनी केले तर पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
       ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थिनींनी आपले संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासाच्या तपश्चर्येवरच केंद्रित केले पाहिजे.- "शेतीमित्र मा.श्री. अशोकराव थोरात (भाऊ)

विद्यार्थिनींनी आपले संपूर्ण लक्ष केवळ  अभ्यासाच्या तपश्चर्येवरच केंद्रित केले पाहिजे." -
शेतीमित्र मा.श्री. अशोकराव थोरात (भाऊ) 
  
​​मलकापूर (प्रतिनिधी):
   श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित, प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर  (ता. कराड) येथे एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी, एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्तीधारक व महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार समारंभ नुकताच प्रीतीसंगम मंगल कार्यालय, मलकापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी हा दिशादर्शक संदेश दिला आहे
    ​     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर) यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बी. एम. गायकवाड (सेवानिवृत्त नायब तहसीलदार) आणि मा. कु. प्राजक्ता पाटील (पीएच.डी. सूक्ष्मजीवशास्त्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
          यावेळी बोलताना शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले,भविष्यातील यशाच्या इमारतीचा मजबूत पाया घालणारे सुवर्णपर्व म्हणजे विद्यार्थी जीवन. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचे भान असणे, जगाच्या नकाशावर काय चालले आहे याचे ज्ञान असणे ही काळाची गरज नक्कीच आहे. परंतु, या बाह्य जगातील मोहाचे क्षणिक क्षितिज आणि शिक्षण क्षेत्रातील अनपेक्षित आव्हाने आपल्या ध्येयाचा मार्ग कधीही धूसर करू शकणार नाहीत, याची खरी खबरदारी विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल.​बाह्य जगातील प्रलोभने ही एखाद्या वादळासारखी असतात, जी विचारांची दिशा भरकटवू शकतात.  तेव्हा "वादळातही ज्याचा दीपस्तंभ अढळ असतो, तोच जहाजाला किनाऱ्यावर पोहोचवतो. तसेच, बाह्य वातावरणाचा आपल्या मनःशांतीवर आणि ध्येयावर कसलाही परिणाम होऊ न देता, विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ अभ्यासाच्या तपश्चर्येवरच केंद्रित केले पाहिजे."असा कानमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना दिला.
          प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी विविध उपक्रमांची उपस्थितांना करून देत ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या यशाचा आनंद द्विगुणित झाला त्या सर्व दातृत्व असणाऱ्या विविध मान्यवरांच्याबद्दल आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.
        ​ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी  नायब तहसीलदार बी.एम.गायकवाड यांनी  सर्व विद्यार्थिनींना शालेय जीवनात मिळालेल्या यशावर समाधानी न होता येणाऱ्या स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असा कानमंत्र दिला.
         प्रमुख पाहुण्या कु. प्राजक्ता पाटील यांनी विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशासाठी त्यांचे अभिनंदन करीत विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून येणाऱ्या काळात प्रयत्न केल्यास उद्याचा भविष्य नक्कीच आपण घडवणार आहोत असा आशावाद व्यक्त केला.
        कार्यक्रमाचे अध्यक्षा गटविकास अधिकारी सुवर्णा बागल -जाधव बोलताना म्हणाल्या, ध्येयाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अंतर्मनात अभ्यासाची पेटती ज्योत आणि बुद्धीत सतर्कतेची धार असणे आवश्यक आहे. बाह्य जगाचे ज्ञान हे आपले मार्गदर्शक असावे, पण आपले मुख्य दैवत मात्र 'अभ्यास' आणि 'ध्येयपूर्ती' हेच असायला हवे! आज सर्व विद्यार्थ्यांना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या कष्टातच फळ आहे असे मत आपल्या मनोगतात  व्यक्त केले 
        तसेच कु. धनश्री संकपाळ, कु. स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी या इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थिनी व नीट परीक्षा उत्तीर्ण कु. श्रद्धा पाटोळे या विद्यार्थिनींनी भाषणातून शाळा माऊली विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
       यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चंद्रु चव्हाण व खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालिका मा. डॉ. सौ. स्वाती थोरात यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे, मा. भास्करराव मोहिते, मा. संजय तडाखे,माजी विद्यार्थिनी मेकॅनिकल इंजिनिअर कु. इरावती पाटील व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थीत होते.
       ​कार्यक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा  व त्यांच्या पालकांचा  गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देत त्यांचे कौतुक करत त्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात व सौ. देवकी थोरात यांनी केले तर पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
       ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थिनींना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे-मा.सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर)

विद्यार्थिनींना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे-मा.सौ. सुवर्णा जाधव 
   
    ​​मलकापूर (प्रतिनिधी):
 श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित, प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर (ता. कराड) येथे एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी, एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्तीधारक व महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार समारंभ नुकताच प्रीतीसंगम मंगल कार्यालय, मलकापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी हे मत व्यक्त केले.
    ​ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बी. एम. गायकवाड (सेवानिवृत्त नायब तहसीलदार) आणि मा. कु. प्राजक्ता पाटील (पीएच.डी. सूक्ष्मजीवशास्त्र) व शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
          यावेळी बोलताना मा.सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर) म्हणाल्या, ध्येयाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अंतर्मनात अभ्यासाची पेटती ज्योत आणि बुद्धीत सतर्कतेची धार असणे आवश्यक आहे. बाह्य जगाचे ज्ञान हे आपले मार्गदर्शक असावे, पण आपले मुख्य दैवत मात्र 'अभ्यास' आणि 'ध्येयपूर्ती' हेच असायला हवे! आज सर्व विद्यार्थ्यांना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.
       प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी विविध उपक्रमांची उपस्थितांना करून देत ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या यशाचा आनंद द्विगुणित झाला त्या सर्व दातृत्व असणाऱ्या विविध मान्यवरांच्याबद्दल आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.
        ​ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नायब तहसीलदार बी.एम.गायकवाड यांनी सर्व विद्यार्थिनींना शालेय जीवनात मिळालेल्या यशावर समाधानी न होता येणाऱ्या स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असा कानमंत्र दिला.
          प्रमुख पाहुण्या कु. प्राजक्ता पाटील यांनी विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशासाठी त्यांचे अभिनंदन करीत विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून येणाऱ्या काळात प्रयत्न केल्यास उद्याचा भविष्य नक्कीच आपण घडवणार आहोत असा आशावाद व्यक्त केला.
          शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,म्हणाले,भविष्यातील यशाच्या इमारतीचा मजबूत पाया घालणारे सुवर्णपर्व म्हणजे विद्यार्थी जीवन. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचे भान असणे, जगाच्या नकाशावर काय चालले आहे याचे ज्ञान असणे ही काळाची गरज नक्कीच आहे. परंतु, या बाह्य जगातील मोहाचे क्षणिक क्षितिज आणि शिक्षण क्षेत्रातील अनपेक्षित आव्हाने आपल्या ध्येयाचा मार्ग कधीही धूसर करू शकणार नाहीत, याची खरी खबरदारी विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल.​बाह्य जगातील प्रलोभने ही एखाद्या वादळासारखी असतात, जी विचारांची दिशा भरकटवू शकतात. तेव्हा "वादळातही ज्याचा दीपस्तंभ अढळ असतो, तोच जहाजाला किनाऱ्यावर पोहोचवतो. तसेच, बाह्य वातावरणाचा आपल्या मनःशांतीवर आणि ध्येयावर कसलाही परिणाम होऊ न देता, विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ अभ्यासाच्या तपश्चर्येवरच केंद्रित केले पाहिजे."असा कानमंत्र त्यांनी दिला.
          तसेच कु. धनश्री संकपाळ, कु. स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी या इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थिनी व नीट परीक्षा उत्तीर्ण कु. श्रद्धा पाटोळे या विद्यार्थिनींनी भाषणातून शाळा माऊली विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चंद्रु चव्हाण व खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालिका मा. डॉ. सौ. स्वाती थोरात यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे, मा.भास्करराव मोहिते, मा. संजय तडाखे,मा. सुधाकर शिंदे,माजी विद्यार्थिनी मेकॅनिकल इंजिनिअर कु. इरावती पाटील व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थीत होते.
      ​कार्यक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देत त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात व सौ. देवकी थोरात यांनी केले तर पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
       ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

