Powered By Blogger

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

मलकापूर नगरपरिषद जि. सातारा सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदान जनजागृतीसाठी मलकापूर येथे प्रभातफेरी संपन्न...

मलकापूर नगरपरिषद जि. सातारा सार्वत्रिक निवडणूक 2025
         मतदान जनजागृतीसाठी मलकापूर येथे प्रभातफेरी संपन्न...  
मलकापूर -
      मलकापूर नगरपरिषद मलकापूर जि सातारा येथे  (Sveep) पथकाच्या माध्यमातून कन्या शाळा मलकापूर येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. सदर कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी कल्पना ढवळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री कपिल जगताप, श्री ज्ञानदेव सांळूखे यांच्या मार्गदर्शन लाभले.
           सदर कार्यक्रमास कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुलोचना भिसे मॅडम, पर्यवेक्षिका सौ करुणा शिर्के तसेच स्वीप पथकाच्या नोडल अधिकारी श्रीमती प्रतिभा लोंढे मॅडम तसेच  सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. महेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यानीना  मतदान  जागृती विषयी मार्गदर्शन करून सर्व तरुण मतदारांनी मोठ्या उत्साहाने आपले मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले . सदर कार्यक्रमास, श्री गोविंद पवार, श्री प्रदीप बंडगर, शाहीन मणेर, प्रथमेश देवकुळे व कन्याशाळेचे क्रीडा विभागाचे सौ. संगिता पाटील, हसिनाबेगम  मुल्ला,  योगेश खराडे, मल्हारी शिरतोडे सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनीना  मतदान विषयी शपथ देण्यात आले.व कार्यक्रमाची सांगता झाली.

जिवीका फाउंडेशनच्या वतीने कन्याशाळा मलकापूर येथे एचपीव्ही लसीकरण संपन्न...

जिवीका फाउंडेशनच्या वतीने कन्याशाळा मलकापूर येथे एचपीव्ही लसीकरण संपन्न...
      विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी कन्याशाळेचे आणखी एक पाऊल पुढे.. 
मलकापूर-
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे जिवीका फाउंडेशन यांचे वतीने व कन्याशाळा मलकापूर यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र मिशन अंतर्गत एचपीव्ही ही कर्करोगावरील लस विद्यार्थिनींना देण्यात आली.कन्याशाळेच्या वतीने नेहमीच संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात भाऊ,मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सहशालेय उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थिनी गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जातात त्यात एक पाऊल पुढे म्हणून विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण आयोजित करण्यात आले होते.२८ मार्च २०२५रोजी पहिली लस देण्यात आली तेव्हा १५५ विद्यार्थिनींनी लाभ घेतला तर १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुसरी लस १४०विद्यार्थ्यांना ही लस यशस्वीरित्या देण्यात आली.
       सदर लस जीविका फाउंडेशनचे मा. सुभाष आंग्रे यांच्या पुढाकाराने व डॉ. वैष्णवी विजयकुमार माने व त्यांचा सर्व स्टाफ मा. शितल शिसाळ( नर्स), मा.पल्लवी जाधव(HCA) यांचे सहकार्याने विद्यार्थिनींच्या प्रतिसादात लस देण्यात आली.यावेळी शाळकरी मुलींना गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी केवळ लसीकरणच नव्हे, तर मोहिमेमध्ये जनजागृतीही करण्यात आली ज्यामध्ये समाज, लाभार्थी व त्यांचे पालक यांना गर्भाशयाचे आरोग्य, वेळेत तपासणीचे महत्त्व व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शिक्षित करण्यात आले.यावेळी पालकांची विशेष उपस्थिती होती.
         जीविका फाउंडेशन व कन्या शाळा मलकापूर यांनी विद्यार्थिनी आरोग्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे पालकवर्गातून कौतुक होत आहे...

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....

कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....      सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...