Powered By Blogger

मंगळवार, २२ जुलै, २०२५

सक्षम कराड संस्थेमार्फत कन्याशाळा मलकापूरच्या गरजू विद्यार्थिनींसाठी शाळापयोगी वस्तूंची भेट.... सक्षम संस्थेचे कार्य कौतुकास्पद.

सक्षम कराड संस्थेमार्फत कन्याशाळा मलकापूरच्या गरजू विद्यार्थिनींसाठी शाळापयोगी वस्तूंची भेट....
                सक्षम संस्थेचे कार्य कौतुकास्पद...

मलकापूर-
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मंगळवार दि. २२जुलै २०२५ रोजी  यावेळी दिव्यांग मुला- मुलींसाठी एक सामाजिक मदत या नात्याने काम करणाऱ्या सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेचे सचिव मा.राजेश चांडक सर,संस्थेचे सदस्य यश कुलकर्णी यांचे शुभहस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे,मलकापूरचे तलाठी कानकेकर साहेब, दैनिक माध्यम समूहाचे प्रतिनिधी,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यालयातील होतकरू विद्यार्थिनींना स्कूल बॅग, वह्या,कंपास इ. शैक्षणिक  उपयोगी साहित्यांचे वितरण करण्यात आले. 
                यावेळी बोलताना सक्षम कराडचे मा.रमेशजी चांडक सर यांनी शाळेच्या विद्यार्थिनींचे कौतुक करीत एकूणच कन्याशाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे व विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धेतील निकालाचे कौतुक करीत सक्षम कराड ही संस्था दिव्यांगांसाठी एक स्वयंसेवी संस्था म्हणून काम करते या सामाजिक मदतीतून दिव्यांगांना किंवा होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक वाटचालीत मदत व्हावी व आपण अशा मदतीच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाचे वाटेकरी व्हावे या हेतूने आमची संस्था कार्य करते.तेव्हा आपण या मदतीचा स्वीकार करून येणाऱ्या काळात आपल्या शैक्षणिक वाटचालीत या विद्यालयातून दर्जेदार शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे मत व्यक्त करीत संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
           यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगत पाहुण्यांचा परिचय करून दिला.तसेच या मदतीचा योग्य उपयोग करून आम्ही सक्षम कराड या संस्थेने आमच्यावर जो विश्वास दाखविला तो जपण्याचा नक्की प्रयत्न करू अशी आशा व्यक्त केली.
           शाळेचे पर्यवेक्षक सुरेश राजे यांनी सक्षम कराड या संस्थेने आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना वस्तू स्वरूपात दिलेली भेट याचा आम्ही स्वीकार करून आपण दिलेल्या मदतीची बद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करतो व कन्याशाळा मलकापूरच्या वतीने सक्षम कराड संस्थेचे आभार करतो असे मत व्यक्त केले. व सक्षम कराड या संस्थेचे कार्य असेच वृद्धिंगत व्हावे असे मत व्यक्त केले.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रकाश कदम,क्रीडा शिक्षक श्री. जयवंत पाटील, श्री.योगेश खराडे  यांनी विशेष परिश्रम घेतले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात यांनी केले तर विद्यालयाच्या वतीने विशेष उपस्थित सर्व मान्यवरांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
          सक्षम कराड या स्वयंसेवी संस्थेने गरजू व होतकरू विद्यार्थिनींसाठी दिलेल्या मदतीचीबद्दल पालक वर्गातून सक्षम संस्थेचे कौतुक होत आहे व त्यांच्या विषयी ऋण व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...