Powered By Blogger

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....


कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....
     सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्रमाने वेधले सर्वांचे लक्ष....

मलकापूर --
         श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे २६जानेवारी २०२६रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शिवाजी आप्पा सराफ चे प्रमुख मा. प्रवीण कुमार जगताप यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे मा. तेजस फुटाणे,प्रमुख पाहुण्या सीनियर कन्सल्टंट टाटा कन्सल्टन्सी सौ.प्रियांका फुटाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल अर्जुन शिणगारे, संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील, सौ.रोहिणी जगताप माजी विद्यार्थिनी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मा. नयनतारा कचरे, पथक पर्यवेक्षण सदस्य श्री.मोहिते सर,माजी सैनिक हरिदास माने, सौ. शितल माने, सेवानिवृत्त सी.आर.पी एफ जवान मा.शकील मोमीन,ॲड.प्रमोद तडाखे पोलीस पाटील मा.प्रशांत गावडे, श्री.जुनेद शेख व राजपथ दिल्ली एन. सी. सी. पथक सदस्या शाहीन शेख मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
            यावेळी एम.सी.सी व आर एस.पी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी संचलनाद्वारे ध्वजाला मानवंदना दिली.
         क्रीडा प्रात्यक्षिकामध्ये संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार,मानवी मनोरे, दांडपट्टा प्रात्यक्षिक, झांज पथक, लेझीम नृत्य इत्यादी साहसी खेळांचे सादरीकरण करण्यात आले.तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूर थीम वर आधारित देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.यावेळी विद्यार्थिनींचा उत्साह पाण्यासारखा होता व उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी उपस्थित सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माजी विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले. शाळा माऊली विषयी असणारी आस्था यामुळेच शाळेचा नावलौकिक होत आहे तसेच समाजातील विविध मान्यवरांचे विद्यालयावरती असणारे प्रेम यामुळे शाळा प्रगती करीत आहे असे मत व्यक्त केले.
           कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माजी विद्यार्थिनी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मा. नयनतारा कचरे यांनी शाळा माऊलीविषयी कृतज्ञता व्यक्त केली व शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच माझे पंख आज बळकट झाले असून आज मी मराठवाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहे असे मत व्यक्त केले.तसेच विद्यार्थिनींनी शालेय जीवनामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने चिकाटीने प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
           शाळेची माजी विद्यार्थिनी व प्रमुख पाहुण्या सीनियर कन्सल्टंट टाटा कन्सल्टन्सी मा. प्रियंका सौ.प्रियांका फुटाणे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळा माऊलीने ध्वजारोहणासाठी निमंत्रित करून आपल्या आपल्याच मुलीला मोठा सन्मान दिला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत शालेय जीवनातील आयुष्यातील सुंदर आठवणींना उजाळा देत शाळेतील आठवणी आज मी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवल्या आहेत व शाळा माऊलींनी दिलेले संस्कार हे भविष्याची शिदोरी असते तसेच स्पर्धा परीक्षेच्या द्वारे शाळा माऊली घेत असलेले परिश्रम याबद्दल मार्गदर्शन करीत विद्यार्थीनी यशाचे शिखरे सर करावीत व भविष्यामध्ये शाळा माऊलीकडे आवर्जून यावे असे मनोगत व्यक्त केले.
      यावेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सौ. देवकी थोरात व त्यांच्या वाद्यवृंद विभागाने देशभक्तीपर गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली.तर ईश्वरी कदम " मी सावित्री" या विषयावर तर दुर्वा यादव व आसिया मत्तेखान यांनी सादर केलेली देशभक्तीपर भाषणे उपस्थित सर्वांची वाहवा मिळविली.तसेच क्रीडा प्रात्यक्षिक व संस्कृती कार्यक्रमाला ही उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कविता थोरात यांनी केले.
       यावेळी कार्यक्रमासाठी माता पालक शिक्षक पालक संघातील सदस्य,सौ. रंजना पवार मॅडम,श्री. संजय नवाळे सर,कराळे वहिनी,सौ. विद्या दिंडे, युट्युबवर कारंडे सर, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख सौ हसीनाबेगम मुल्ला,सौ.संगीता पाटील,सौ.सविता कोळी, श्री. योगेश खराडे, श्री. मल्हारी शिरतोडे,श्री.प्रकाश कदम, श्री.अमृत शिर्के, श्री.शुभम चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...