Powered By Blogger

गुरुवार, २४ जुलै, २०२५

इयत्ता दहावी प्रथम पाच क्रमांक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व पालक सत्कार समारंभ कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न....

इयत्ता दहावी प्रथम पाच क्रमांक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व पालक सत्कार समारंभ कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न.....

मलकापूर -
         श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर येथे इयत्ता दहावी सन २०२४-२५ तील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व विविध स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थिनी व पालकांचा यांचा सत्कार समारंभ बुधवार दि. २४ जुलै २०२५ रोजी कन्याशाळा मलकापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी मा.रमेश कांबळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्भया पथक प्रमुख कराड शहर पोलीस स्टेशन मा.सौ.दीपा शिरसाट त्याचे सहकारी मा.अमोल फल्ले,संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ ,मा.परवीन बागवान,मा.भास्करराव मोहिते,मा. संदीप जाधव,संस्था पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण मा. अनिल शिर्के,मा. मोहन शेळके, मा. विनायक यादव, मा.भरत कुंभार हे मान्यवर उपस्थित होते.
            प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव करीत त्यानी वर्षभर घेतलेल्या कष्टामुळे आज त्यांनी यशाची उंच शिखरे सर करण्यासाठी एक पाऊल पुढे ठेवले आहे.
           संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करीत विद्यार्थिनी च्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले असून यशाचा आलेख असाच उंचावत ठेवा व संस्थेचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा असे मत यावेळी व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
             पथक पर्यवेक्षण प्रमुख श्री. शरदराव चव्हाण सर यांनी आपले मनोगतात शालेय जीवनामध्ये ध्येय निश्चित करून त्याचा सात‌त्यपूर्ण पाठपुरावा करावा असे आवाहन विद्यार्थिनींना केले.
           दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी कु. प्रगती शेळके, कु. आदिती पाटील व माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात संस्था व विद्यालय शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थिनीच्या  सर्वागिण विकासासाठी नेहमी प्रयत्न करते त्याचे फळ आज या यशाने आम्हाला मिळाले आहे असे मत व्यक्त केले.  
           शाळेच्या हितचिंतक श्रीमती परवीन बागवान मॅडम यांनी यशस्वी विदयार्थीनीचे कौतुक केले व उंच खप्ने बघा व ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही संघर्षाचा सामना करावा. वाटेत कितीही काटे आले तरीही तुम्ही उत्तुंग भरारी घ्यावी त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञानावर भर देऊ नका. त्यासाठी स्पर्धा परीक्षाद्वारे आपले ज्ञान वृद्धिंगत करावे असे मत व्यक्त केले.
          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी मा. रमेश कांबळे यांनी बदलत्या काळाचा वेध घेवून जी शाळा व विद्यार्थिनी पुढे जातात ते नावारूपास येतात. विद्यार्थिनी केलेल्या मनोगतातून खरोखरच कन्याशाळा मुलींसाठी व किती कष्ट घेते हे लक्षात येते. तेव्हा यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवावी. काळाची बदली पाऊले लक्षात ठेवून जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर ते हिऱ्याप्रमाणे चमकत राहतील. 
         निर्भया पथक सदस्य मा. अमोल फल्ले यांनी विद्यार्थिनींना निर्भया पथकाविषयी मार्गदर्शन केले व स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली तसेच शासनाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली व त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे केले असे आवाहन यावेळी केले.
         कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री. सुरेश राजे यांनी मानले तर कार्यकामाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. कविता थोरात, सौ.सविता कोळी, सौ. वनिता येडगे यांनी केले.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
            कन्याशाळेचे हितचिंतक पालक, दानशूर शिक्षणप्रेमी,५वी ते १० वी तील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मंगळवार, २२ जुलै, २०२५

सक्षम कराड संस्थेमार्फत कन्याशाळा मलकापूरच्या गरजू विद्यार्थिनींसाठी शाळापयोगी वस्तूंची भेट.... सक्षम संस्थेचे कार्य कौतुकास्पद.

सक्षम कराड संस्थेमार्फत कन्याशाळा मलकापूरच्या गरजू विद्यार्थिनींसाठी शाळापयोगी वस्तूंची भेट....
                सक्षम संस्थेचे कार्य कौतुकास्पद...

