रिलायन्स जिओ bp च्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा कन्याशाळा मलकापूर येथे संपन्न..
गरजू व होतकरू विद्यार्थिनींना केले १० हजार किंमती रुपयाच्या शाळापयोगी साहित्याचे वितरण....
मलकापूर --
रिलायन्स जिओ bp च्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स जिओ bp व श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूर यांच्यावतीने कन्याशाळा मलकापूर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन व विद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थिनींना शालापयोगी साहित्य (शालेय गणवेश शूज ) वितरण कार्यक्रम शुक्रवार दि.२० जून २०२५ रोजी सकाळी ११. ०० वाजता संपन्न झाला.यावेळी सकाळच्या सत्रात चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन सुपरवायझर मा.अभिजीत माने,मा. राजेंद्र खबाले, रिलायन्स पेट्रोल पंप ऑपरेटर मा. संदीप जाधव, मा.संतोष जाधव मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश जाधव,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक मा. सुरेश राजे,चित्रकला शिक्षक राजेंद्र पांढरपट्टे, क्रीडा शिक्षक जयवंत पाटील,सर्व शिक्षक,शिक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना भव्य आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विद्यालयातील गरजू,होतकरू विद्यार्थिनींना रिलायन्स जिओ bp यांचे वतीने दहा हजार रुपये किमतीचे शालेय साहित्य( गणवेश बूट ) एरिया सेल्स मॅनेजर मा. परिमल साहेब यांचे व संस्थेचे मित्र अशोकराव थोरात भाऊ यांचे शुभहस्ते विद्यार्थिनींना वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. परिमल साहेब यांनी शाळेतील अनुभव कथन करत विद्यार्थिनींनी चिकाटी सोडू नका,शिक्षण घेत रहा व उच्च ध्येयानुसार वाटचाल करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल.संस्थेतील गुणवत्तापूर्ण उपक्रमामुळेच या संस्थेचा नवलौकिक असून संस्थेचे पाठबळ तुम्हाला मिळेलच व तुम्ही नेहमीच प्रगतीपथावर राहाल यात शंका नाही. यासाठी सर्वांनी शालेय जीवनामध्ये आपल्या कलागुणांचा विकास करण्यासाठी उपक्रमामध्ये हिरिरीने यांनी भाग घेतला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी आपल्या मनोगतातून रिलायन्स जिओ bp यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत मा. परिमल साहेब व त्यांच्या सर्व स्टाफच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना वस्तुस्वरूपात दिलेली मदत याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील सेवाभावी संस्थांनी असे उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या पंखांना बळ दिले तर ते निश्चित भरारी घेतील व त्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या क्षमता ओळखाव्यात आणि अशा उपक्रमात आपले कौशल्य सिद्ध करावे असे आवाहनपर मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सौ. कविता थोरात व आभार सौ. करुणा शिर्के यांनी मानले.
रिलायन्स जिओ bp आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे...
छोटा गट (६ वी व ७वी )
कु. शार्वी संदीप जाधव (७ब )-प्रथम
कु. श्रुती प्रमोद कारंडे (७ब ) -द्वितीय
कु. मुग्धा विजय पाटील (७ब )-तृतीय
कु. भूमी हरिदास माने (६ब )- उत्तेजनार्थ प्रथम
कु. जान्हवी पांडुरंग कुंभार (६ब)- उत्तेजनार्थ द्वितीय
मोठा गट (८वी, ९वी)
कु. संचिता महेंद्र बनसोडे(९अ) - प्रथम
कु. प्रणाली प्रल्हाद शेवाळे-(९अ)-द्वितीय
कु. सुफिया एजाज देसाई-(८अ)-तृतीय
कु. श्रद्धा सचिन पवार(८अ) -उत्तेजनार्थ प्रथम
कु.वैभवी उदय कदम (८ब)-उत्तेजनार्थ द्वितीय

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा