Powered By Blogger

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

कन्याशाळा मलकापूरची आर्या पवार तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत अव्वल...

कन्याशाळा मलकापूरची आर्या पवार तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत अव्वल...
  मलकापूर ---
     श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरची इयत्ता आठवी ब मधील गुणी विद्यार्थिनी कु.आर्या भगवानराव पवार हिने सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व प्रतियोगितेत प्रथम क्रमांक संपादन करून तालुकास्तरावर शहरी विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.व तिची जिल्हास्तरीय वक्तृत्व प्रतियोगितेसाठी कराड तालुक्यातून निवड झाली. कु.आर्या पवार ही विद्यालयाची गुणी विद्यार्थिनी असून वकृत्व स्पर्धेत सातत्याने सहभागी होऊन स्पर्धेतील महत्व सिद्ध केले आहे.या यशाने कन्याशाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेत संस्थेचे सचिव शेतीमध्ये अशोकराव थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुणांचा विकास करण्याचे काम शाळास्तरावर प्रामाणिकपणे केले जाते.
          कु.आर्या पवार हिला हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ.कुसुम पाटील मॅडम व सर्व शिक्षिका, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
           या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा. पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ.स्वाती रणजीत थोरात, संचालक मा. प्रा.संजय थोरात,मा. वसंतराव चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे पर्यवेक्षक मा.सुरेश राजे,सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,संस्थेचे हितचिंतक पालक व विद्यार्थिनी यांनी विशेष अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
         कु.आर्या पवारचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

संस्थांतर्गत विविध क्रीडा स्पर्धेत कन्याशाळा अव्वल.. क्रीडाविभागाची दमदार कामगिरी...


संस्थांतर्गत विविध क्रीडा स्पर्धेत कन्याशाळा अव्वल.. 
मलकापूर -
             श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी संस्था अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या यामध्ये कन्याशाळा मलकापूरच्या बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ व ॲथलेटिक्स स्पर्धेतील खेळाडूंनी संस्थेच्या सर्व शाळांतील खेळाडूंना नमवून घवघवीत यश संपादन केले.व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
        संस्थांतर्गत 🏸🏸बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी....१७ वर्ष वयोगट संघ प्रथम क्रमांक संघातील खेळाडू १) आदिती सावंत २) वैष्णवी  लावंड ३) श्रेया शिंदे
१४ वर्ष वयोगट संघ --तृतीय क्रमांक  १)कु. तनिष्का  मोरे २)कु.आर्या  मोरे  ३)कु.अनन्या डुबल
      🏆  संस्थांतर्गत स्पर्धेत कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी ♟️♟️बुद्धिबळामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला..
 १२वर्षे वयोगट- कु. आदिती पवार --द्वितीय 
                        कु.अनन्या मोहिते -तृतीय
१४ वर्षे वयोगट- कु.गौरी माने- द्वितीय 
                        कु.शार्वी  जाधव-- तृतीय
१७ वर्षे वयोगट --कु.तेजस्विनी  जाधव - प्रथम                                        कु.अस्मिता मोहिते -- तृतीय
       🏆   संस्थांतर्गत ⚽⚽व्हॉलीबॉल स्पर्धेत कन्याशाळा मलकापूरच्या 14 व 17 वर्षे मुलींच्या संघाने संस्थेत प्रथम येऊन आपली यशाची परंपरा कायम राखली.
  14 वर्षे मुलींच्या संघामध्ये कु. स्नेहा जाधव, कु. सृष्टी कोळेकर, कु.उत्कर्षा संकपाळ, कु. अनुष्का शिर्के, कु. संजना राठोड, कु. सिद्धी ढेबे,कु.जान्हवी कदम, कु.अंजली देशमुख, कु.आर्या मोरे, कु. रेणुका अवघडे, कु. वैभवी कदम, कु.गौरी पुकळे तर 17 वर्षे वयोगटातील संघात कु.वेदिका सुपनेकर,कु.अल्फिया देसाई, कु.दमयंती कळसे, कु.आदिती सावंत,कु. आदिती तारळेकर, कु.अनुष्का जगदाळे, कु.तनुजा तडाखे,कु.आदिती जगदाळे, कु.तनिष्का मोरे, कु. श्रावणी काटकर, कु. सानवी शिंगण, कु. अनन्या डुबल या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ केला व यश संपादन केले.
       🏆 🥇🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🤾संस्थातर्गत मैदानी स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारात कन्याशाच्या 12 14 17 वर्षे वयोगटातील मुलींनी संपादन केले.
 १०वर्ष वयोगट-
 गोळा फेक -कु.विभावरी  जगदाळे- द्वितीय क्रमांक
 १२ वर्षे वयोगट-२०० मीटर धावणे
 कु.राजनंदिनी  पाटील --प्रथम क्रमांक 
गोळा फेक--- कु.राजनंदिनी  पाटील --प्रथम क्रमांक
 कु.आदिती पवार --- तृतीय क्रमांक
 १४ वर्षे वयोगट -
६००मीटर धावणे --तनिष्का मोरे -- प्रथम क्रमांक 
                            सिद्धी ढेबे   --- तृतीय क्रमांक 
गोळा फेक--- कु.तनिष्का मोरे ---प्रथम क्रमांक
कु.जान्हवी कदम -- द्वितीय क्रमांक
17 वर्षे वयोगट
 800 मीटर धावणे
कु. सानवी शिंगण ---प्रथम क्रमांक 
भालाफेक
संस्कृती  सुर्वे --द्वितीय 
गौरवी  पाटील ---तृतीय
          या सर्व यशाने कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा विभागातील कामगिरीचा आलेख उंचावण्यास मदत झाली व ही यशाची परंपरा अखंड ठेवण्यात खेळाडूंना यश आले.
          या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात,  संचालक मा. प्रा. संजय थोरात, संचालकमा. वसंतराव चव्हाण, संस्थेचे पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर ,माजी पथक प्रमुख आर. ए.कुंभार सर व पथकातील सर्व सन्माननीय सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थिनी व पालक यांनी अभिनंदन केले व या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
       या यशाने कन्याशाळेच्या पालक वर्गात कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

कन्याशाळा मलकापूरच्या ४खेळाडूंची विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड...

कन्याशाळा मलकापूरच्या ४ खेळाडूंची विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड... 
मलकापूर-
      जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व श्री मळाईदेवी शिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा ८ सप्टेंबर व ९ सप्टेंबर २०२५ रोजी मलकापूर येथे संपन्न झाल्या.यावेळी स्पर्धेचे उद्घाटन शिवशंकर ज्वेलर्स कराडचे मा.अविनाश जगताप, तालुका क्रीडा अधिकारी मा.रवी पाटील,महालक्ष्मी मोबाईल कराडचे मा. विराज पाटील, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव भाऊ यांचे शुभ हस्ते व उद्योजक लक्ष्मीनारायण सरलाया,मलकापूरचे ग्राममहसू अधिकारी मा. दीपक कानकेकर, एस.बी.आय बँक मलकापूरच्या शाखा व्यवस्थापक मा. सौ.शर्वरी जोशी, केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव,उद्योजक भालचंद्र जोशी,पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे यांचे प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला. सदर स्पर्धेतील सर्वप्रथम प्रथम आणि तृतीय विजेत्या संघास या मान्यवरांच्या शुभहस्ते आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील यशाचे कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी सर्व यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
      सदर स्पर्धेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या १४वर्ष वयोगटातील कु. सिमरा पटेल, कु. अन्वेशा पाटील, कु.जोया पटेल, कु. शिवानी देशमुख, कु. आर्या पवार यांनी तर १७ वर्षे वयोगटातील कु. स्वरा पाटील, कु. वैष्णवी लावंड, कु. समिक्षा मोरे, कु.विभावरी पाटील, कु. आदिती सावंत या खेळाडूंच्या संघांनी  तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच १४ वर्षे वयोगटातून कु. सिमरा पटेल तर १७ वर्षे वयोगटातून कु. स्वरा पाटील, कु. वैष्णवी लावंड,कु.समीक्षा मोरे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ करीत शालेय शासकीय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघातून आपले स्थान पक्की केले.या यशाने क्रीडा विभागाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्यात टेबल टेनिस खेळाडूंना यश मिळाले.
        सर्व खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख श्री.जयवंत पाटील, श्री. योगेश खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
         या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील,खजिनदार मा.तुळशीराम शिर्के,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, संचालक मा.प्रा संजय थोरात, मा. वसंतराव चव्हाण, उद्योजक मा. लक्ष्मीनारायण सरलाया,टेबल टेनिस प्रशिक्षक मा.लक्ष्मण जिरंगे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा.दिलीप चिंचकर,संस्थेचे पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण सर ,माजी पथक प्रमुख आर. ए.कुंभार सर व पथकातील सर्व सन्माननीय सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
     स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, शिवशंकर ज्वेलर्स कराड,महालक्ष्मी मोबाईल कराड, एस.बी.आय बँक मलकापूर, मा. दीपक कानकेकर, मा. भालचंद्र जोशी,केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव सुप्रीम ग्राफिक्स मलकापूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
      विद्यालयाच्या टेबल टेनिस संघाचे पालकवर्गातून विशेष कौतुक होत आहे..

