मलकापूर -
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2025- 2026 चा अंतिम निकाल काल जाहीर झाला यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत येत विद्यालयाची उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली. कु. सानवी खराडे -268गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 41वी शहरी सर्वसाधारण विभाग ) तर कु. आराध्या जाधव -262गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत -67वी (शहरी सर्वसाधारण विभाग ) येण्याचा बहुमान मिळविला व कन्याशाळा मलकापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यालयाच्या एकूण सात विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यामध्ये कु.शार्वी जाधव,कु.रेवती तडाखे,कु. अश्विनी कटकदौंड, कु. गार्गी जाधव,कु. सान्वी संकपाळ या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
या सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थिनीचे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण, खजिनदार मा.तुळशीराम शिर्के,मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ.स्वाती थोरात,संचालक मा. प्रा.संजय थोरात,संचालक मा.पवन पाटील सर ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थिनी व पालक यांनी अभिनंदन केले.. व विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला दाद दिली.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे पालक वर्गातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा