श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संकुलात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरु... 'मलकापूर रोडरेस २०२६' उत्साहात; चिमुकल्यांपासून बालधावपटूंचा भरघोस सहभाग!
मलकापूर (प्रतिनिधी):
आदर्श क्रीडा संस्था, कराड व श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर परिसरात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने भावी धावपटू घडवण्यासाठी 'मलकापूर रोड रेस २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत ५ वर्ष वयोगट ते १४ वर्ष वयोगटांतील मुला-मुलींच्या धावण्याच्या शर्यती अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा. श्री. दिलीप चिंचकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चव्हाण, संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका व नगरसेविका मलकापूर मा. डॉ. स्वाती थोरात मॅडम आणि मलकापूरचे मा. श्री. हणमंतराव पवार, मलकापूर विद्यालयाचे प्राचार्य मा. मारुती फराळे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे व उत्साही पालकवर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकपर भाषणात मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी संस्थेच्या क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती उपस्थित खेळाडू व पालकांना दिली.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा. दिलीप चिंचकर यांनी चिमुकल्यांच्या क्रीडा कौशल्याला आणि जिद्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अशी आयोजन गेली अनेक वर्ष श्री मळाईदेवी शिक्षण संस्था सातत्याने संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ यांच्या अचूक मार्गदर्शनानुसार करीत आहे. त्यामुळे चांगले व दर्जेदार खेळाडू आज राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. त्यासाठी सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आपल्याला नेहमीच स्पर्धेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत राहील असे मत यावेळी व्यक्त केले.
डॉ.स्वाती थोरात मॅडम बोलताना म्हणाल्या,धावण्याची स्पर्धा ही केवळ पायांची शर्यत नसते, ती तुमच्या इच्छाशक्तीची, जिद्दीची आणि शिस्तीची परीक्षा असते.
ट्रॅकवर जेव्हा तुम्ही धावायला सुरुवात करता, तेव्हा तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी दुसरा कुणी नसून, तुम्ही स्वतः असता. कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक वेगाने आणि ताकदीने धावणे, हेच खरे यश आहे.
परंतु, ही शर्यत जिंकण्यासाठी केवळ सराव पुरेसा नसतो. जितका महत्त्वाचा तुमचा सराव आहे, तितकाच महत्त्वाचा तुमचा आहार (Nutrition) आहे!तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचे कौतुक करीत स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाला .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री.अजित थोरात (चेअरमन, श्री मळाईदेवी पतसंस्था, मलकापूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अलसाकिब युनूस पटेल (एम.पी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स शेरे) आणि मा. श्री. इरफान मोमीन (स्टार बॉडी बिल्डींग, मलकापूर), संस्थेचे उपाध्यक्ष मा.वसंतराव चव्हाण, मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात मॅडम यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेत विविध वयोगटांनुसार मुले व मुलींच्या गटात अव्वल ५ ठरलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:
१. ५ वर्षे वयोगट
मुले:
१. आद्विक सचिन पवार (आदर्श शिशु आगाशिवनगर)
२. अभिजित सचिन घोलप (आदर्श शिशु मलकापूर)
३. अथर्व हणमंत सावंत (आदर्श शिशु मलकापूर)
४. विहान सागर हावरे (स्टार मलकापूर)
५. शिवांश सचिन मुळे (स्टार मलकापूर)
मुली:
१. शिवश्री सचिन पाटील (आदर्श शिशु मलकापूर)
२. रेवा सुभाष तुपे (आदर्श आगाशिवनगर)
३. ज्ञानेश्वरी रविंद्र पवार (आदर्श मलकापूर)
४. आद्विका रोहित मोहिते (आदर्श आगाशिवनगर)
५. स्वरा संतोष कारंडे (स्टार मलकापूर)
२. ६ वर्षे वयोगट
मुले:
१. प्रिन्स प्रसाद खराडे (आदर्श शिशु मलकापूर)
२. आर्यन शेखर जाधव (आदर्श शिशु मलकापूर)
३. रुद्रांश विक्रम थोरात((आदर्श शिशु मलकापूर)
४. रियांश सौरभ कोबळे (स्टार मलकापूर )
५. श्रेयश विजय खबाले (आदर्श आगाशिवनगर)
मुली:
१. ईश्वरी रविंद्र देशमुख (आदर्श आगाशिवनगर)
२. इरा संतोष शिर्के (आदर्श मलकापूर)
३. श्रीयांशी विकास जाधव (स्टार मलकापूर)
४. श्रीशा प्रथमेश जाधव (स्टार मलकापूर)
५. श्रीशा विशाल पाटील
३. ८ वर्षे वयोगट
मुले:
१. विघ्नेश गणेश कवर (आ. प्रा. वि. मलकापूर)
२. वरद सागर करे (आ. प्रा. वि. मलकापूर)
३. मयंक सचिन पाचुंदकर (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर)
४. अनिरुद्ध हेमंत माने (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
५. अजान रफिक बडीगेर (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
मुली:
१. कु. आरोही पंकज पाटील (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
२. कु. शिवांजाली रामदास शिंदे (आ. प्रा. वि. मलकापूर)
३. कु. कीर्ती अमोल यादव (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. कु. आरोही दिलीप सानप (आ. प्रा. वि. मलकापूर)
५. कु. सई प्रदिप गरुड (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. १० वर्षे वयोगट
मुले:
१. आदर्श शशिकांत येडगे (आ. प्रा. वि. मलकापूर)
२. वंश सागर पवार (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
३. श्रीतेश सागर कदम (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. अथर्व राम माळी (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर)
५. अभिमन्यू अजित देसाई (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
मुली:
१. कु. अर्पिता कृष्णत निलगुंडे (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर)
२. कु. प्रज्ञा संताजी देवकर (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
३. कु. गार्गी संतोष देवकर (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
४. कु. मनस्वी सुरेश कराळे (आ. प्रा. वि. मलकापूर)
५. कु. समृद्धी श्रीकांत घारे (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
५. १२ वर्षे वयोगट
मुले:
१. सार्थक तानाजी माने (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
२. समर्थ कुमार पाटील (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
३. वेदांत हंबीरराव गरुड (आ. च. वि. पोतले)
४. समर्थ शिवाजी पाटील (आ. च. वि. पोतले)
५. श्रेयश सचिन चव्हाण (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
मुली:
१. कु. आराध्या अनिल गरुड (आ. च. वि. पोतले)
२. कु. प्रीती चंद्रकांत काळे (कन्याशाळा मलकापूर)
३. कु. आदिती अशोक घोरे (आ. च. वि. पोतले)
४. कु. शिवन्या सचिन काळे (आ. प्रा. वि. आगाशिवनगर)
५. कु. आरोही रामदास देशमुख (कन्याशाळा मलकापूर)
६. १४ वर्षे वयोगट
मुले:
१. आर्यन संदिप माने (आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर)
२. यशराज संदिप कावळे (आ.च वि.मलकापूर)
३. तनवीर खाशिम वाडीकर (आ. च. वि. मलकापूर)
४. प्रथमेश अशोक आडवी (आ. च. वि. मलकापूर)
५. स्वराज गोरख पुकळे (आ. च. वि. मलकापूर)
मुली:
१. कु. आसावरी निलेश पाटील (आ. च. वि. पोतले)
२. कु. स्वराली विनोद पाटील (आ. च. वि. पोतले)
३. कु. समिक्षा हणमंत पाटील (आ. च. वि. पोतले)
४. कु. श्रद्धा गणेश ओवे (कन्या शाळा मलकापूर )
५. कु. रेश्मा तानाजी झोरे
क्रीडाशिक्षिका श्रीमती हसिनाबेगम मुल्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार क्रीडाशिक्षक श्री.योगेश खराडे यांनी मानले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा संस्थेचे जे. बी. पाटील (उपाध्यक्ष), जे. एन. कराळे (सचिव) आणि आदर्श क्रीडा संस्था सर्व संचालक मंडळ व श्री. राजेंद्र पांढरपट्टे,श्री.मारुती चाळके सर्व क्रीडा शिक्षक, श्री. अमृत शिर्के, श्री. शुभम चव्हाण,विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा