Powered By Blogger

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

मलकापूर नगरपरिषद जि. सातारा सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदान जनजागृतीसाठी मलकापूर येथे प्रभातफेरी संपन्न...

मलकापूर नगरपरिषद जि. सातारा सार्वत्रिक निवडणूक 2025
         मतदान जनजागृतीसाठी मलकापूर येथे प्रभातफेरी संपन्न...  
मलकापूर -
      मलकापूर नगरपरिषद मलकापूर जि सातारा येथे  (Sveep) पथकाच्या माध्यमातून कन्या शाळा मलकापूर येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. सदर कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी कल्पना ढवळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री कपिल जगताप, श्री ज्ञानदेव सांळूखे यांच्या मार्गदर्शन लाभले.
           सदर कार्यक्रमास कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुलोचना भिसे मॅडम, पर्यवेक्षिका सौ करुणा शिर्के तसेच स्वीप पथकाच्या नोडल अधिकारी श्रीमती प्रतिभा लोंढे मॅडम तसेच  सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. महेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यानीना  मतदान  जागृती विषयी मार्गदर्शन करून सर्व तरुण मतदारांनी मोठ्या उत्साहाने आपले मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले . सदर कार्यक्रमास, श्री गोविंद पवार, श्री प्रदीप बंडगर, शाहीन मणेर, प्रथमेश देवकुळे व कन्याशाळेचे क्रीडा विभागाचे सौ. संगिता पाटील, हसिनाबेगम  मुल्ला,  योगेश खराडे, मल्हारी शिरतोडे सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनीना  मतदान विषयी शपथ देण्यात आले.व कार्यक्रमाची सांगता झाली.

जिवीका फाउंडेशनच्या वतीने कन्याशाळा मलकापूर येथे एचपीव्ही लसीकरण संपन्न...

जिवीका फाउंडेशनच्या वतीने कन्याशाळा मलकापूर येथे एचपीव्ही लसीकरण संपन्न...
      विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी कन्याशाळेचे आणखी एक पाऊल पुढे.. 
मलकापूर-
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे जिवीका फाउंडेशन यांचे वतीने व कन्याशाळा मलकापूर यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र मिशन अंतर्गत एचपीव्ही ही कर्करोगावरील लस विद्यार्थिनींना देण्यात आली.कन्याशाळेच्या वतीने नेहमीच संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सहशालेय उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थिनी गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जातात त्यात एक पाऊल पुढे म्हणून विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण आयोजित करण्यात आले होते.२८ मार्च २०२५रोजी पहिली लस देण्यात आली तेव्हा १५५ विद्यार्थिनींनी लाभ घेतला तर १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुसरी लस १४०विद्यार्थ्यांना ही लस यशस्वीरित्या देण्यात आली.
       सदर लस जीविका फाउंडेशनचे मा. सुभाष आंग्रे यांच्या पुढाकाराने व डॉ. वैष्णवी विजयकुमार माने व त्यांचा सर्व स्टाफ मा. शितल शिसाळ( नर्स), मा.पल्लवी जाधव(HCA) यांचे सहकार्याने विद्यार्थिनींच्या प्रतिसादात लस देण्यात आली.यावेळी शाळकरी मुलींना गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी केवळ लसीकरणच नव्हे, तर मोहिमेमध्ये जनजागृतीही करण्यात आली ज्यामध्ये समाज, लाभार्थी व त्यांचे पालक यांना गर्भाशयाचे आरोग्य, वेळेत तपासणीचे महत्त्व व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शिक्षित करण्यात आले.यावेळी पालकांची विशेष उपस्थिती होती.
         जीविका फाउंडेशन व कन्या शाळा मलकापूर यांनी विद्यार्थिनी आरोग्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे पालकवर्गातून कौतुक होत आहे...

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धेत मळाईदेवी स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश.🚩🚩🏅🏅

जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धेत मळाईदेवी स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश.
मलकापूर--
          शुक्रवार दि.16 ऑक्टोबर 2025 
 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर पार पाडलेल्या जिल्हास्तरीय शासकीय
मैदानी स्पर्धामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आ. च.विद्यालय मलकापूर,कन्याशाळा मलकापूर, स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल व मळाईदेवी स्पोर्ट्स क्लब ,मलकापूर च्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून संस्थेचे,शाळेचे तसेच क्लब चे नाव उज्वल केले.व मळाईदेवी स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन करून शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागाला साजेशी कामगिरी करीत जिल्हयात आपले वेगळे स्थान निर्माण केले व दिनांक 28/10/2025 ते 30/10/2025 रोजी डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्यांनी आपले स्थान पक्के केले.
         संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांचे  मार्गदर्शन व खेळाडूंचे कष्ट व त्यांना प्रोत्साहन देणारे क्रीडाशिक्षक यांच्या अथक प्रयत्नानेच खेळाडू यशाला गवसणी घालू शकले.
       या सर्व खेळाडूंना NIS कोच मा. प्रतीक कदम व संस्थेच्या सर्व शाखांतील क्रीडा शिक्षक यांची विशेष  मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूची नावे -- *मुलांच्या १७वर्ष वयोगटात* 1)श्रीराज शिनगारे- 100मी प्रथम , 
2)हर्षद पाटील- 100मी धावणे द्वितीय, 200मी धावणे द्वितीय
3)वरद बडेकर -लांब उडी -तृतीय,
4)विराज सुतार -भालाफेक द्वितीय, 
19वर्ष मुले 
5)साई शेलार -भालाफेक प्रथम,थाळी फेक -तृतीय
*१७ वर्ष मुलींच्या गटात* 
1)कु.सानवी शिंगण- उंच उडी -द्वितीय.. 
2)अनुष्का करांडे - लांब उडी द्वितीय 
3) शबु इद्रसी - 100मी,200मी चतुर्थ
19वर्ष मुले   
17 वर्षाखालील मुलांच्या  4×100 व4× 400रिले स्पर्धेत* मुलांचा संघ प्रथम -रिले संघातील खेळाडू..
1)हर्षद पाटील
2)वरद बेडेकर 
3)विशाल कामी              
4)सर्वेश लोखंडे
5)शुभम साळुंखे.              
6)विराज सुतार
       सर्व यशस्वी खेळाडूंचे श्री 
मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा. पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, संस्थेचे संचालक प्रा. संजय थोरात,मा. वसंतराव चव्हाण, मार्गदर्शक संचालिका मा.डॉ.स्वाती थोरात, मलकापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मा. अजितकाका थोरात, सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मलकापूर आदींनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..
   या यशाने  श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

कन्याशाळा मलकापूरची आर्या पवार तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत अव्वल...

कन्याशाळा मलकापूरची आर्या पवार तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत अव्वल...
  मलकापूर ---
     श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरची इयत्ता आठवी ब मधील गुणी विद्यार्थिनी कु.आर्या भगवानराव पवार हिने सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व प्रतियोगितेत प्रथम क्रमांक संपादन करून तालुकास्तरावर शहरी विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.व तिची जिल्हास्तरीय वक्तृत्व प्रतियोगितेसाठी कराड तालुक्यातून निवड झाली. कु.आर्या पवार ही विद्यालयाची गुणी विद्यार्थिनी असून वकृत्व स्पर्धेत सातत्याने सहभागी होऊन स्पर्धेतील महत्व सिद्ध केले आहे.या यशाने कन्याशाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेत संस्थेचे सचिव शेतीमध्ये अशोकराव थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुणांचा विकास करण्याचे काम शाळास्तरावर प्रामाणिकपणे केले जाते.
          कु.आर्या पवार हिला हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ.कुसुम पाटील मॅडम व सर्व शिक्षिका, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
           या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा. पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ.स्वाती रणजीत थोरात, संचालक मा. प्रा.संजय थोरात,मा. वसंतराव चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे पर्यवेक्षक मा.सुरेश राजे,सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,संस्थेचे हितचिंतक पालक व विद्यार्थिनी यांनी विशेष अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
         कु.आर्या पवारचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

संस्थांतर्गत विविध क्रीडा स्पर्धेत कन्याशाळा अव्वल.. क्रीडाविभागाची दमदार कामगिरी...


संस्थांतर्गत विविध क्रीडा स्पर्धेत कन्याशाळा अव्वल.. 
मलकापूर -
             श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी संस्था अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या यामध्ये कन्याशाळा मलकापूरच्या बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ व ॲथलेटिक्स स्पर्धेतील खेळाडूंनी संस्थेच्या सर्व शाळांतील खेळाडूंना नमवून घवघवीत यश संपादन केले.व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
        संस्थांतर्गत 🏸🏸बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी....१७ वर्ष वयोगट संघ प्रथम क्रमांक संघातील खेळाडू १) आदिती सावंत २) वैष्णवी  लावंड ३) श्रेया शिंदे
१४ वर्ष वयोगट संघ --तृतीय क्रमांक  १)कु. तनिष्का  मोरे २)कु.आर्या  मोरे  ३)कु.अनन्या डुबल
      🏆  संस्थांतर्गत स्पर्धेत कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी ♟️♟️बुद्धिबळामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला..
 १२वर्षे वयोगट- कु. आदिती पवार --द्वितीय 
                        कु.अनन्या मोहिते -तृतीय
१४ वर्षे वयोगट- कु.गौरी माने- द्वितीय 
                        कु.शार्वी  जाधव-- तृतीय
१७ वर्षे वयोगट --कु.तेजस्विनी  जाधव - प्रथम                                        कु.अस्मिता मोहिते -- तृतीय
       🏆   संस्थांतर्गत ⚽⚽व्हॉलीबॉल स्पर्धेत कन्याशाळा मलकापूरच्या 14 व 17 वर्षे मुलींच्या संघाने संस्थेत प्रथम येऊन आपली यशाची परंपरा कायम राखली.
  14 वर्षे मुलींच्या संघामध्ये कु. स्नेहा जाधव, कु. सृष्टी कोळेकर, कु.उत्कर्षा संकपाळ, कु. अनुष्का शिर्के, कु. संजना राठोड, कु. सिद्धी ढेबे,कु.जान्हवी कदम, कु.अंजली देशमुख, कु.आर्या मोरे, कु. रेणुका अवघडे, कु. वैभवी कदम, कु.गौरी पुकळे तर 17 वर्षे वयोगटातील संघात कु.वेदिका सुपनेकर,कु.अल्फिया देसाई, कु.दमयंती कळसे, कु.आदिती सावंत,कु. आदिती तारळेकर, कु.अनुष्का जगदाळे, कु.तनुजा तडाखे,कु.आदिती जगदाळे, कु.तनिष्का मोरे, कु. श्रावणी काटकर, कु. सानवी शिंगण, कु. अनन्या डुबल या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ केला व यश संपादन केले.
       🏆 🥇🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🤾संस्थातर्गत मैदानी स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारात कन्याशाच्या 12 14 17 वर्षे वयोगटातील मुलींनी संपादन केले.
 १०वर्ष वयोगट-
 गोळा फेक -कु.विभावरी  जगदाळे- द्वितीय क्रमांक
 १२ वर्षे वयोगट-२०० मीटर धावणे
 कु.राजनंदिनी  पाटील --प्रथम क्रमांक 
गोळा फेक--- कु.राजनंदिनी  पाटील --प्रथम क्रमांक
 कु.आदिती पवार --- तृतीय क्रमांक
 १४ वर्षे वयोगट -
६००मीटर धावणे --तनिष्का मोरे -- प्रथम क्रमांक 
                            सिद्धी ढेबे   --- तृतीय क्रमांक 
गोळा फेक--- कु.तनिष्का मोरे ---प्रथम क्रमांक
कु.जान्हवी कदम -- द्वितीय क्रमांक
17 वर्षे वयोगट
 800 मीटर धावणे
कु. सानवी शिंगण ---प्रथम क्रमांक 
भालाफेक
संस्कृती  सुर्वे --द्वितीय 
गौरवी  पाटील ---तृतीय
          या सर्व यशाने कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा विभागातील कामगिरीचा आलेख उंचावण्यास मदत झाली व ही यशाची परंपरा अखंड ठेवण्यात खेळाडूंना यश आले.
          या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात,  संचालक मा. प्रा. संजय थोरात, संचालकमा. वसंतराव चव्हाण, संस्थेचे पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर ,माजी पथक प्रमुख आर. ए.कुंभार सर व पथकातील सर्व सन्माननीय सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थिनी व पालक यांनी अभिनंदन केले व या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
       या यशाने कन्याशाळेच्या पालक वर्गात कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

