Powered By Blogger

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

कन्याशाळा मलकापूरच्या सर्व भूगोलप्रेमी विद्यार्थिनींसाठी "ब्लड मून "पाहण्याची अनोखी संधी

🌍🌚🌙🌒🌑🔭🔭🔭📚 *      
   कन्याशाळा मलकापूरच्या सर्व भूगोलप्रेमी विद्यार्थिनींसाठी "ब्लड मून ""पाहण्याची अनोखी संधी. ही संधी कोणीही गमावू नका..तसेच सोमवारी हा आपण अनुभवलेला हा क्षण निबंध रूपाने मांडण्याची संधी मिळेल व विद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट तीन निबंधास मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे शुभहस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अवकाशातील घडामोडींची माहिती फक्त आपल्या कन्याशाळेच्या ग्रुपवर आणि आपल्या  कन्याशाळा मलकापूरच्या ब्लॉगवर पहायला मिळेल.तर चला निबंध स्पर्धेत सहभागी होऊया. व उद्याचा क्षण नक्की अनुभवूया.... 👍* 
         विद्यार्थिनींनो उद्या ७सप्टेंबर २०२५..उद्या खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असून ज्यावेळी पृथ्वी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात ज्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते या स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीच्या उपभू स्थितीत असेल तेव्हा पृथ्वीची दाट सावली चंद्रावर पडून चंद्र पूर्ण झाकला जाईल त्यावेळेला होणार हे ग्रहण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण..खगोलशास्त्रज्ञ या चंद्रग्रहणाला 'ब्लड मून' म्हणत आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा चंद्र आकाशात पूर्णपणे लाल दिसतो.    उद्या आपल्याला भारतामध्ये बघता येणार आहे तर त्यासाठी आपण हे ग्रहण कसे पाहू शकतो व या ग्रहणाचा कालावधी किती आहे. या ग्रहणाचा आपल्यावर काही परिणाम होतो की नाही यासंबंधीच्या सर्व खगोलशास्त्रीय घडामोडींची माहिती आपण जाणून घेऊया तर चला मग....
         1️⃣   हे चंद्रग्रहण कोणकोणत्या देशांत दिसणार व किती वाजता आहे व किती वेळ आहे.❔
           युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. तर भारतासाठी संवेदनशील असेल. भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल. आणि त्याचा सूतक काळ दुपारी 12.57 च्या 9 तास अगोदर असणार आहे.हे ग्रहण भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 11 वाजून 1 मिनिटांपासून पुढे 1 वाजून 26 मिनिटांपर्यंत हे ग्रहण शिगेला पोहोचेल. आपल्या देशात या चंद्रग्रहणाचा कालावधी 3 तास 29 मिनिटांचा असेल. हा खुप कमी कालावधी आहे. 
     2️⃣ सूतक काळ किती वाजता सुरू होईल❔
हे ग्रहण भारतात दिसेल, त्यामुळे त्याचा सूतककाळही वैध असेल. चांद्र दिनदर्शिकेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो. आगामी चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सुरू होणार आहे.
 3️⃣चंद्रग्रहणाची सुरुवात पितृपक्षापासून होते❔
हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला होणार आहे. पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेपासून होते. पौर्णिमा तिथीचे श्राद्ध 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी केले जाते. अशा वेळी पितृपक्षाशी संबंधित विधी आणि श्राद्धकर्म सूतक काळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत, असा सल्ला ज्योतिषी देतात.

 4️⃣ब्लड मून म्हणजे काय?चंद्रग्रहण कधी होते
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी जेव्हा आपल्या कक्षेत फिरत असताना सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा ती सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते. अशा वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचा रंग काळा किंवा लाल दिसू लागतो. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात.खगोलशास्त्रज्ञांच्या मते या स्थितीलाच ब्लड मून असे म्हणतात..
 5️⃣चंद्रग्रहण कसे बघाल 
   चंद्रग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी बघणे टाळा आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष गॉगल  जे ISO 12312-2 प्रमाणित असतात.जेणेकरून डोळ्यांना हानी होणार नाही. ग्रहण काळात शक्यतोवर खाणे-पिणे टाळावे आणि उपवास करणे योग्य मानले जाते, तसेच शुभ कार्ये करू नयेत. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतोवर घरातच थांबावे, असे सांगितले जाते.  
     
 *वैज्ञानिक दृष्ट्या:
ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि ती पाहिल्याने डोळ्यांना थेट अपाय होत नाही, जर तुम्ही योग्य साधनांचा वापर केला असेल.  
इतर टीप्स: 
ग्रहण हे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे होते.
ग्रहण पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होऊ शकतो, परंतु योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

👆👆👆👆👆👆👆👆👆

🌍🌚🌙🌒🌑🔭🔭🔭📚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...