Powered By Blogger

रविवार, ४ जानेवारी, २०२६

कन्याशाळा मलकापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी..


कन्याशाळा मलकापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी...
 मलकापूर दि.3जानेवारी
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला व त्यांच्यातील सूप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिनाचे औचित्य साधून पाककला, रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका व मलकापूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.सौ. स्वाती रणजीत थोरात यांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या शुभहस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे होत्या तसेच कन्याशाळेच्या पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के, सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती
          श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो यावेळी स्पर्धेचे मुख्य परीक्षक हॉटेल मॅनेजमेंट व पंचम स्नॅक्सचे शेप मा. शुभम जिरंगे, गायत्री जिरंगे व मा. अपूर्वा लाटकर व गृहिणी योगिता भिसे यांचे शुभहस्ते पाककला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर, पथक पर्यवेक्षण सदस्य मा.डॉ.चंद्रकांत कुंभार सर,माजी मुख्याध्यापक मा.अनिल शिर्के यांची उपस्थिती होती. 
         यावेळी परीक्षकांनी सर्व स्पर्धेकांशी संवाद साधून पाककला स्पर्धेतील पदार्थाचे, चित्रकला, हस्तकला स्पर्धेचे परिक्षण केले. यामध्ये नाश्ता मधील पदार्थ तसेच जेवणाचे सर्व पदार्थ तसेच व पौष्टिक पदार्थ तयार करून विद्यार्थिनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता तर चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांनी सामाजिक विषयावर आधारित चित्राचे रेखाटन करून कला सादर केली तर हस्तकलेमध्ये विद्यार्थिनींनी परिसरातील साधनांचा वापर करून टाकाऊ पासून टिकाऊ उत्कृष्ट साधन तयार केले होते. परीक्षकांनी त्यांच्यातील कलागुणांचे कौतुक करीत आपल्या आवडी क्षेत्रात पारंगत होऊन या क्षेत्रातही पुढे जाऊन व्यवसाय संधी निर्माण करता येतात असे मत व्यक्त केले.
         विविध स्पर्धेतील सहभागी व विजेते स्पर्धकांचे शाळापयोगी साहित्य देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
       कन्याशाळेच्या या उपक्रमाचे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील,खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,सर्व संचालक मंडळ, शिक्षणप्रेमी पालक यांनी कौतुक करीत विद्यार्थिनी मधील कलागुणांना विद्यालय देत असलेले प्रोत्साहन खरोखरच कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले.
        यावेळी सांस्कृतिक प्रमुख सौ.कविता थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.देवकी थोरात यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
     स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...