कन्याशाळा मलकापूरच्या ४खेळाडूंची विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड...

कन्याशाळा मलकापूरच्या ४ खेळाडूंची विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड... 
मलकापूर-
      जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व श्री मळाईदेवी शिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा ८ सप्टेंबर व ९ सप्टेंबर २०२५ रोजी मलकापूर येथे संपन्न झाल्या.यावेळी स्पर्धेचे उद्घाटन शिवशंकर ज्वेलर्स कराडचे मा.अविनाश जगताप, तालुका क्रीडा अधिकारी मा.रवी पाटील,महालक्ष्मी मोबाईल कराडचे मा. विराज पाटील, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव भाऊ यांचे शुभ हस्ते व उद्योजक लक्ष्मीनारायण सरलाया,मलकापूरचे ग्राममहसू अधिकारी मा. दीपक कानकेकर, एस.बी.आय बँक मलकापूरच्या शाखा व्यवस्थापक मा. सौ.शर्वरी जोशी, केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव,उद्योजक भालचंद्र जोशी,पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे यांचे प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला. सदर स्पर्धेतील सर्वप्रथम प्रथम आणि तृतीय विजेत्या संघास या मान्यवरांच्या शुभहस्ते आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील यशाचे कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी सर्व यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
      सदर स्पर्धेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या १४वर्ष वयोगटातील कु. सिमरा पटेल, कु. अन्वेशा पाटील, कु.जोया पटेल, कु. शिवानी देशमुख, कु. आर्या पवार यांनी तर १७ वर्षे वयोगटातील कु. स्वरा पाटील, कु. वैष्णवी लावंड, कु. समिक्षा मोरे, कु.विभावरी पाटील, कु. आदिती सावंत या खेळाडूंच्या संघांनी  तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच १४ वर्षे वयोगटातून कु. सिमरा पटेल तर १७ वर्षे वयोगटातून कु. स्वरा पाटील, कु. वैष्णवी लावंड,कु.समीक्षा मोरे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ करीत शालेय शासकीय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघातून आपले स्थान पक्की केले.या यशाने क्रीडा विभागाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्यात टेबल टेनिस खेळाडूंना यश मिळाले.
        सर्व खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख श्री.जयवंत पाटील, श्री. योगेश खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
         या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील,खजिनदार मा.तुळशीराम शिर्के,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, संचालक मा.प्रा संजय थोरात, मा. वसंतराव चव्हाण, उद्योजक मा. लक्ष्मीनारायण सरलाया,टेबल टेनिस प्रशिक्षक मा.लक्ष्मण जिरंगे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा.दिलीप चिंचकर,संस्थेचे पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर ,माजी पथक प्रमुख आर. ए.कुंभार सर व पथकातील सर्व सन्माननीय सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
     स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, शिवशंकर ज्वेलर्स कराड,महालक्ष्मी मोबाईल कराड, एस.बी.आय बँक मलकापूर, मा. दीपक कानकेकर, मा. भालचंद्र जोशी,केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव सुप्रीम ग्राफिक्स मलकापूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
      विद्यालयाच्या टेबल टेनिस संघाचे पालकवर्गातून विशेष कौतुक होत आहे..

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न;  गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...