Powered By Blogger

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

कन्याशाळा मलकापूर बुद्धिबळाच्या पटलावरील संपूर्ण कराड तालुक्यातील ठरली अव्वल शाळा.. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. 👌👌👌

💐💐अभिनंदन अभिनंदन 🚩त्रिवार अभिनंदन 🚩🚩
               # दिव्या देशमुख #कोनेरू हंपी#
29 ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जन्मदिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य आणि शालेय शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने क्रीडा स्पर्धा २०२५ शुभारंभ व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरचे घवघवीत यश....
👍👍👍👍👍👍👍👍
         राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी मिळवले दैदीप्यमान यश... बुद्धिबळाच्या पटलावरील संपूर्ण कराड तालुक्यातील अव्वल शाळा... श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. 👌👌👌👌👌
 मलकापूर---
29 ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जन्मदिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य आणि शालेय शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने क्रीडा स्पर्धा २०२५ शुभारंभ कृष्णा इंग्लिश मिडीयम स्कूल मलकापूर या ठिकाणी झाला.राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी दैदीप्यमान यश मिळविले व बुद्धिबळाच्या पटलावरील संपूर्ण कराड तालुक्यातून अव्वल शाळा होण्याचा बहुमान मिळविला व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला व कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा यशाची सुरवात करीत पताका रोवली.   
        यामध्ये शालेय शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात शार्वी संदीप जाधव हिने प्रथम क्रमांक, तर गौरी धनाजी माने हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच 17 वर्षे गटात कु. स्वरा जयवंत पाटील हिने प्रथम क्रमांक तर मधुरा अर्जुन पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला.
      तसेच 14 वर्षे वयोगटातील कु.सानवी खराडे, कु.आराध्या जाधव, कु. संजीवनी राजमाने तसेच 17 वर्ष वयोगटातील तेजस्विनी जाधव व अस्मिता मोहिते व संजना जाधव यांनी उत्कृष्ट खेळ करीत स्पर्धेत जान आणली.या यशाने कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा विभागाच्या यशाची परंपरा कायम राखत कन्याशाळा मलकापूरच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर 
शिक्कामोर्तब केले.
     सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंना क्रीडा शिक्षिका सौ. सविता कोळी व मा.प्रकाश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
         सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थिनींचे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने व कन्याशाळा मलकापूरच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
             सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील,खजिनदार तुळशीराम शिर्के,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती रणजित थोरात, संचालक प्रा. संजय थोरात, मा.वसंतराव चव्हाण,संस्था पथक पर्यवेक्षण समिती प्रमुख व सर्व सदस्य,उद्योजक मा. लक्ष्मीनारायण सरलाया,मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.गणेशजी जाधव, उदयोजक मा.मुदस्सर मोमीन, मा.मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक मा.सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक सर्वांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
              सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पालकवर्गातून कौतुक होत आहे.

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

भव्य मलकापूर रोडरेस स्पर्धा २०२५ मलकापूर येथे क्रीडामय वातावरणात संपन्न...खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

भव्य मलकापूर रोडरेस स्पर्धा २०२५ मलकापूर येथे क्रीडामय वातावरणात संपन्न...
        स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
मलकापूर-
           श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, लायन्स क्लब कराड सिटी व आदर्श क्रीडा संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मलकापूर रोड स्पर्धा शनिवार दिनांक २३ऑगस्ट २०२५ रोजी मलकापूर येथे क्रीडामय वातावरणात संपन्न झाल्या. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे चेअरमन श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मा.अजितकाका थोरात, लायन्स क्लब अध्यक्ष लायन मा. शशिकांत पाटील यांच्या शुभहस्ते व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, लायन्स क्लब कराड सिटी सचिव लायन मा.अनिल पाटील, खजिनदार लायन मा.ॲड. दिग्विजय पाटील,एमजेफ कॅबिनेट ऑफिसर लायन डॉ.महेश खुस्पे, एमजेएफ झोन चेअरमन लायन मा.मंजिरी खुस्पे, कॅबिनेट युथ लायन मा. विद्या मोरे,एमजेफ मा. सुशांत वाव्हळ,लायन मा.मिनल पाटील संचालक श्री,मळाईदेवी शिक्षण संस्था मा.प्रा.संजय थोरात, मा.वसंतराव चव्हाण,उद्योजक मा.मुदस्सर मोमीन,लायन मा. पियुष गोर,लायन मा.दिलीप जगताप, लायन मा. सुनिता पाटील,लायन मा.मनीषा भोसले, लायन मा. कांचन सोळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
            यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देत स्पर्धेत यश अपयश येत असते. पण खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे.आपण सातत्याने खेळाला वेळ देऊन आपली शारीरिक तंदुरुस्ती टिकवली पाहिजे तसेच ध्येय चिकाटी व सातत्य ठेवून खेळामध्ये अव्व्ल स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त केले.तसेच लायन्स क्लब कराड सिटीचे अध्यक्ष लायन मा. शशिकांत पाटील यांनी या स्पर्धेचे निमित्ताने खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल त्याचे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले व अशा सर्व उपक्रमांना श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व मळाई ग्रुप मधील सर्व संस्थांची नेहमी साथ राहील असे आश्वासन यावेळी दिले.
            यावेळी लायन्स क्लब कराड सिटीचे अध्यक्ष लायन मा. शशिकांत पाटील यांनी लायन्स च्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत खेळाडूंसाठी आदर्श क्रीडा संस्थेच्या माध्यमातून श्री मळाईदेवी शिक्षण संस्था करत असलेल्या प्रयत्नाबद्दल संस्थेचे कौतुक करीत खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करावे व यातूनच चांगले खेळाडू तयार होतील जे भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये चमकतील असा आशावाद व्यक्त केला.तसेच यापुढेही लायन्स क्लब कराड सिटी व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने संयुक्तरित्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल तेव्हा भविष्यात खेळाडूंनी या संस्थांच्या उपक्रमामध्ये भाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे असे मत यावेळी व्यक्त केले. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या खेळाडूंना लायन्स क्लब कराड सिटीच्या सर्व पदाधिकारीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
            यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे,आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.अरुणा कुंभार,आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विभागप्रमुख सौ. शीला पाटील, मुख्याध्यापिका सौ.ज्योती शिंदे,स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. लता जाधव तसेच क्रीडाप्रेमी पालक, पत्रकार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक विजेत्या खेळाडूंचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,लायन्स क्लब कराड सिटी व आदर्श क्रीडा संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी, मेडल्स, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व खेळाडू व सहभागी खेळाडू या तिन्ही संस्थांच्या वतीने व उद्योजक मुद्दस्सर मोमीन यांचे वतीने खाऊ चे वाटप करण्यात आले.स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आदर्श क्रीडा संस्थेचे पदाधिकारी यांचे शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
                यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका सौ. सविता पाटील यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक श्री.योगेश खराडे यांनी मानले.
         तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा संस्थेचे सचिव श्री.जगन्नाथ कराळे, उपाध्यक्ष श्री. जयवंत पाटील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व लायन्स क्लब कराड सिटी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
 भव्य मलकापूर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ----
 वयोगट ६वर्ष मुले-(५०० मी धावणे)
 रुद्राश रमेश येडगे (प्रथम)
 आयुष्य दीपक टोकले (द्वितीय) स्वराज विक्रम हेडगे (तृतीय )
श्रीराज महेंद्र पाटील (चतुर्थ )
आयुष अक्षय चव्हाण( पंचम)
 वयोगट ६ वर्ष मुली( ५०० मीटर)
 इशिता गणेश येडगे (प्रथम) 
धनुष शंतनू पाटील( द्वितीय)
 वैदयी वैभव देवकर (तृतीय)
 राजप्रिया वैभव पुजारी (चतुर्थ )
मनस्वी अक्षय डाळे ( पंचम)
 वयोगट ८ वर्ष मुले (१ कि.मी)
आदर्श शशिकांत येडगे( प्रथम)
 रविराज राजेश शिंदे ( द्वितीय) 
हर्षवर्धन विक्रम पवार (तृतीय)
 अनुज बापूराव येडगे (चतुर्थ)
 विराज माणिक पाटील व प्रणिल सुहास नारकर ( पंचम)
 वयोगट ८ वर्ष मुली (१ कि.मी)
सिद्धी अविनाश खबाले( प्रथम) 
 रिद्धी अविनाश खबाले (द्वितीय)
 प्रांजल सचिन येडगे (तृतीय) 
राजनंदिनी वैभव पुजारी (चतुर्थ) 
शिवांजली रामदास शिंदे (पंचम)
 वयोगट१०वर्ष मुले(२कि.मी)
 आर्य विजय थोरात( प्रथम)
 सार्थक महेश काशीद( द्वितीय )
इंद्रसेन मयूर पाटील (तृतीय)
 समर्थ कुमार पाटील (चतुर्थ)
 यश सुधीर मोरे (पंचम)
 वयोगट १० वर्ष मुली (१ कि.मी)  
 ईश्वरी मकरंद मुळे( प्रथम )
आराध्या अनिल गरुड( द्वितीय) 
आदिती अशोक घारे (तृतीय)
 सिद्धी विजय घाडगे (चतुर्थ)
 शिवन्या सचिन कांबळे( पंचम)
 वयोगट १२वर्षे मुले (२. ५कि.मी.)
 समर्थ धनंजय सुर्वे (प्रथम)
 कैवल्य अमित उमरजकर( द्वितीय) 
जयंत तानाजी पाटील (तृतीय) 
यशराज संदीप कांबळे( चतुर्थ )
आर्यन संदीप माने (पंचम)
वयोगट १२वर्ष मुली (२कि.मी )
ईश्वरी लक्ष्मण गरुड (प्रथम )
स्वराली विनोद पाटील (द्वितीय) 
कणक मिलिंदकुमार शिंदे (तृतीय)
 भूमि हरिदास माने (चतुर्थ)
त्रिशा संदीप शिर्के (पंचम) 
वयोगट १४वर्ष मुले (३ कि.मी)
श्रवण उदय साळुंखे (प्रथम)
राज दिपक यादव (द्वितीय) 
शंभू रघुनाथ येडगे( तृतीय )
श्रीकृष्ण दिलीप तगारे (चतुर्थ)
 सत्यजित सचिन गायकवाड (पंचम)
 वयोगट १४ वर्षे मुली(२.५ कि.मी)
 अबोली नंदकुमार वास्के (प्रथम) 
आराध्या माणिक वास्के (द्वितीय)
 श्रेया संजय गोंडाळ (तृतीय) 
अनुश्री संग्राम काळे( चतुर्थ )
जान्हवी राजेंद्र पाटील (पंचम)

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न...

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न...
 मलकापूर-
       श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शोन इंटरप्रायजेसच्या मा.सौ. कविता पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, इनरव्हील क्लब मलकापूर अध्यक्षा मा. सौ.छाया शेवाळे,मा. तुषार पवार, शिवशंकर ज्वेलर्सच्या मा. प्रियांका जगताप, उद्योजक मा. मुद्दसर मोमीन,निवृत्त सी.आर. पी. एफ. जवान मा.शकील मोमीन, दैनिक लोकमतचे पत्रकार मा. माणिक डोंगरे,सर्व माता पालक, शिक्षक पालक सदस्य, संस्थेचे माजी शिक्षक, शिक्षिका, मा.संजय नवाळे सर यांची विशेष उपस्थिती होती.
           यावेळी एम.सी.सी, आर.एस.पी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी परेडद्वारे ध्वजाला मानवंदना दिली. यासाठी एम.सी.सी मार्गदर्शक श्री.जयवंत पाटील सर,आर. एस.पी मार्गदर्शक श्री. बाबासाहेब तपासे यांनी परिश्रम घेतले. त्याला ढोल व ताशांची सुरेख साथ मिळाली.
        तसेच यावेळी समूहगीतांद्वारे महापुरुष, थोर नेत्यांचे योगदान व भारताची महानता याचे सादरीकरण करण्यात आले.संगीत विशारद साठे सर व तब्बलजी कु.विभावरी जगदाळे यांची सुरेल साथ मिळाली.कु.असिया मत्तेखान व कु.ईश्वरी कदम यांचीही देशभक्तीपर भाषणे झाली. उपस्थित पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले.
           यावेळी प्रमुख पाहुण्या सौ.कविता पवार व सौ.छाया शेवाळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना शुभसंदेश देत देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत शिक्षण घेऊन विद्यार्थिनींनी सामील व्हावे व मोठ्या पदावर जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे मत यावेळी व्यक्त केले.
           सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी श्री.प्रकाश कदम, अमृत शिर्के,श्री.शुभम चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
        उपस्थित पाहुण्यांचे स्वागत कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले.

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

कन्याशाळा मलकापूरचे ॲथलेटिक्स स्पर्धेत सुयश...🏅🏅

कन्याशाळा मलकापूरचे ॲथलेटिक्स स्पर्धेत सुयश....
          मलकापूर-
             सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांचे वतीने सातारा येथे रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वार्षिक ज्युनिअर मैदानी स्पर्धेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरची विद्यार्थिनी कु. सानवी शिवाजी शिंगण हिने 16 वर्षे वयोगटात उंच उडी क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तर कु. मुक्ता विलास शेलार हिने 16 वर्ष वयोगटात भालाफेक या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला व शाळेच्या क्रीडा क्षेत्राची यशाची परंपरा कायम राखली..
           या यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व NIS कोच मा.दिलीप चिंचकर,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख श्री. जयवंत पाटील,श्री.योगेश खराडे, सौ.सविता कोळी, श्री.मल्हारी शिरतोडे,सौ.संगिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
       यशस्वी विद्यार्थिनींचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

वाचनसंस्कृती वाढविणे काळाची गरज---मा. विश्वासराव निकम


वाचनसंस्कृती वाढविणे काळाची गरज---मा. विश्वासराव  निकम

मलकापूर -
           श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ यांचे मार्गदर्शनानुसार विद्यार्थिनींना शालेय जीवनातच वाचनाची आवड निर्माण व्हावी व आजच्या डिजिटल युगात, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थिनी मोबाईल च्या अतिआहारी जाऊन त्यांची शक्ती वाया जाऊ नये यासाठी दरवर्षी ग्रंथप्रदर्शन भरवून वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो त्याचा एक भाग म्हणून शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून   ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते त्याचे उदघाटन सुख शांती वाचनालयाचे संस्थापक मा. विश्वासराव निकम, मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. गणेश जाधव यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना हे मत व्यक्त केले. तसेच शिक्षकांनी अधिकाधिक वाचन करावे वाचनाशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देऊ शकत नाही. वाचनाशिवाय विद्यार्थी विद्यार्थिनींसुद्धा शिक्षणाप्रवासात टिकू शकणार नाही. पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे असे मत व्यक्त करीत वाचन चळवळीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
           यावेळी मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश जाधव माजी उपमुख्याध्यापक मा.अनिल शिर्के, मा.शेखर शिर्के शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,ग्रंथालय प्रमुख श्री.प्रसन्न थोरात, सौ.करुणा शिर्के सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
          केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कन्याशाळा मलकापूर विद‌यालयामध्ये ग्रंथप्रदर्शन हा चांगला उप‌क्रम राबविण्यात येतो यासाठी शाळेचे अभिनंदन केले.विद्यार्थिंनींपर्यंत अधिकाधिक  पुस्तके पोहचवावीत व वाचवाने विदयार्थी सक्षम होतो व तो नैराश्येला प्रतिकार करू शकतो. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात यासाठी संस्थेचे कौतुक केले.
         यावेळी मा.अनिल शिर्के, मा. शेखर शिर्के यांनीही मनोगत व्यक्त करीत वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले व यासाठी ग्रंथालयांनी व ग्रंथप्रेमीनी एकजुटीने पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.
           यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनींनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन  विविध पुस्तके वाचनाचा अनुभव घेतला व सदर उपक्रम कृतीयुक्त सहभाग घेतला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाची शिक्षिका सौ. सविता कोळी यानी केले. आभार ग्रंथालय प्रमुख श्री. प्रसन्न थोरात यांनी मानले.

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...