मलकापूर--
शुक्रवार दि.16 ऑक्टोबर 2025
ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर पार पाडलेल्या जिल्हास्तरीय शासकीय
मैदानी स्पर्धामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आ. च.विद्यालय मलकापूर,कन्याशाळा मलकापूर, स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल व मळाईदेवी स्पोर्ट्स क्लब ,मलकापूर च्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून संस्थेचे,शाळेचे तसेच क्लब चे नाव उज्वल केले.व मळाईदेवी स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन करून शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागाला साजेशी कामगिरी करीत जिल्हयात आपले वेगळे स्थान निर्माण केले व दिनांक 28/10/2025 ते 30/10/2025 रोजी डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्यांनी आपले स्थान पक्के केले.
संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांचे मार्गदर्शन व खेळाडूंचे कष्ट व त्यांना प्रोत्साहन देणारे क्रीडाशिक्षक यांच्या अथक प्रयत्नानेच खेळाडू यशाला गवसणी घालू शकले.
या सर्व खेळाडूंना NIS कोच मा. प्रतीक कदम व संस्थेच्या सर्व शाखांतील क्रीडा शिक्षक यांची विशेष मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूची नावे -- *मुलांच्या १७वर्ष वयोगटात* 1)श्रीराज शिनगारे- 100मी प्रथम ,
2)हर्षद पाटील- 100मी धावणे द्वितीय, 200मी धावणे द्वितीय
3)वरद बडेकर -लांब उडी -तृतीय,
4)विराज सुतार -भालाफेक द्वितीय,
19वर्ष मुले
5)साई शेलार -भालाफेक प्रथम,थाळी फेक -तृतीय
*१७ वर्ष मुलींच्या गटात*
1)कु.सानवी शिंगण- उंच उडी -द्वितीय..
2)अनुष्का करांडे - लांब उडी द्वितीय
3) शबु इद्रसी - 100मी,200मी चतुर्थ
19वर्ष मुले
17 वर्षाखालील मुलांच्या 4×100 व4× 400रिले स्पर्धेत* मुलांचा संघ प्रथम -रिले संघातील खेळाडू..
1)हर्षद पाटील
2)वरद बेडेकर
3)विशाल कामी
4)सर्वेश लोखंडे
5)शुभम साळुंखे.
6)विराज सुतार
सर्व यशस्वी खेळाडूंचे श्री
मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा. पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, संस्थेचे संचालक प्रा. संजय थोरात,मा. वसंतराव चव्हाण, मार्गदर्शक संचालिका मा.डॉ.स्वाती थोरात, मलकापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मा. अजितकाका थोरात, सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मलकापूर आदींनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..
या यशाने श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.