मलकापूर-
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मंगळवार दि. २२जुलै २०२५ रोजी  यावेळी दिव्यांग मुला- मुलींसाठी एक सामाजिक मदत या नात्याने काम करणाऱ्या सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेचे सचिव मा.राजेश चांडक सर,संस्थेचे सदस्य यश कुलकर्णी यांचे शुभहस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,मलकापूरचे तलाठी कानकेकर साहेब, दैनिक माध्यम समूहाचे प्रतिनिधी,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यालयातील होतकरू विद्यार्थिनींना स्कूल बॅग, वह्या,कंपास इ. शैक्षणिक  उपयोगी साहित्यांचे वितरण करण्यात आले. 
                यावेळी बोलताना सक्षम कराडचे मा.रमेशजी चांडक सर यांनी शाळेच्या विद्यार्थिनींचे कौतुक करीत एकूणच कन्याशाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे व विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धेतील निकालाचे कौतुक करीत सक्षम कराड ही संस्था दिव्यांगांसाठी एक स्वयंसेवी संस्था म्हणून काम करते या सामाजिक मदतीतून दिव्यांगांना किंवा होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक वाटचालीत मदत व्हावी व आपण अशा मदतीच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाचे वाटेकरी व्हावे या हेतूने आमची संस्था कार्य करते.तेव्हा आपण या मदतीचा स्वीकार करून येणाऱ्या काळात आपल्या शैक्षणिक वाटचालीत या विद्यालयातून दर्जेदार शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे मत व्यक्त करीत संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
           यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगत पाहुण्यांचा परिचय करून दिला.तसेच या मदतीचा योग्य उपयोग करून आम्ही सक्षम कराड या संस्थेने आमच्यावर जो विश्वास दाखविला तो जपण्याचा नक्की प्रयत्न करू अशी आशा व्यक्त केली.
           शाळेचे पर्यवेक्षक सुरेश राजे यांनी सक्षम कराड या संस्थेने आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना वस्तू स्वरूपात दिलेली भेट याचा आम्ही स्वीकार करून आपण दिलेल्या मदतीची बद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करतो व कन्याशाळा मलकापूरच्या वतीने सक्षम कराड संस्थेचे आभार करतो असे मत व्यक्त केले. व सक्षम कराड या संस्थेचे कार्य असेच वृद्धिंगत व्हावे असे मत व्यक्त केले.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रकाश कदम,क्रीडा शिक्षक श्री. जयवंत पाटील, श्री.योगेश खराडे  यांनी विशेष परिश्रम घेतले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले तर विद्यालयाच्या वतीने विशेष उपस्थित सर्व मान्यवरांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
          सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेने गरजू व होतकरू विद्यार्थिनींसाठी दिलेल्या मदतीचीबद्दल पालक वर्गातून सक्षम संस्थेचे कौतुक होत आहे व त्यांच्या विषयी ऋण व्यक्त केले जात आहे.

मंगळवार, १५ जुलै, २०२५

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या खेळाडूंनी टेबल टेनिस स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद.... स्पर्धेत कु. स्वरा पाटील, कु.अन्वेशा पाटील यांनी केला उत्कृष्ट खेळ....

      


     श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या खेळाडूंनी टेबल टेनिस स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद....
        स्पर्धेत कु. स्वरा पाटील, कु.अन्वेशा पाटील यांनी केला उत्कृष्ट खेळ....
सातारा --
          सातारा जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांचे सहकार्याने व न्यू इरा पब्लिक स्कूल पाचगणी आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा शुक्रवार दि. ११ जुलै २०२५रोजी पाचगणी येथे संपन्न झाल्या. यावेळी कन्याशाळेच्या खेळाडू कु. स्वरा पाटील,कु.अन्वेशा पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत त्यांच्या गटात उपविजेतेपद पटकावले. यावेळी विविध गटात कु.वैष्णवी लावंड, कु. समीक्षा मोरे,कु. सिमरा पटेल,कु. विभावरी पाटील,कु. शिवानी देशमुख, कु.जोया पठाण या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपापल्या गटात अपेक्षित कामगिरी केली. या यशाने कन्याशाळा मलकापूरच्या क्रीडा यशाची परंपरा कायम ठेवत कन्याशाळेच्या सर्वागीण विकासावर आधारित शिक्षणावर शिक्कामोर्तब केले.यावेळी यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या शुभहस्ते ट्रॉफी, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
           या यशाबद्दल यशस्वी व सहभागी खेळाडू विद्यार्थिनींचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, खजिनदार मा.तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ.स्वाती थोरात, संचालक मा. प्राध्यापक संजय थोरात, मा. वसंतराव चव्हाण, टेबल टेनिस मार्गदर्शक मा. लक्ष्मण जिरंगे सर,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे,पर्यवेक्षक सुरेश राजे,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व सर्व विद्यार्थिनी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
          सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा विभाग प्रमुख श्री. जयवंत पाटील, क्रीडाशिक्षक श्री. योगेश खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
         या यशाने यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश...श्री मळाई शिष्यवृत्ती पॅटर्न यशस्वी...

      श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरचे शिष्यवृत्ती परीक्षेत  सुयश...
         श्री मळाई शिष्यवृत्ती पॅटर्न यशस्वी.....
मलकापूर --
         महाराष्ट्र राज्य  परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ घेण्यात आलेल्या  मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( इयत्ता आठवी )कन्याशाळा मलकापूरची विद्यार्थिनी कु. अक्षरा भरत कुंभार हिने शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केले व जिल्हा गुणवत्ता यादीत १५० क्रमांक संपादन करून शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला. या यशाने शिष्यवृत्ती परीक्षेतील कन्याशाळा मलकापूरच्या यशाची परंपरा कायम ठेवत कन्याशाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शिक्कामोर्तब केले.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या
           या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी व सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,  संस्थेचे अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, खजिनदार मा.तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ.स्वाती थोरात, संचालक मा. प्राध्यापक संजय थोरात, मा. वसंतराव चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे,पर्यवेक्षक सुरेश राजे,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व सर्व विद्यार्थिनी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
          सर्व यशस्वी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सौ. करुणा शिर्के,तसेच सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाने पालक वर्गातून यशस्वी विद्यार्थिनी व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न🚩४जुलै २०२५

आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न🚩
     मलकापूर
         श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार मलकापूर मध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि.४ जुलै रोजी करण्यात आले होते. बाल वारकऱ्यांची आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी काढण्यात आली. मा.श्री. हणमंतराव पवार, मलकापूर यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. दिंडीमध्ये आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार विभागाचे विद्यार्थी संतांच्या वेशभूषा करून उत्साहाने सहभागी झाले होते. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज , संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या आळंदी देहू पासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात . वारीची ही परंपरा संत परंपरा महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . विद्यालयाच्या प्रांगणातून "ज्ञानोबा तुकारामच्या " जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले . हरिनामाच्या गजरात पालखी मलकापुरातून विविध भागातून निघाली . ठीकठिकाणी पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले . यामध्ये मुले व मुली संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर , जनाबाई , नामदेव, सोपानदेव , मुक्ताई यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते . टाळ मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परिसरात "पहावा विठ्ठल , बोलावा विठ्ठल" असे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच वारकरी , टाळकरी,विणेकरी, खांदेकरी , पताकेवाले अशा अनेक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी धरलेला ठेका मन आनंदूत सोडत होता. दिंड्या पताका हातात नाचवीत विठुरायाचा व ग्यानबा तुकारामचा गजर करत पालखी काढण्यात आली होती . विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता . 
          या दिंडीतून धार्मिक संदेशाबरोबर पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा , लेक वाचवा अशा घोषणा देत होते . त्याचबरोबर अवयवदान , स्त्रीभ्रूणहत्या , पाणी वाचवा पाणी जिरवा या प्रकारचे संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले शाळेचे प्रांगण ......टाळ- मृदुंग वाजवीत, हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर नृत्य सादर केले. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी शार्विल माळी व स्वरूप खराडे यांनी वासुदेव आला या गाण्यावर वासुदेवाची वेशभूषा परिधान करून नृत्य केले . अशा या बालकलाकारांनी आपली कला दाखवून परिसर दुमदुमून टाकला होता . प्रेक्षकांना जणू काही आपण पंढरीच्या नगरीतच आहोत असे वाटत होते . हा दिंडी सोहळा बघण्यासाठी अबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती . तसेच संचालक मंडळाचे सदस्य श्री.वसंतराव चव्हाण गुरुजी तसेच पथक पर्यवेक्षण प्रमुख आर.ए.कुंभार सर दिंडी सोहळ्यास उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका सौ.स्वाती थोरात मॅडम , सौ सविता कोळी, श्री.हरिदास माने, श्री.अभिजीत गायकवाड , श्री. संभाजी वैरी श्री.गणोजी जाधव , श्री .बंडा काकडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .ज्योती शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी दिंडीचे नियोजन केले. श्री एच.डी.शिर्के सर श्री डी. आर. शिर्के, जय पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोनाली थोरात मॅडम यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना गोड खीर खाऊ घालून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात 
आली. सर्व दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला.
           सदर उपक्रमाचे संस्थेचे सचिव अशोकराव थोरात ( शेतीमित्र) , अध्यक्ष पी.जी. पाटील , उपाध्यक्ष भास्करराव पाटील , खजिनदार तुळशीराम शिर्के , संचालक वसंतराव चव्हाण , डॉ.सौ. स्वाती थोरात मॅडम व पालकांनी कौतुक केले.


कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...