Powered By Blogger

गुरुवार, २४ जुलै, २०२५

इयत्ता दहावी प्रथम पाच क्रमांक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व पालक सत्कार समारंभ कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न....

इयत्ता दहावी प्रथम पाच क्रमांक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व पालक सत्कार समारंभ कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न.....

मलकापूर -
         श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर येथे इयत्ता दहावी सन २०२४-२५ तील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व विविध स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थिनी व पालकांचा यांचा सत्कार समारंभ बुधवार दि. २४ जुलै २०२५ रोजी कन्याशाळा मलकापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी मा.रमेश कांबळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्भया पथक प्रमुख कराड शहर पोलीस स्टेशन मा.सौ.दीपा शिरसाट त्याचे सहकारी मा.अमोल फल्ले,संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ ,मा.परवीन बागवान,मा.भास्करराव मोहिते,मा. संदीप जाधव,संस्था पथक प्रमुख मा.शरदराव चव्हाण मा. अनिल शिर्के,मा. मोहन शेळके, मा. विनायक यादव, मा.भरत कुंभार हे मान्यवर उपस्थित होते.
            प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव करीत त्यानी वर्षभर घेतलेल्या कष्टामुळे आज त्यांनी यशाची उंच शिखरे सर करण्यासाठी एक पाऊल पुढे ठेवले आहे.
           संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करीत विद्यार्थिनी च्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले असून यशाचा आलेख असाच उंचावत ठेवा व संस्थेचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा असे मत यावेळी व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
             पथक पर्यवेक्षण प्रमुख श्री. शरदराव चव्हाण सर यांनी आपले मनोगतात शालेय जीवनामध्ये ध्येय निश्चित करून त्याचा सात‌त्यपूर्ण पाठपुरावा करावा असे आवाहन विद्यार्थिनींना केले.
           दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी कु. प्रगती शेळके, कु. आदिती पाटील व माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात संस्था व विद्यालय शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थिनीच्या  सर्वागिण विकासासाठी नेहमी प्रयत्न करते त्याचे फळ आज या यशाने आम्हाला मिळाले आहे असे मत व्यक्त केले.  
           शाळेच्या हितचिंतक श्रीमती परवीन बागवान मॅडम यांनी यशस्वी विदयार्थीनीचे कौतुक केले व उंच खप्ने बघा व ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही संघर्षाचा सामना करावा. वाटेत कितीही काटे आले तरीही तुम्ही उत्तुंग भरारी घ्यावी त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञानावर भर देऊ नका. त्यासाठी स्पर्धा परीक्षाद्वारे आपले ज्ञान वृद्धिंगत करावे असे मत व्यक्त केले.
          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी मा. रमेश कांबळे यांनी बदलत्या काळाचा वेध घेवून जी शाळा व विद्यार्थिनी पुढे जातात ते नावारूपास येतात. विद्यार्थिनी केलेल्या मनोगतातून खरोखरच कन्याशाळा मुलींसाठी व किती कष्ट घेते हे लक्षात येते. तेव्हा यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवावी. काळाची बदली पाऊले लक्षात ठेवून जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर ते हिऱ्याप्रमाणे चमकत राहतील. 
         निर्भया पथक सदस्य मा. अमोल फल्ले यांनी विद्यार्थिनींना निर्भया पथकाविषयी मार्गदर्शन केले व स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली तसेच शासनाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली व त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे केले असे आवाहन यावेळी केले.
         कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री. सुरेश राजे यांनी मानले तर कार्यकामाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. कविता थोरात, सौ.सविता कोळी, सौ. वनिता येडगे यांनी केले.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
            कन्याशाळेचे हितचिंतक पालक, दानशूर शिक्षणप्रेमी,५वी ते १० वी तील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...