Powered By Blogger

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

कन्याशाळा मलकापूर बुद्धिबळाच्या पटलावरील संपूर्ण कराड तालुक्यातील ठरली अव्वल शाळा.. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. 👌👌👌

💐💐अभिनंदन अभिनंदन 🚩त्रिवार अभिनंदन 🚩🚩
               # दिव्या देशमुख #कोनेरू हंपी#
29 ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जन्मदिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य आणि शालेय शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने क्रीडा स्पर्धा २०२५ शुभारंभ व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरचे घवघवीत यश....
👍👍👍👍👍👍👍👍
         राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी मिळवले दैदीप्यमान यश... बुद्धिबळाच्या पटलावरील संपूर्ण कराड तालुक्यातील अव्वल शाळा... श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. 👌👌👌👌👌
 मलकापूर---
29 ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जन्मदिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य आणि शालेय शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने क्रीडा स्पर्धा २०२५ शुभारंभ कृष्णा इंग्लिश मिडीयम स्कूल मलकापूर या ठिकाणी झाला.राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी दैदीप्यमान यश मिळविले व बुद्धिबळाच्या पटलावरील संपूर्ण कराड तालुक्यातून अव्वल शाळा होण्याचा बहुमान मिळविला व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला व कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा यशाची सुरवात करीत पताका रोवली.   
        यामध्ये शालेय शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात शार्वी संदीप जाधव हिने प्रथम क्रमांक, तर गौरी धनाजी माने हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच 17 वर्षे गटात कु. स्वरा जयवंत पाटील हिने प्रथम क्रमांक तर मधुरा अर्जुन पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला.
      तसेच 14 वर्षे वयोगटातील कु.सानवी खराडे, कु.आराध्या जाधव, कु. संजीवनी राजमाने तसेच 17 वर्ष वयोगटातील तेजस्विनी जाधव व अस्मिता मोहिते व संजना जाधव यांनी उत्कृष्ट खेळ करीत स्पर्धेत जान आणली.या यशाने कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा विभागाच्या यशाची परंपरा कायम राखत कन्याशाळा मलकापूरच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर 
शिक्कामोर्तब केले.
     सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंना क्रीडा शिक्षिका सौ. सविता कोळी व मा.प्रकाश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
         सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थिनींचे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने व कन्याशाळा मलकापूरच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
             सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील,खजिनदार तुळशीराम शिर्के,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती रणजित थोरात, संचालक प्रा. संजय थोरात, मा.वसंतराव चव्हाण,संस्था पथक पर्यवेक्षण समिती प्रमुख व सर्व सदस्य,उद्योजक मा. लक्ष्मीनारायण सरलाया,मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.गणेशजी जाधव, उदयोजक मा.मुदस्सर मोमीन, मा.मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक मा.सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक सर्वांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
              सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पालकवर्गातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...