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

५५वा महिला मेळावा मलकापूर येथे महिलांच्या उस्फूर्त सहभागाने संपन्न.. मलकापूरमध्ये अवतरल्या गौराई..


५५वा महिला मेळावा मलकापूर येथे  महिलांच्या उस्फूर्त सहभागाने संपन्न.
     मलकापूरमध्ये अवतरल्या  गौराई..
मलकापूर-
     श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी व श्री मळाई महिला विकास मंच मलकापूर यांचे संयुक्त विदयमाने मलकापूर, आगाशिवनगर पंचक्रोशीतील महिलांसाठी घेण्यात आलेला महिला मेळावा शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात व महिलांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडला. प्रमुख पाहुण्या  हेल्दी  मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख योगशिक्षिका मा. सौ. स्मिता हिम्मत वेल्हाळ,  कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपनिबंधक सहकारी संस्था कराडच्या मा. श्रीमती अपर्णा यादव, मा. सौ.शालिनीताई थोरात (काकी), श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाइस चेअरमन मा. सौ. अरुणादेवी पाटील श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्याक्षा डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.
         कार्यक्रमाच्या पाहुण्या मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
       प्रास्ताविकपर भाषणात श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी महिला मेळावा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करीत मळाई महिला विकास मंच नेहमीच महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलाच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारच तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.सुखाचे सण म्हणजेच मंगळागौर होय. या संस्कृतीचे आपणांस जतन करायचे आहे. यावेळी पिंगळ्याच्या गाण्यातून विरोधाभास वाटत असला तरी त्यामधून नात्यांची  जपणूक कशी करावी हे सांगितले आहे असे मत व्यक्त केले.
     यावेळी हेल्दी मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली मंगळागौर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षिका महिला पालक यांनी वेगवेगळे गीतांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून कार्यक्रमांमध्ये बहार आणली. यामध्ये गणेश वंदनापासून ते गौरी गणपतीच्या विविध  गाण्यांवर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी मळा ई महिला विकास मंचच्या वतीने सहभागी महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
           या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शाळेतील शिक्षिका, महिला पालक वर्ग यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन या महिला मिळवणारे खऱ्या अर्थाने  कोणत्याही क्षेत्रात कमी नसतात हे या निमित्ताने अधोरेखित केले. तसेच महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही प्रकारचे सीमा नसते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे  घराला घरपण देणारी महिला अर्थात गृहिणी ते आपले आवडते छंद तितक्याच ताकदीने जोपसणारी कलारसिक, कलाउपासक असा तिचा कल  असेच काही चित्र या महिला मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले.
         कन्याशाळा मलकापूरच्या जान्हवी शिंदे व गौरी येडगे यांनी कठीण समजला जाणारा काटवट कणा हा मंगळागौरीतला एक खेळ प्रकार करून दाखवला व सर्वांची मने जिंकली आणि बक्षीस मिळवले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.शीला पाटील,  प्रा. सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले तर आभार माजी व्हाईस चेअरमन मा.सौ अरुणादेवी पाटील यांनी मानले. 
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मळाई महिला विकास मंचच्या सर्व सदस्या, सर्व शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त  कलागुणांना वाव देण्यासाठी श्री
 मळाई महिला विकास मंचने आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याचे महिला पालक वर्गामध्ये विशेष कौतुक होत आहे..

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

श्री मळाई महिला विकास मंच वतीने ५५ व्या महिला मेळाव्याचे आयोजन...


श्री मळाई महिला विकास मंच वतीने ५५ व्या महिला मेळाव्याचे आयोजन...
      मलकापूरमध्ये रंगणार मंगळागौरीचा जागर...

    मलकापूर-
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाई नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी व श्री मळाई महिला विकास मंच मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  मलकापूर,आगाशिवनगर पंचक्रोशीतील महिलांसाठी  शनिवार दि. १३सप्टेंबर २०२५ रोजी दु. २. ३० वाजता आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी श्री मळाई महिला विकास  मंचाच्या वतीने 55 महिला मेळावा घेण्यात येणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून योग शिक्षिका हेल्दी योगा मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख मा. सौ. स्मिता हिम्मत वेल्हाळ व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था कराड  मा. श्रीमती अपर्णा यादव या आहेत व यावेळी सौ. शालिनीताई अशोकराव थोरात (काकी),श्री मळाईदेवी  नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमन सौ. अरुणादेवी पाटील, श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा  डॉ. सौ स्वाती थोरात यांची विशेष उपस्थिती असणार  आहे.        
     हिंदू धर्मात सणाला खूप महत्त्व आहे.श्रावण महिन्यात येणारा सण म्हणजे मंगळागौरी.पावसाचे रिमझिम सरी,हिरवागार निसर्ग, विविध सन या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्य यांनी भारावलेले असते.अशा दुर्मिळ वातावरणाचा जोश आणि ठासून भरल्या उत्साहाची जोड मिळते ती मंगळागौरीच्या खेळामुळे. मंगळागौरीचे खेळ त्यातील गाणी, काव्य हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच होय.हा ठेवा जतन व्हावा,नव्या पिढीला मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने श्री मळाई महिला विकास मलकापूर यांनी हा मेळावा पंचक्रोशीतील महिलांसाठी आयोजित केला आहे.
          मंगळागौर घेण्यासाठी हेल्दी योगायोग मंगळागौर ग्रुप मंगळागौर ग्रुप येत आहे तरी या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकता आणि आपल्या आनंददायी अनोख्या पर्वणीचे साक्षीदार होऊ शकता, सोबत तुमच्यासाठी भेटवस्तूंचा नजराणा आहे आणि त्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण आहे तरी पंचक्रोशीतील महिलांनी कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री मळाई महिला विकास मंचच्या वतीने कार्याध्यक्षा डॉ.सौ. स्वाती थोरात यांनी केले आहे.

 55 व्या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्ये
१)महिलांसाठी मंगळागौरी चे खेळ, गाणी याद्वारे महिलांच्या कलागुणांना वाव..
२)कराड मधील हेल्दी योगा  मंगळागौर ग्रुपचा पुढाकार
३) महिलांसाठी आकर्षक भेट वस्तूंचा नजराणा...
४) मंगळागौरीच्या माध्यमातून सांस्कृतिक  वारसाचे केले जाणार जतन...
५) चालू वर्षीही श्री मळाई महिला विकास मंचचा सामाजिक उपक्रमात पुढाकार व श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची लाभणार साथ.

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

कन्याशाळा मलकापूरच्या सर्व भूगोलप्रेमी विद्यार्थिनींसाठी "ब्लड मून "पाहण्याची अनोखी संधी

🌍🌚🌙🌒🌑🔭🔭🔭📚 *      
   कन्याशाळा मलकापूरच्या सर्व भूगोलप्रेमी विद्यार्थिनींसाठी "ब्लड मून ""पाहण्याची अनोखी संधी. ही संधी कोणीही गमावू नका..तसेच सोमवारी हा आपण अनुभवलेला हा क्षण निबंध रूपाने मांडण्याची संधी मिळेल व विद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट तीन निबंधास मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे शुभहस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अवकाशातील घडामोडींची माहिती फक्त आपल्या कन्याशाळेच्या ग्रुपवर आणि आपल्या  कन्याशाळा मलकापूरच्या ब्लॉगवर पहायला मिळेल.तर चला निबंध स्पर्धेत सहभागी होऊया. व उद्याचा क्षण नक्की अनुभवूया.... 👍* 
         विद्यार्थिनींनो उद्या ७सप्टेंबर २०२५..उद्या खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असून ज्यावेळी पृथ्वी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात ज्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते या स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीच्या उपभू स्थितीत असेल तेव्हा पृथ्वीची दाट सावली चंद्रावर पडून चंद्र पूर्ण झाकला जाईल त्यावेळेला होणार हे ग्रहण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण..खगोलशास्त्रज्ञ या चंद्रग्रहणाला 'ब्लड मून' म्हणत आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा चंद्र आकाशात पूर्णपणे लाल दिसतो.    उद्या आपल्याला भारतामध्ये बघता येणार आहे तर त्यासाठी आपण हे ग्रहण कसे पाहू शकतो व या ग्रहणाचा कालावधी किती आहे. या ग्रहणाचा आपल्यावर काही परिणाम होतो की नाही यासंबंधीच्या सर्व खगोलशास्त्रीय घडामोडींची माहिती आपण जाणून घेऊया तर चला मग....
         1️⃣   हे चंद्रग्रहण कोणकोणत्या देशांत दिसणार व किती वाजता आहे व किती वेळ आहे.❔
           युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. तर भारतासाठी संवेदनशील असेल. भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल. आणि त्याचा सूतक काळ दुपारी 12.57 च्या 9 तास अगोदर असणार आहे.हे ग्रहण भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 11 वाजून 1 मिनिटांपासून पुढे 1 वाजून 26 मिनिटांपर्यंत हे ग्रहण शिगेला पोहोचेल. आपल्या देशात या चंद्रग्रहणाचा कालावधी 3 तास 29 मिनिटांचा असेल. हा खुप कमी कालावधी आहे. 
     2️⃣ सूतक काळ किती वाजता सुरू होईल❔
हे ग्रहण भारतात दिसेल, त्यामुळे त्याचा सूतककाळही वैध असेल. चांद्र दिनदर्शिकेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो. आगामी चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सुरू होणार आहे.
 3️⃣चंद्रग्रहणाची सुरुवात पितृपक्षापासून होते❔
हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला होणार आहे. पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेपासून होते. पौर्णिमा तिथीचे श्राद्ध 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी केले जाते. अशा वेळी पितृपक्षाशी संबंधित विधी आणि श्राद्धकर्म सूतक काळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत, असा सल्ला ज्योतिषी देतात.

 4️⃣ब्लड मून म्हणजे काय?चंद्रग्रहण कधी होते
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी जेव्हा आपल्या कक्षेत फिरत असताना सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा ती सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते. अशा वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचा रंग काळा किंवा लाल दिसू लागतो. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात.खगोलशास्त्रज्ञांच्या मते या स्थितीलाच ब्लड मून असे म्हणतात..
 5️⃣चंद्रग्रहण कसे बघाल 
   चंद्रग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी बघणे टाळा आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष गॉगल  जे ISO 12312-2 प्रमाणित असतात.जेणेकरून डोळ्यांना हानी होणार नाही. ग्रहण काळात शक्यतोवर खाणे-पिणे टाळावे आणि उपवास करणे योग्य मानले जाते, तसेच शुभ कार्ये करू नयेत. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतोवर घरातच थांबावे, असे सांगितले जाते.  
     
 *वैज्ञानिक दृष्ट्या:
ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि ती पाहिल्याने डोळ्यांना थेट अपाय होत नाही, जर तुम्ही योग्य साधनांचा वापर केला असेल.  
इतर टीप्स: 
ग्रहण हे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे होते.
ग्रहण पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होऊ शकतो, परंतु योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

👆👆👆👆👆👆👆👆👆

🌍🌚🌙🌒🌑🔭🔭🔭📚

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

शिक्षणक्षेत्रातील शिक्षकांचे महत्व सूर्यासारखे नेहमीच तळपत राहील-मा.डॉ. राजेंद्र कंटक

