आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न🚩
मलकापूर-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार मलकापूर मध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि.४ जुलै रोजी करण्यात आले होते. बाल वारकऱ्यांची आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी काढण्यात आली. मा.श्री. हणमंतराव पवार, मलकापूर यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. दिंडीमध्ये आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार विभागाचे विद्यार्थी संतांच्या वेशभूषा करून उत्साहाने सहभागी झाले होते. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज , संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या आळंदी देहू पासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात . वारीची ही परंपरा संत परंपरा महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . विद्यालयाच्या प्रांगणातून "ज्ञानोबा तुकारामच्या " जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले . हरिनामाच्या गजरात पालखी मलकापुरातून विविध भागातून निघाली . ठीकठिकाणी पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले . यामध्ये मुले व मुली संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर , जनाबाई , नामदेव, सोपानदेव , मुक्ताई यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते . टाळ मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परिसरात "पहावा विठ्ठल , बोलावा विठ्ठल" असे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच वारकरी , टाळकरी,विणेकरी, खांदेकरी , पताकेवाले अशा अनेक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी धरलेला ठेका मन आनंदूत सोडत होता. दिंड्या पताका हातात नाचवीत विठुरायाचा व ग्यानबा तुकारामचा गजर करत पालखी काढण्यात आली होती . विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता .
या दिंडीतून धार्मिक संदेशाबरोबर पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा , लेक वाचवा अशा घोषणा देत होते . त्याचबरोबर अवयवदान , स्त्रीभ्रूणहत्या , पाणी वाचवा पाणी जिरवा या प्रकारचे संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले शाळेचे प्रांगण ......टाळ- मृदुंग वाजवीत, हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर नृत्य सादर केले. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी शार्विल माळी व स्वरूप खराडे यांनी वासुदेव आला या गाण्यावर वासुदेवाची वेशभूषा परिधान करून नृत्य केले . अशा या बालकलाकारांनी आपली कला दाखवून परिसर दुमदुमून टाकला होता . प्रेक्षकांना जणू काही आपण पंढरीच्या नगरीतच आहोत असे वाटत होते . हा दिंडी सोहळा बघण्यासाठी अबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती . तसेच संचालक मंडळाचे सदस्य श्री.वसंतराव चव्हाण गुरुजी तसेच पथक पर्यवेक्षण प्रमुख आर.ए.कुंभार सर दिंडी सोहळ्यास उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका सौ.स्वाती थोरात मॅडम , सौ सविता कोळी, श्री.हरिदास माने, श्री.अभिजीत गायकवाड , श्री. संभाजी वैरी श्री.गणोजी जाधव , श्री .बंडा काकडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .ज्योती शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी दिंडीचे नियोजन केले. श्री एच.डी.शिर्के सर श्री डी. आर. शिर्के, जय पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोनाली थोरात मॅडम यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना गोड खीर खाऊ घालून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात
आली. सर्व दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला.
सदर उपक्रमाचे संस्थेचे सचिव अशोकराव थोरात ( शेतीमित्र) , अध्यक्ष पी.जी. पाटील , उपाध्यक्ष भास्करराव पाटील , खजिनदार तुळशीराम शिर्के , संचालक वसंतराव चव्हाण , डॉ.सौ. स्वाती थोरात मॅडम व पालकांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा