श्री मळाई महिला विकास मंच वतीने ५५ व्या महिला मेळाव्याचे आयोजन...
मलकापूरमध्ये रंगणार मंगळागौरीचा जागर...
मलकापूर-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाई नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी व श्री मळाई महिला विकास मंच मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर,आगाशिवनगर पंचक्रोशीतील महिलांसाठी शनिवार दि. १३सप्टेंबर २०२५ रोजी दु. २. ३० वाजता आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी श्री मळाई महिला विकास मंचाच्या वतीने 55 महिला मेळावा घेण्यात येणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून योग शिक्षिका हेल्दी योगा मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख मा. सौ. स्मिता हिम्मत वेल्हाळ व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था कराड मा. श्रीमती अपर्णा यादव या आहेत व यावेळी सौ. शालिनीताई अशोकराव थोरात (काकी),श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमन सौ. अरुणादेवी पाटील, श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ स्वाती थोरात यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
हिंदू धर्मात सणाला खूप महत्त्व आहे.श्रावण महिन्यात येणारा सण म्हणजे मंगळागौरी.पावसाचे रिमझिम सरी,हिरवागार निसर्ग, विविध सन या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्य यांनी भारावलेले असते.अशा दुर्मिळ वातावरणाचा जोश आणि ठासून भरल्या उत्साहाची जोड मिळते ती मंगळागौरीच्या खेळामुळे. मंगळागौरीचे खेळ त्यातील गाणी, काव्य हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच होय.हा ठेवा जतन व्हावा,नव्या पिढीला मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने श्री मळाई महिला विकास मलकापूर यांनी हा मेळावा पंचक्रोशीतील महिलांसाठी आयोजित केला आहे.
मंगळागौर घेण्यासाठी हेल्दी योगायोग मंगळागौर ग्रुप मंगळागौर ग्रुप येत आहे तरी या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकता आणि आपल्या आनंददायी अनोख्या पर्वणीचे साक्षीदार होऊ शकता, सोबत तुमच्यासाठी भेटवस्तूंचा नजराणा आहे आणि त्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण आहे तरी पंचक्रोशीतील महिलांनी कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री मळाई महिला विकास मंचच्या वतीने कार्याध्यक्षा डॉ.सौ. स्वाती थोरात यांनी केले आहे.
55 व्या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्ये
१)महिलांसाठी मंगळागौरी चे खेळ, गाणी याद्वारे महिलांच्या कलागुणांना वाव..
२)कराड मधील हेल्दी योगा मंगळागौर ग्रुपचा पुढाकार
३) महिलांसाठी आकर्षक भेट वस्तूंचा नजराणा...
४) मंगळागौरीच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसाचे केले जाणार जतन...
५) चालू वर्षीही श्री मळाई महिला विकास मंचचा सामाजिक उपक्रमात पुढाकार व श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची लाभणार साथ.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा