Powered By Blogger

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

मोठी स्वप्ने नुसती बघू नका तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा --- आर्किटेकट मा.सौ. कोमल थोरात

मोठी स्वप्ने नुसती बघू नका तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
       --- आर्किटेकट मा. सौ. कोमल थोरात 
मलकापूर --
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा शुभचिंतन व निरोप समारंभ १२फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले..
          यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या व कन्याशाळा मलकापूरच्या माजी विद्यार्थिनी मा.सौ. कोमल थोरात यांनी  दहावीनंतर करिअर कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. तंत्रज्ञानाचा वापर करत ध्यानधारणा  करा असा सल्ला त्यांनी दिला.मोठी स्वप्ने नुसती बघू नका तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
          कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलाने व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी विद्यार्थी मा. कर्नल कुलदीप करपे,प्रमुख पाहुण्या पी. एस. आय मा. सौ. रेखा देशपांडे मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक मलकापूर नगरपरिषद मा.भिमाशंकर माऊर,संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालक वसंतराव चव्हाण, माजी प्राचार्य मा. सुरेश राजे, पथक पर्यवेक्षण प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर, मा.आर.ए.कुंभार सर, मा. यादव सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांची उपस्थिती होती. 
          यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुलोचना भिसे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात  त्यांनी विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना चांगल्या प्रकारचे यश तुम्ही सर्व जणी नक्की मिळवणारच अशी सदिच्छा व्यक्त केली. सर्वांनी धाडसाने परीक्षेला सामोरे जावून  यश मिळवावे असे मुलींना आवाहन केले.
          यानंतर इयत्ता दहावीतील सर्व परीक्षार्थी  विद्यार्थिनींना  सर्व विद्यार्थिनीच्या वतीने  इयत्ता नववीतील कु.सिद्धी पेटले, कु. समृद्धी जगदाळे आणि कु.असिया मत्तेखान यानी शुभेच्छा दिल्या व दहावीतील विद्यार्थिनीच्या सोबत शाळेत व्यतीत केलेला क्षणांना उजाळा देत तुमचे यश आम्हा सर्वाना प्रेरणादायी ठरेल असे मात यावेळी व्यक्त केले.
         दहावीतील कु.स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी, कु.धनश्री संपकाळ, कु. रोहिणी कुंभार, कु.संजना जाधव, कु.भक्ती बळप, कु.आलिशा मुल्ला, कु. वेदिका मस्कर, कु. श्रावणी शिंदे,कु. मधुरा पाटील, कु.अक्षरा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने आम्हाला फक्त शिक्षणाचे धडे दिले नाहीत तर जगण्याची नवी दिशा दिली. ही शाळा फक्त इमारत नाहीतर आमच्या यशाची पायरी आहे. शाळेने आम्हाला समाजात कसे वागायचे हे शिकवले,शाळा फक्त आमच्यासाठी इमारत नाही तर ते दुसरे घर होते असे शाळा माऊली सदैव स्मरणात राहिलअशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
          इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षका सौ. वनिता येडगे यांनी विद्यार्थिनींना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थिनींच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींनी स्वतःच्या क्षमता ओळखून भविष्यात वाटचाल करावी व यशाची शिखरे सर करावीत असे मत व्यक्त केले.
        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पीएसआय सौ. रेखा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींना शुभेच्छा देत खूप चांगलं माणूस बना असा सल्ला दिला.
        कर्नल कुलदीप करपे यांनी मनोगत व्यक्त करताना श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे.आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित करीत एन.डी.ए विषयी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त मुलींनी एन.डी.ए मध्ये सहभागी व्हावे. उद्याची सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग मी तुमच्यात पाहतोय असे भावनिक आवाहन करीत मुलींनी परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. शाळेने विद्यार्थिनीच्यावर भक्कम संस्कार केले असून ज्ञानाची शिदोरीही दिलेली आहे असे सांगत सर्व विद्यार्थिनींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
           यावेळी पथक पर्यवेक्षण प्रमुख श्री.शरदराव चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असेल तर यश नक्की संपादन करू शकतो. ध्येय निश्चित करा  आणि संघर्षाने परीक्षेला सामोरे जा असे आवाहन  त्यांनी केले.
       
      कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमाशंकर माऊर यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थिनीनी परीक्षेला धैर्याने सामोरे जावे व कन्याशाळा मलकापूरची यशाची परंपरा अखंड ठेवावी. आपले व आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य पेन या साहित्याचे वाटप करण्याचे जाहीर केले व  याच्या बळावर विद्यार्थिनींनी आपले भविष्य  उज्ज्वल करावे असे भावनिक आवाहन केले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका मा.सौ.करुणा शिर्के यांनी मानले. यावेळी माता -पालक व शिक्षक -पालक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनीनी परीक्षेला धैर्याने सामोरे जावे व कन्याशाळा मलकापूरची यशाची परंपरा अखंड ठेवावी.--- नगरसेवक मा. भिमाशंकर माऊर

विद्यार्थिनीनी परीक्षेला धैर्याने सामोरे जावे व कन्याशाळा मलकापूरची यशाची परंपरा अखंड ठेवावी..
       --- नगरसेवक भिमाशंकर माऊर 
मलकापूर --
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा शुभचिंतन व निरोप समारंभ १२फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले..
          कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भिमाशंकर माऊर यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थिनीनी परीक्षेला धैर्याने सामोरे जावे व कन्याशाळा मलकापूरची यशाची परंपरा अखंड ठेवावी. आपले व आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य पेन या साहित्याचे वाटप करण्याचे जाहीर केले व याच्या बळावर विद्यार्थिनींनी आपले भविष्य उज्ज्वल करावे असे भावनिक आवाहन केले.
          कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलाने व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी विद्यार्थी मा. कर्नल कुलदीप करपे,प्रमुख पाहुण्या पी. एस. आय मा. सौ. रेखा देशपांडे मॅडम,संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालक वसंतराव चव्हाण, माजी प्राचार्य मा. सुरेश राजे, पथक पर्यवेक्षण प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर, मा.आर.ए.कुंभार सर, मा. यादव सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांची उपस्थिती होती. 
          यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुलोचना भिसे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना चांगल्या प्रकारचे यश तुम्ही सर्व जणी नक्की मिळवणारच अशी सदिच्छा व्यक्त केली. सर्वांनी धाडसाने परीक्षेला सामोरे जावून यश मिळवावे असे मुलींना आवाहन केले.
          यानंतर इयत्ता दहावीतील सर्व परीक्षार्थी विद्यार्थिनींना सर्व विद्यार्थिनीच्या वतीने इयत्ता नववीतील कु.सिद्धी पेटले, कु. समृद्धी जगदाळे आणि कु.असिया मत्तेखान यानी शुभेच्छा दिल्या व दहावीतील विद्यार्थिनीच्या सोबत शाळेत व्यतीत केलेला क्षणांना उजाळा देत तुमचे यश आम्हा सर्वाना प्रेरणादायी ठरेल असे मात यावेळी व्यक्त केले.
         दहावीतील कु.स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी, कु.धनश्री संपकाळ, कु. रोहिणी कुंभार, कु.संजना जाधव, कु.भक्ती बळप, कु.आलिशा मुल्ला, कु. वेदिका मस्कर, कु. श्रावणी शिंदे,कु. मधुरा पाटील, कु.अक्षरा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने आम्हाला फक्त शिक्षणाचे धडे दिले नाहीत तर जगण्याची नवी दिशा दिली. ही शाळा फक्त इमारत नाहीतर आमच्या यशाची पायरी आहे. शाळेने आम्हाला समाजात कसे वागायचे हे शिकवले,शाळा फक्त आमच्यासाठी इमारत नाही तर ते दुसरे घर होते असे शाळा माऊली सदैव स्मरणात राहिलअशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
          इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षका सौ. वनिता येडगे यांनी विद्यार्थिनींना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थिनींच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींनी स्वतःच्या क्षमता ओळखून भविष्यात वाटचाल करावी व यशाची शिखरे सर करावीत असे मत व्यक्त केली.
       कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पी.एस.आय सौ. रेखा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींना शुभेच्छा देत खूप चांगलं माणूस बना असा सल्ला दिला.
        कर्नल कुलदीप करपे यांनी मनोगत व्यक्त करताना श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे.आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित करीत एन.डी.ए विषयी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त मुलींनी एन.डी.ए मध्ये सहभागी व्हावे. उद्याची सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग मी तुमच्यात पाहतोय असे भावनिक आवाहन करीत मुलींनी परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. शाळेने विद्यार्थिनीच्यावर भक्कम संस्कार केले असून ज्ञानाची शिदोरीही दिलेली आहे असे सांगत सर्व विद्यार्थिनींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
           यावेळी पथक पर्यवेक्षण प्रमुख श्री.शरदराव चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असेल तर यश नक्की संपादन करू शकतो. ध्येय निश्चित करा आणि संघर्षाने परीक्षेला सामोरे जा असे आवाहन त्यांनी केले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका मा.सौ.करुणा शिर्के यांनी मानले. यावेळी माता -पालक व शिक्षक -पालक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग मी तुमच्यात पाहतोय ---मा.कर्नल कुलदीप करपे...

सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग मी तुमच्यात पाहतोय ---मा.कर्नल कुलदीप करपे..
        NDA मध्ये जाण्याचे केले विद्यार्थिनींना आवाहन....
मलकापूर --
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा शुभचिंतन व निरोप समारंभ १२फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले..
       यावेळी बोलताना ते म्हणाले, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे.आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित करीत एन.डी.ए विषयी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त मुलींनी एन.डी.ए मध्ये सहभागी व्हावे. उद्याची सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग मी तुमच्यात पाहतोय असे भावनिक आवाहन करीत मुलींनी परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलाने व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व कन्याशाळेच्या माजी विद्यार्थिनी आर्किटेकट सौ. कोमल थोरात, प्रमुख पाहुण्या पी. एस. आय मा. सौ. रेखा देशपांडे मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक मलकापूर नगरपरिषद मा.भिमाशंकर माऊर,संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालक वसंतराव चव्हाण, माजी प्राचार्य मा. सुरेश राजे, पथक पर्यवेक्षण प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर, मा.आर.ए.कुंभार सर, मा. यादव सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांची उपस्थिती होती. 
       यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुलोचना भिसे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना चांगल्या प्रकारचे यश तुम्ही सर्व जणी नक्की मिळवणारच अशी सदिच्छा व्यक्त केली. सर्वांनी धाडसाने परीक्षेला सामोरे जावून यश मिळवावे असे मुलींना आवाहन केले.
          यानंतर इयत्ता दहावीतील सर्व परीक्षार्थी विद्यार्थिनींना सर्व विद्यार्थिनीच्या वतीने इयत्ता नववीतील कु.सिद्धी पेटले, कु. समृद्धी जगदाळे आणि कु.असिया मत्तेखान यानी शुभेच्छा दिल्या व दहावीतील विद्यार्थिनीच्या सोबत शाळेत व्यतीत केलेला क्षणांना उजाळा देत तुमचे यश आम्हा सर्वाना प्रेरणादायी ठरेल असे मात यावेळी व्यक्त केले.
         दहावीतील कु.स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी, कु.धनश्री संपकाळ, कु. रोहिणी कुंभार,कु.संजना जाधव, कु.भक्ती बळप,कु.आलिशा मुल्ला, कु. वेदिका मस्कर, कु. श्रावणी शिंदे,कु. मधुरा पाटील, कु.अक्षरा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने आम्हाला फक्त शिक्षणाचे धडे दिले नाहीत तर जगण्याची नवी दिशा दिली. ही शाळा फक्त इमारत नाहीतर आमच्या यशाची पायरी आहे. शाळेने आम्हाला समाजात कसे वागायचे हे शिकवले,शाळा फक्त आमच्यासाठी इमारत नाही तर ते दुसरे घर होते असे शाळा माऊली सदैव स्मरणात राहिलअशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पी.एस.आय सौ. रेखा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींना शुभेच्छा देत खूप चांगलं माणूस बना असा सल्ला दिला.
      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. शाळेने विद्यार्थिनीच्यावर भक्कम संस्कार केले असून ज्ञानाची शिदोरीही दिलेली आहे असे सांगत सर्व विद्यार्थिनींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
           यावेळी पथक पर्यवेक्षण प्रमुख श्री.शरदराव चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असेल तर यश नक्की संपादन करू शकतो. ध्येय निश्चित करा आणि संघर्षाने परीक्षेला सामोरे जा असे आवाहन त्यांनी केले.
       प्रमुख पाहुण्या सौ. कोमल थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दहावीनंतर करिअर कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. तंत्रज्ञानाचा वापर करत ध्यानधारणा करा असा सल्ला त्यांनी दिला.मोठी स्वप्ने नुसती बघू नका तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमाशंकर माऊर यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थिनीनी परीक्षेला धैर्याने सामोरे जावे व कन्याशाळा मलकापूरची यशाची परंपरा अखंड ठेवावी. आपले व आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य पेन या साहित्याचे वाटप करण्याचे जाहीर केले व याच्या बळावर विद्यार्थिनींनी आपले भविष्य उज्ज्वल करावे असे भावनिक आवाहन केले.
            इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षका सौ. वनिता येडगे यांनी विद्यार्थिनींना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थिनींच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींनी स्वतःच्या क्षमता ओळखून भविष्यात वाटचाल करावी व यशाची शिखरे सर करावीत असे मत व्यक्त केले
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका मा.सौ.करुणा शिर्के यांनी मानले. यावेळी माता -पालक व शिक्षक -पालक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

कन्याशाळा मलकापूरची कु.आर्या भगवानराव पवार वक्तृत्व स्पर्धेत शहरी विभागातून प्रथम...

हिंदी अध्यापक मंडळाचा जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर...
       कन्याशाळा मलकापूरची कु.आर्या भगवानराव पवार शहरी विभागातून प्रथम...
           🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
     ----------------------------------------
     मलकापूर ----
         माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवीसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कु.आर्या भगवानराव पवार हिने शहरी विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला व कन्याशाळा मलकापूरच्या शैक्षणिक शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.
            सदर स्पर्धा रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी संभाजीनगर सातारा या ठिकाणी राष्ट्रभाषा भवन व भारत विद्यामंदिर मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल कार्याध्यक्ष नेताजी ननावरे व कार्यवाहक अनंत यादव यांनी जाहीर केला.शहरी विभागातून ४९विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये कु. आर्या पवार हिने बाजी मारली.
             तिला हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ.कुसुम पाटील तिचे आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले.
           या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ,राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी,सचिव हणमंत सूर्यवंशी, राज्य परीक्षा मंत्री सुधाकर माने,संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील,खजिनदार मा.तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, संचालक मा.वसंतराव चव्हाण, मा.प्रा.संजय थोरात, सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के, वडील ग्रामसेवक मा.भगवानराव पवार, आई सौ.जयश्री पवार,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
         कु.आर्या पवार हिचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

जिल्हास्तरीय सबज्युनियर स्पर्धेत कन्याशाळा मलकापूरचे यश..

जिल्हास्तरीय सबज्युनियर स्पर्धेत कन्याशाळा मलकापूरचे यश..
        असिया बागवान गोळा फेक मध्ये तृतीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड..

 मलकापूर --
           श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरची खेळाडू विद्यार्थिनी कु. असिया बागवान हिने सातारा जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने म्हसवड येथे २९जानेवारी २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सबज्यूनिअर स्पर्धेमध्ये १२ वर्ष मुलींच्या गटात गोळा फेक या क्रीडाप्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला व तिची ७जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १२वर्षे मुलींच्या वयोगटात गोळा फेक या क्रीडा प्रकारात तिने 7. 80 मीटर गोळा फेक करून स्पर्धेत वैयक्तिक चांगली कामगिरी केली.
      तिला क्रीडाविभाग प्रमुख सौ. हसीनाबेगम मुल्ला यांचे मार्गदर्शन तर क्रीडाशिक्षिका सौ. संगिता पाटील, सौ. सविता कोळी, श्री. योगेश खराडे, श्री. मल्हारी शिरतोडे यांचे सहकार्य लाभले. 
          या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ. स्वाती थोरात, संचालक मा.वसंतराव चव्हाण, मा. प्रा.संजय थोरात,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के,सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
      तिच्या या निवडीचे पालकवर्गातून कौतुक होत आहे.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न;  गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...