मलकापूर:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेने आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील तब्बल ९ विद्यार्थिनीं उत्तीर्ण झाल्या असून, कु. मनस्वी दिग्विजय शेटके हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १९२ वे स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.व
गुणवत्तेचा आलेख उंचावला.
यावर्षीच्या निकालावरून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख कमालीचा उंचावल्याचे दिसून येत आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनींपैकी तब्बल नऊ विद्यार्थिनींनी अत्यंत चांगल्या गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये कुमारी मनस्वी दिग्विजय शेटके हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १९२ वा तर तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत २६ वा क्रमांक पटकावून सुवर्णयश मिळवले. सोबतच शाळेतील कु.आराध्या यादव, कु.त्रिशा शिर्के,कु.समृद्धी कांबळे,कु.आरोही तडाखे,कु.आर्या जाधव,कु.विभावरी जगदाळे,कु.रिचा कुंभार,कु.सफा मुल्ला
या आठ विद्यार्थिनींनीही घवघवीत यश संपादन करत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले हे यश शाळेच्या शैक्षणिक दर्जाची आणि शिक्षकांच्या अविरत परिश्रमाची साक्ष देते.सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव व शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळातील सदस्य ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के ,सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे मलकापूर परिसरात कन्याशाळेचे व विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा