Powered By Blogger

बुधवार, २५ जून, २०२५

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल --मा.भगवानराव पवार


श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल --मा.भगवानराव पवार
        श्री मळाई शिष्यवृत्ती २०२४-२५ परीक्षेचा निकाल जाहीर...

 मलकापूर -
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळाच्या वतीने इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने इयत्ता ४थी व ७ वी च्या स्तरावर घेण्यात येणाऱ्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ चा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामसेवक मा. भगवानराव पवार यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था व संस्थेच्या सर्व शाखेतील शिक्षक वृंद नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे आज आपण ज्यांच्या सत्कारासाठी उपस्थित आहोत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संस्थेच्या इतिहासातील दखलपात्र घटक आहेत तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
          यावेळी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,प्रमुख पाहुणे शिवशंकर ज्वेलर्स कराडचे अविनाश जगताप, मा. प्रियांका जगताप. मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव, सौ.शालिनीताई थोरात( काकी )संचालक वसंतराव चव्हाण,पथक पर्यवेक्षण प्रमुख आर. ए. कुंभार सर, मा. चंद्रकांत कुंभार, चव्हाण सर, मोहिते सर, नीट परीक्षा पात्र विद्यार्थिनी सिद्दिका मुर्सल,मा. गणेश पवार,,दैनिक पुण्यनगरीचे मा. अतुल काकडे, हितचिंतक पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
         यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी केले.त्यांनी संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात याच्या मार्गदर्शनानुसार सुरु झालेले श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ व त्याचे कामकाज, परीक्षा घेण्यामागचा हेतू याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
        संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी आपल्या मनोगतात संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणारा उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थी घडवण्यामागे शाळा,शाळेतील शिक्षक आपल्या पाल्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी धडपडणारे पालक यांच्यामुळेच हे विद्यार्थी शाळा व संस्थेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. सामान्य कुटुंबातील मुले मुली उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी पात्र होत आहे हे डॉ.स्वाती थोरात यांनी ५ वर्षापूर्वी सुरु केलेल्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेचे यश आहे. तसेच ज्यांना क्रीम लेवल म्हणजे टोकाची बुद्धिमत्ता असणारे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, पालक त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा चांगला संयोग कार्यक्रमाच्या निमित्ताने आज घडून आला असून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून त्यांना धारक होण्यासाठी उत्तम प्रशिक्षण देणारा शिक्षक वर्ग हे सर्व आज यां कौतुकास पात्र आहेत.
         कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.प्रियांका जगताप यांनी संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा देत श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेतील धारक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे कौतुक केले. विद्यार्थ्याचे अथक परिश्रम, पालक सहकार्य व त्या सर्वांना मिळणारे संस्थेचे आर्थिक आणि बौद्धिक पाठबळ या सर्वांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले, तसेच गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे खरे सोने असून त्याला झळाळी देण्याची काम श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा ही शिष्यवृत्तीचा पथदर्शी उपक्रम आहे
 असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
              यावेळी केंद्रप्रमुख मलकापूर मा.गणेश जाधव, नीट परीक्षा धारक विद्यार्थिनी सिद्धीका मुर्सल, मा. चंद्रकांत कुंभार, प्राचार्या सौ. अरुणा कुंभार यांचीही भाषणे झाली व त्यांनी आपल्या मनोगतातून सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे कौतुक केले व संस्थेचे उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
       
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता कोळी व सौ.कविता थोरात यांनी तर आभार सौ. करुणा शिर्के यांनी मानले.
      श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ चा निकाल पुढीलप्रमाणे----
   इयत्ता ७वी (मराठी माध्यम )
कु.आर्या भगवान पवार- प्रथम क्रमांक -कन्या शाळा मलकापूर 
चि. वरदराज दिपक शिंदे -द्वितीय- आनंदराव विद्यालय पोतले.
कु.जान्हवी संदीप मोरे तृतीय -आ. च विद्यालय मलकापूर.
कु. संस्कृती धनंजय गरुड उत्तेजनार्थ आ.च.विद्यालय पोतले.
कु.वेदिका विनोद गरुड उत्तेजनार्थ आ. च. विद्यालय पोतले 
 स्वस्ती दादासो देशमुख उत्तेजनार्थ कन्याशाळा मलकापूर

 ४थी (मराठी माध्यम )
चि.अंशुल सुरेश शिंदे-- प्रथम- आदर्श प्राथमिक आगाशिवनगर 
चि.मंथन मयूर गरुड -द्वितीय- आदर्श प्राथमिक आगाशिवनगर
कु. त्रिशा संदीप शिर्के आदर्श प्राथमिक मलकापूर तृतीय 
चि.विराज किशोर पाटील उत्तेजनार्थ आदर्श प्राथमिक आगाशिवनगर
चि. श्रेयस सचिन चव्हाण उत्तेजनार्थ आदर्श प्राथमिक आगाशिवनगर..