सोमवार, १३ जुलै, २०२६

कन्याशाळा मलकापूर येथे रिलायन्स (Jio-bp) वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थिनींचा दिमाखदार गुणगौरव सोहळा!​

कन्याशाळा मलकापूर येथे रिलायन्स (Jio-bp) वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थिनींचा दिमाखदार गुणगौरव सोहळा!
​मलकापूर:
येथील रिलायन्स Jio मोबिलिटी लि. (Jio-bp) मलकापूर-कराड आणि श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स (Jio-bp) च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी कन्याशाळा मलकापूर येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात शिक्षण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला.
​ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स बीपी चे एरिया सेल्स मॅनेजर मा. श्री. परिमल दरबार साहेब लाभले होते. त्यांच्या शुभहस्ते आणि कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र,नोटबुक व पेन , आकर्षक कॅप, की-चेन आणि चॉकलेट देऊन गौरविण्यात आले. बक्षिसे मिळताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
        ​याप्रसंगी रिलायन्स जिओ बीपी चे ऑपरेटर मा. संदीप जाधव, तसेच मा. राजेंद्र खबाले, मा. सोमनाथ माळी, मा. महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
        यावेळी मार्गदर्शन करताना एरिया सेल्स मॅनेजर मा. श्री. परिमल दरबार यांनी रिलायन्स कंपनी आणि तिच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच, विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आणि "प्रत्येक विद्यार्थिनीने आयुष्यात आपले ध्येय निश्चित करावे व ते गाठण्यासाठी जिद्दीने वाटचाल करावी," असे प्रेरणादायी आवाहन केले.
          शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी आपल्या भाषणात शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पाहुण्यांना दिली. त्या अभिमानाने म्हणाल्या, "आज कन्याशाळेच्या विद्यार्थिनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. शिक्षण असो, कला असो की क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला असून शाळेच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतच आहे."
           ​रिलायन्स Jio-bp कंपनीने दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील वर्षीही याच कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत कन्याशाळेतील विद्यार्थिनींना शूज आणि इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप केले होते, अशी कृतज्ञतापूर्वक आठवण यावेळी काढण्यात आली. रिलायन्स कंपनीच्या या निरंतर मदतीबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव व 'शेतीमित्र' अशोकराव थोरात (भाऊ), संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पालक आणि विद्यार्थिनींनी कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले. "ही मदत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये नक्कीच मोलाचा हातभार लावेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​        ​कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रिलायन्स Jio bp चे सर्व कर्मचारी, तसेच श्री.अमृत शिर्के, श्री.शुभम चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थिनींना भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मोठी ऊर्जा दिली आहे.
       
शनिवार, ४ जुलै, २०२६

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश..मनस्वी शेटके जिल्हा गुणवत्ता यादीत!

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश..मनस्वी शेटके जिल्हा गुणवत्ता यादीत!
​मलकापूर:
      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत  
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेने आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील तब्बल ९ विद्यार्थिनीं उत्तीर्ण झाल्या असून, कु. मनस्वी दिग्विजय शेटके हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १९२ वे स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.व 
​गुणवत्तेचा आलेख उंचावला.
         ​यावर्षीच्या निकालावरून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख कमालीचा उंचावल्याचे दिसून येत आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनींपैकी तब्बल नऊ विद्यार्थिनींनी अत्यंत चांगल्या गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये कुमारी मनस्वी दिग्विजय शेटके हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १९२ वा तर तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत २६ वा क्रमांक पटकावून सुवर्णयश मिळवले. सोबतच शाळेतील कु.आराध्या यादव, कु.त्रिशा शिर्के,​कु.समृद्धी कांबळे,कु.आरोही तडाखे,कु.आर्या जाधव,कु.विभावरी जगदाळे,कु.रिचा कुंभार,​कु.सफा मुल्ला
​या आठ विद्यार्थिनींनीही घवघवीत यश संपादन करत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले हे यश शाळेच्या शैक्षणिक दर्जाची आणि शिक्षकांच्या अविरत परिश्रमाची साक्ष देते.​सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    ​     विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव व शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळातील सदस्य ,​शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के ,सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे मलकापूर परिसरात कन्याशाळेचे व विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शनिवार, ९ मे, २०२६

कन्याशाळा मलकापूरचे माध्यमिक शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश.कु.धनश्री संकपाळ व कु.स्वरा पाटील ९७.२० गुणांसह संयुक्तपणे मलकापूर केंद्रात प्रथम...

कन्याशाळा मलकापूरचे माध्यमिक शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश.
       कु.धनश्री संकपाळ व कु. स्वरा पाटील ९७. २० गुणांसह संयुक्तपणे मलकापूर केंद्रात प्रथम..
मलकापूर -
       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूरच्या कु.धनश्री संकपाळ व कु. स्वरा पाटील हिने संयुक्तपणे ९७.२० गुणांसह मलकापूर केंद्रात प्रथम येण्यचा बहुमान मिळविला.तसेच कु.अर्पिता सूर्यवंशी-९६.६०(द्वितीय क्रमांक), कु.रोहिणी कुंभार -९५.२०(तृतीय क्रमांक), कु.अक्षरा साळुंखे-९४.२० (चतुर्थ क्रमांक), कु. सलोनी यादव-९२% (पाचवा क्रमांक) मिळवून या विद्यार्थिनींनी विद्यालयात प्रथम पाच मध्ये येण्याचा बहुमान मिळविला. विद्यालयाचा निकाल ९७. ६७ टक्के लागला असून यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण 10 विद्यार्थिनी,80% पेक्षा जास्त गुण 11 विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्यासह 33 विद्यार्थिनी,प्रथम श्रेणीसह 29 विद्यार्थिनी,द्वितीय श्रेणीसह 11 विद्यार्थिनी व पास श्रेणीसह 11 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.विद्यार्थिनीच्या या यशाने श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले. शासकीय शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा यामध्येही विद्यालयाने सातत्याने यशाचा आलेख चढता ठेवत आपला वेगळा ठसा शिक्षण क्षेत्रात निर्माण केला आहे. यामुळेच इयत्ता ५वी ते १०वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती विद्यालयास मिळत आहे.
        या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थिनी , मार्गदर्शक सर्व शिक्षक यांचे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ.स्वाती थोरात,सर्व संचालक मंडळ श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे ,पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के, सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थिनी व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
                   कु.धनश्री संकपाळ
९७.२० गुणांसह मलकापूर केंद्रात प्रथम येण्यचा बहुमान

                             कु.स्वरा पाटील
९७.२० गुणांसह मलकापूर केंद्रात प्रथम येण्यचा बहुमान

       कु.अर्पिता सूर्यवंशी-९६.६०(द्वितीय क्रमांक

            कु.रोहिणी कुंभार -९५.२०(तृतीय क्रमांक)
            कुअक्षरा साळुंखे-९४.२० (चतुर्थ क्रमांक)
           कु.सलोनी यादव-९२% (पाचवा क्रमांक) 
@आपल्या हिरकणी @
सर्वाना पुढील वाटचालीसाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व कन्याशाळा मलकापूर च्या वतीने खूप खूप शुभेच्छा..
यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी,
   खूप घेतले होते कष्ट,
म्हणून कन्याशाळेला आहे अभिमान,
  कारण तुमचे उज्ज्वल भविष्य आजच दिसत आहे स्पष्ट.... 👈👈🚩🚩

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर  पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड      ...