शिक्षणक्षेत्रातील शिक्षकांचे महत्व सूर्यासारखे नेहमीच तळपत राहील-मा.डॉ. राजेंद्र कंटक
मलकापूर--
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती थोर विचारवंत, ज्ञानाचा दीप लावून अज्ञानाचा अंध:कार दूर करणारे संस्काराची शिदोरी देणारे व यशस्वी जीवनाचा मार्ग दाखविणारे समाजाला योग्य दिशा दाखवणारे शिक्षक  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांचा जन्मदिन व सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार समारंभ अर्थात  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् जयंती शिक्षक दिन समारंभ गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. राजेंद्र कंटक यांनी यावेळी  हे मत व्यक्त केले.  यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची आजची शोकांतिका सांगत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भूमिका पार पाडत असतात.त्याचबरोबर ज्ञानाबरोबर संस्कार करत असतात विद्यार्थी दशेमध्ये शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेमुळेच आज मी यशस्वी झालो  असे मत व्यक्त करीत त्यांनी शिक्षकांविषयी  कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे महत्त्व सूर्याप्रमाणे नेहमीच तळपत राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
      डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहूणे डॉ. राजेंद्र कंटक यांचे शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्तिथीत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ प्रमुख पाहुणे चेअरमन श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी मा.अजित थोरात, संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा. पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालक वसंतराव चव्हाण, संचालक मा.प्रा. संजय थोरात,सौ शालिनीताई थोरात, मारुती सुझुकीच्या प्रतिनिधी मा. सेजल अग्रवाल तसेच व्हा.चेअरमन मा. चंद्रकांत टंकसाळे, माजी व्हाईस चेअरमन सौ.अरुणादेवी पाटील विद्यमान संचालिका सौ. उज्वला पाटील, शाखाप्रमुख  मा. सर्जेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         प्रास्ताविकपर भाषणात डॉ.सौ. स्वाती थोरात यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे वर्णन केले. शिक्षक समाज घडवतो, परिवर्तन घडवतो, चारित्र्य घडवण्यासाठी ज्ञान देतो.समाजाची घडी बसवायची असेल तर शाळा एक हे एकच माध्यम आहे. व्यक्तिमत्व घडवण्याचे,समाज उभारण्याचे काम शिक्षकच करतो.राष्ट्र घडवण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे ते आपण यंत्रमानवावर सोपवू शकत नाही असे मत सद्यस्थितीतील येऊ घातलेल्या शिक्षण क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाविषयी  आपले परखड मत व्यक्त केले.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरणाची सर्व उपस्थित  शिक्षक बांधवांना माहिती करून दिली. शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांनी सातत्याने वाचन करावे तसेच शिक्षकांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधन करावे असे शिक्षकांना आवाहन केले. तसेच शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील कर्तुत्वाचे दाखले देत शिक्षकांनीही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे तेवत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अखंडितपणे सुरू ठेवावे असे यावेळी आवाहन केले.
       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा.अजित थोरात यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती समारंभ अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व अखंडपणे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन शिक्षकांचे काम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सदैव करत राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
          यावेळी शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापिका  प्रतीक्षा पवार, सहाय्यक शिक्षिका भाग्यश्री सिंदूर, सहाय्यक शिक्षक श्री.राहुल माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        तसेच मारुती सुझुकीच्या अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व यावेळी मारुती सुझुकीच्या वतीने नवीन वाहनाचे लॉन्चिंग प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी शिक्षकांसाठी खास सवलत त्यांनी मनोगतातून जाहीर केली.
      यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा मधील शिक्षकवृंद तसेच मलकापूर, कराड पंचक्रोशीतील शिक्षक, शिक्षिका, आजी-माजी शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती होती. श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था यांचे वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधून शिक्षकांच्या  कार्याचा गुणगौरव म्हणून सर्व उपस्थित  शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला व शिक्षकांविषयी त्यातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
          संगीत शिक्षक मा. शरद तांबवेकर सर त्यांच्या वाद्यवृंद विभागाने मन की विणा से गुंजीत ध्वनी मंगलम,स्वागतम स्वागतम हे स्वागत गीत व भेटला विठ्ठल अशी गीते सादर उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध केले.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखातील शाखाप्रमुख त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.शीला पाटील, प्रा. सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले तर आभार श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाईस चेअरमन अरुणादेवी पाटील यांनी मानले.
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा शिक्षक दिनाचा कार्यक्रम व त्या अनुषंगाने शिक्षक बांधवांचा केला जाणारा यथोचित सत्कार यामुळे शिक्षकवर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...