श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न...
मलकापूर-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शोन इंटरप्रायजेसच्या मा.सौ. कविता पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, इनरव्हील क्लब मलकापूर अध्यक्षा मा. सौ.छाया शेवाळे,मा. तुषार पवार, शिवशंकर ज्वेलर्सच्या मा. प्रियांका जगताप, उद्योजक मा. मुद्दसर मोमीन,निवृत्त सी.आर. पी. एफ. जवान मा.शकील मोमीन, दैनिक लोकमतचे पत्रकार मा. माणिक डोंगरे,सर्व माता पालक, शिक्षक पालक सदस्य, संस्थेचे माजी शिक्षक, शिक्षिका, मा.संजय नवाळे सर यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी एम.सी.सी, आर.एस.पी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी परेडद्वारे ध्वजाला मानवंदना दिली. यासाठी एम.सी.सी मार्गदर्शक श्री.जयवंत पाटील सर,आर. एस.पी मार्गदर्शक श्री. बाबासाहेब तपासे यांनी परिश्रम घेतले. त्याला ढोल व ताशांची सुरेख साथ मिळाली.
तसेच यावेळी समूहगीतांद्वारे महापुरुष, थोर नेत्यांचे योगदान व भारताची महानता याचे सादरीकरण करण्यात आले.संगीत विशारद साठे सर व तब्बलजी कु.विभावरी जगदाळे यांची सुरेल साथ मिळाली.कु.असिया मत्तेखान व कु.ईश्वरी कदम यांचीही देशभक्तीपर भाषणे झाली. उपस्थित पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या सौ.कविता पवार व सौ.छाया शेवाळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना शुभसंदेश देत देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत शिक्षण घेऊन विद्यार्थिनींनी सामील व्हावे व मोठ्या पदावर जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे मत यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी श्री.प्रकाश कदम, अमृत शिर्के,श्री.शुभम चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा