Powered By Blogger

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

टेबल टेनिस -- सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा मलकापूरच्या 14 वर्षे व 17 वर्षे मुलींच्या संघास सांघिक उपविजेतेपद... तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड... कराड--- सातारा येथे 6 सप्टेंबर व 7 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या 14 वर्षे मुलींच्या व 17 वर्षे मुलींच्या संघाने सांघिक उपविजितेपद पटकावले. या संघातील कु.स्वरा पाटील हिची 14 वर्षे वयोगटात विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी तर 17 वर्षे वयोगटात कु. प्रगती शेळके व हार्दिका पाटील या दोन खेळाडूंची विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.. 14 वर्षे मुलींच्या संघात स्वरा पाटी,समीक्षा मोरे वैष्णवी लावंड,आदिती सावंत जान्हवी नलवडे तर17 वर्षे मुलींच्या संघात प्रगती शेळके,हार्दिका पाटील अंकिता पाटील, श्रावणी शिर्के व अस्मिता शिर्के या खेळाडूंचा सहभाग होता.. सर्व यशस्वी व सहभागी खेळाडूंचे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष मा.पी.जी.पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, संचालक मा. वसंतराव चव्हाण, मा.संजय थोरात, मार्गदर्शक संचालिका मा. डॉ स्वाती थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...