 इयत्ता ७वी ( इंग्रजी माध्यम)
कु. सबा समीर डांगे प्रथम --स्टार इंग्लिश मीडियम अँड जुनिअर कॉलेज मलकापूर
चि. धैर्यशील प्रभाकर शिंदे द्वितीय-- स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मलकापूर.
चि. समर्थ सुरेंद्र गुरव उत्तेजनार्थ -स्टार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर.
 इयत्ता ४थी (इंग्रजी माध्यम )
कु.अनुश्री आनंदा साळुंखे प्रथम-- स्टार इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज मलकापूर 
विश्वराज गणेश पवार -प्रथम- स्टार इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर 
कु.आराध्या सुनील वाळके उत्तेजनार्थ स्टार इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर.
       
     यावेळी मागील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मधील एक हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण ही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

डॉ.स्वाती थोरात -प्रमुख श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ 
        शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ विद्यार्थ्यांच्या मध्ये गुणवत्ता वाढीसाठी या परीक्षांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असून त्याला विद्यार्थी व पालक वर्ग यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तेव्हा शिक्षक,विद्यार्थी, पालक यांचा त्रिवेणी संगम व संस्था प्रशासन यांचा सुयोग्य नियोजन हेच या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळाच्या यशाचे गमक आहे असे यावेळी मत श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळाच्या प्रमुख डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

रिलायन्स जिओ bp च्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न..१० हजार रुपये किंमतीच्या शाळापयोगी साहित्याचे वितरण....

रिलायन्स जिओ bp च्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न..
        गरजू व होतकरू विद्यार्थिनींना केले १० हजार किंमती रुपयाच्या शाळापयोगी साहित्याचे वितरण....

मलकापूर --
      रिलायन्स जिओ bp च्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स जिओ bp व श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूर यांच्यावतीने कन्याशाळा मलकापूर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन व विद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थिनींना शालापयोगी साहित्य (शालेय गणवेश शूज ) वितरण कार्यक्रम शुक्रवार दि.२० जून २०२५ रोजी सकाळी ११. ०० वाजता संपन्न झाला.यावेळी सकाळच्या सत्रात चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन सुपरवायझर मा.अभिजीत माने,मा. राजेंद्र खबाले, रिलायन्स पेट्रोल पंप ऑपरेटर मा. संदीप जाधव, मा.संतोष जाधव मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश जाधव,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक मा. सुरेश राजे,चित्रकला शिक्षक राजेंद्र पांढरपट्टे, क्रीडा शिक्षक जयवंत पाटील,सर्व शिक्षक,शिक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
          दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना भव्य आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विद्यालयातील गरजू,होतकरू विद्यार्थिनींना रिलायन्स जिओ bp यांचे वतीने दहा हजार रुपये किमतीचे शालेय साहित्य( गणवेश बूट ) एरिया सेल्स मॅनेजर मा. परिमल साहेब यांचे व संस्थेचे मित्र अशोकराव थोरात भाऊ यांचे शुभहस्ते विद्यार्थिनींना वितरित करण्यात आले.
         यावेळी बोलताना मा. परिमल साहेब यांनी शाळेतील अनुभव कथन करत विद्यार्थिनींनी चिकाटी सोडू नका,शिक्षण घेत रहा व उच्च ध्येयानुसार वाटचाल करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल.संस्थेतील गुणवत्तापूर्ण उपक्रमामुळेच या संस्थेचा नवलौकिक असून संस्थेचे पाठबळ तुम्हाला मिळेलच व तुम्ही नेहमीच प्रगतीपथावर राहाल यात शंका नाही. यासाठी सर्वांनी शालेय जीवनामध्ये आपल्या कलागुणांचा विकास करण्यासाठी उपक्रमामध्ये हिरिरीने यांनी भाग घेतला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
        यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी आपल्या मनोगतातून रिलायन्स जिओ bp यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत मा. परिमल साहेब व त्यांच्या सर्व स्टाफच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना वस्तुस्वरूपात दिलेली मदत याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील सेवाभावी संस्थांनी असे उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या पंखांना बळ दिले तर ते निश्चित भरारी घेतील व त्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या क्षमता ओळखाव्यात आणि अशा उपक्रमात आपले कौशल्य सिद्ध करावे असे आवाहनपर मत व्यक्त केले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सौ. कविता थोरात व आभार सौ. करुणा शिर्के यांनी मानले.
    रिलायन्स जिओ bp आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे...
छोटा गट (६ वी व ७वी )
कु. शार्वी संदीप जाधव (७ब )-प्रथम
कु. श्रुती प्रमोद कारंडे (७ब ) -द्वितीय
कु. मुग्धा विजय पाटील (७ब )-तृतीय
कु. भूमी हरिदास माने (६ब )- उत्तेजनार्थ प्रथम 
कु. जान्हवी पांडुरंग कुंभार (६ब)- उत्तेजनार्थ द्वितीय

मोठा गट (८वी, ९वी)
कु. संचिता महेंद्र बनसोडे(९अ) - प्रथम
कु. प्रणाली प्रल्हाद शेवाळे-(९अ)-द्वितीय
कु. सुफिया एजाज देसाई-(८अ)-तृतीय
कु. श्रद्धा सचिन पवार(८अ) -उत्तेजनार्थ प्रथम
कु.वैभवी उदय कदम (८ब)-उत्तेजनार्थ द्वितीय

बुधवार, ११ जून, २०२५

कन्याशाळा मलकापूरचे नॅशनल स्पीड मॅथ्स परीक्षेत उत्तुंग यश... ७ विद्यार्थिनीनी राज्य गुणवत्ता यादीत पटकावले स्थान..

कन्याशाळा मलकापूरचे नॅशनल स्पीड मॅथ्स परीक्षेत उत्तुंग यश....
         ७ विद्यार्थिनीनी राज्य गुणवत्ता यादीत पटकावले स्थान..
         
 मलकापूर -
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी नॅशनल स्पीड मॅथ्स परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले.व कन्याशाळा मलकापूरची स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत श्री मळा ईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामध्ये इयत्ता पाचवीतील कु. आरोही विश्वास येडगे ( राज्यात द्वितीय), कु. अनन्या रणजित मोहिते ( राज्यात द्वितीय ), कु.आर्या जगदीश जाधव ( राज्यात पाचवा ), इयत्ता सहावी मध्ये कु. आराध्या संतोष जाधव ( राज्यात तृतीय), कु. सानवी योगेश खराडे ( राज्यात चतुर्थ ), इयत्ता सातवी मध्ये कु. आर्या भगवान पवार ( राज्यात द्वितीय ), कु . विभावरी सचिन पाटील (राज्यात तृतीय) या ७ विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
       तसेच इयत्ता पाचवी मलकापूर केंद्रामध्ये कु. हिंदवी प्रमोद तडाखे (प्रथम ), कु . परिणीती संतोष चव्हाण (प्रथम ), प्रांजल जयवंत गावडे( प्रथम), इयत्ता सहावी मध्ये कु. रेवती रामदास तडाखे (तृतीय ), इयत्ता सातवी मध्ये कु. अस्मिता महेंद्र बागल (प्रथम ), कु. झोया मुन्ना पठाण (द्वितीय ), कु.लायबा मुजफ्फरहुसेन नदाफ (चतुर्थ) यांनी क्रमांक पटकावले.
            यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाचे गणित शिक्षक श्री. मल्हारी शिरतोडे, सौ. वाघ पी पी, सौ सावंत एच. आर, श्री.नदाफ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
          यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ.स्वाती थोरात, संचालक वसंतराव चव्हाण, प्रा. संजय थोरात,पालक वर्ग कन्या शाळा मलकापूर यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      सर्व स्पर्धा परीक्षा, दहावी बोर्ड निकाल यामधील उल्लेखनीय यशामुळे विद्यालयास मलकापूर पंचक्रोशीतील पालकांचा शैक्षणिक वर्ष २०२५मध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन.

आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न;  गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकर...