विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी कन्याशाळेचे आणखी एक पाऊल पुढे..
मलकापूर-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे जिवीका फाउंडेशन यांचे वतीने व कन्याशाळा मलकापूर यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र मिशन अंतर्गत एचपीव्ही ही कर्करोगावरील लस विद्यार्थिनींना देण्यात आली.कन्याशाळेच्या वतीने नेहमीच संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सहशालेय उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थिनी गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जातात त्यात एक पाऊल पुढे म्हणून विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण आयोजित करण्यात आले होते.२८ मार्च २०२५रोजी पहिली लस देण्यात आली तेव्हा १५५ विद्यार्थिनींनी लाभ घेतला तर १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुसरी लस १४०विद्यार्थ्यांना ही लस यशस्वीरित्या देण्यात आली.
सदर लस जीविका फाउंडेशनचे मा. सुभाष आंग्रे यांच्या पुढाकाराने व डॉ. वैष्णवी विजयकुमार माने व त्यांचा सर्व स्टाफ मा. शितल शिसाळ( नर्स), मा.पल्लवी जाधव(HCA) यांचे सहकार्याने विद्यार्थिनींच्या प्रतिसादात लस देण्यात आली.यावेळी शाळकरी मुलींना गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी केवळ लसीकरणच नव्हे, तर मोहिमेमध्ये जनजागृतीही करण्यात आली ज्यामध्ये समाज, लाभार्थी व त्यांचे पालक यांना गर्भाशयाचे आरोग्य, वेळेत तपासणीचे महत्त्व व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शिक्षित करण्यात आले.यावेळी पालकांची विशेष उपस्थिती होती.
जीविका फाउंडेशन व कन्या शाळा मलकापूर यांनी विद्यार्थिनी आरोग्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे पालकवर्गातून कौतुक होत आहे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा