Powered By Blogger

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

वाचनसंस्कृती वाढविणे काळाची गरज---मा. विश्वासराव निकम


वाचनसंस्कृती वाढविणे काळाची गरज---मा. विश्वासराव  निकम

मलकापूर -
           श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ यांचे मार्गदर्शनानुसार विद्यार्थिनींना शालेय जीवनातच वाचनाची आवड निर्माण व्हावी व आजच्या डिजिटल युगात, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थिनी मोबाईल च्या अतिआहारी जाऊन त्यांची शक्ती वाया जाऊ नये यासाठी दरवर्षी ग्रंथप्रदर्शन भरवून वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो त्याचा एक भाग म्हणून शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून   ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते त्याचे उदघाटन सुख शांती वाचनालयाचे संस्थापक मा. विश्वासराव निकम, मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. गणेश जाधव यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना हे मत व्यक्त केले. तसेच शिक्षकांनी अधिकाधिक वाचन करावे वाचनाशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देऊ शकत नाही. वाचनाशिवाय विद्यार्थी विद्यार्थिनींसुद्धा शिक्षणाप्रवासात टिकू शकणार नाही. पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे असे मत व्यक्त करीत वाचन चळवळीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
           यावेळी मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश जाधव माजी उपमुख्याध्यापक मा.अनिल शिर्के, मा.शेखर शिर्के शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,ग्रंथालय प्रमुख श्री.प्रसन्न थोरात, सौ.करुणा शिर्के सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
          केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कन्याशाळा मलकापूर विद‌यालयामध्ये ग्रंथप्रदर्शन हा चांगला उप‌क्रम राबविण्यात येतो यासाठी शाळेचे अभिनंदन केले.विद्यार्थिंनींपर्यंत अधिकाधिक  पुस्तके पोहचवावीत व वाचवाने विदयार्थी सक्षम होतो व तो नैराश्येला प्रतिकार करू शकतो. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात यासाठी संस्थेचे कौतुक केले.
         यावेळी मा.अनिल शिर्के, मा. शेखर शिर्के यांनीही मनोगत व्यक्त करीत वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले व यासाठी ग्रंथालयांनी व ग्रंथप्रेमीनी एकजुटीने पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.
           यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनींनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन  विविध पुस्तके वाचनाचा अनुभव घेतला व सदर उपक्रम कृतीयुक्त सहभाग घेतला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाची शिक्षिका सौ. सविता कोळी यानी केले. आभार ग्रंथालय प्रमुख श्री. प्रसन्न थोरात यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...