मलकापूर-
सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांचे वतीने सातारा येथे रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वार्षिक ज्युनिअर मैदानी स्पर्धेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरची विद्यार्थिनी कु. सानवी शिवाजी शिंगण हिने 16 वर्षे वयोगटात उंच उडी क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तर कु. मुक्ता विलास शेलार हिने 16 वर्ष वयोगटात भालाफेक या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला व शाळेच्या क्रीडा क्षेत्राची यशाची परंपरा कायम राखली..
या यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व NIS कोच मा.दिलीप चिंचकर,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख श्री. जयवंत पाटील,श्री.योगेश खराडे, सौ.सविता कोळी, श्री.मल्हारी शिरतोडे,सौ.संगिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा